Home » जुलै महिन्याचा पहिला आठवडा ‘या’ राशीसाठी असेल खास

जुलै महिन्याचा पहिला आठवडा ‘या’ राशीसाठी असेल खास

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

प्रत्येकाला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 03 July to 09 July)

मेष – आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे तर पराक्रमस्थानातून रवी, बुधाचे, सुखस्थानातून शुक्राचे आणि पंचमस्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे. कामानिमित्त प्रवास घडतील. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेश गमनाचे योग येतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी मिळतील. मानसिक स्थैर्य लाभेल. नोकरीतील कामानिमित्त मनाजोग्या ठिकाणी बदलीची ऑर्डर मिळेल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. आपले आवडते छंद जोपासता येतील, तसेच त्यांना व्यावसायिक स्वरुप देखील देता येईल. कलाकारांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. समाजात आपली पतप्रतिष्ठा उंचावेल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. हातून दानधर्म घडतील. सामाजिक राजकीय क्षेत्रातून आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. नवीन मार्ग खुले होतील.

शुभ दिनांक – 3, 4

वृषभ – आपल्या राशीच्या अष्टमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. प्रवासात आपले खिसा पाकीट सांभाळावे. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कामानिमित्त प्रवास घडतील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. महत्त्वाची कागदपत्र हाती लागतील. परंतु कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. प्रियजनांच्या गाठीभेटी होतील. सहलीत सहभागी व्हाल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात मात्र व्यवसाय उद्योगाच्या दृष्टीने मोठे निर्णय घेतले जातील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. मित्र परिवारांबरोबर वेळ मजेत घालवाल. इच्छित गोष्टी प्राप्त होतील. कामानिमित्त प्रवास घडतील.

शुभ दिनांक – 4 ते 6

मिथुन – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीतून रवी आणि बुधाचे तर राशीच्या सप्तमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे.
आपल्या मतांचा कुटुंबात आदर केला जाईल. आपल्या वाक्चातुर्यामुळे रेंगाळलेली कामे मार्गी लावू शकाल. भागीदारी व्यवसायात नवीन योजना राबविण्यात येतील. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विवाहेच्छूक तरुणांना मनापसंत जोडीदार मिळेल. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. प्रकृतीच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष करू नका. उष्णतेचे विकार, पित्तविकार यांचा त्रास होऊ शकतो. उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी लाभतील.

शुभ दिनांक – 6 ते 8

कर्क – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आरोग्याच्या जून्या तक्रारी डोके वर काढतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. पूर्वनियोजित योजना योग्य पद्धतीने पार पडतील. राशीतील बुध आणि शुक्रामुळे गोड बोलून आपली कामे मार्गी लावाल. मनस्वास्थ लाभेल. उंची वस्त्र अलंकारांची खरेदी केली जाईल. नोकरीत आपण केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. तसेच एखाद्या सवलतीचा लाभही मिळेल. जोडीदाराच्या भरभराटीस अनुकूल काळ राहील. जोडीदाराचे वर्चस्व वाढेल. दैनंदिन जीवनातून विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न कराल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उत्तरार्धात अनपेक्षित धनप्राप्ती होईल. वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने हा आठवडा आपणास अनुकूल फलदायी ठरेल.

शुभ दिनांक – 4 ते 6

सिंह – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे तर आपल्या राशीतून शुक्र, मंगळाचे भ्रमण होत आहे. संततीच्या प्रगतीची वार्ता कानी येईल. मातुल घराण्याच्या गाठीभेटीतून आनंद मिळवाल. आपल्या बोलण्यातून आपला दरारा जाणवेल. अनेक रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. कुटुंबात तसेच समाजातही आपला दरारा वाढेल. नवीन व्यावसायिक शुभारंभातून लाभ घडतील. कामाचा व्याप वाढेल. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. अनपेक्षित धनप्राप्ती होईल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. उत्तरार्धात एखादी फसवी संधी येऊ शकते. तेव्हा सावध राहावे, कोणतेही निर्णय घेताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊनच आपले मत ठरवावे.

शुभ दिनांक – 3, 4

कन्या – आपल्या राशीच्या कर्मस्थानातून रवी आणि बुधाचे भ्रमण होत आहे तर राशीच्या लाभस्थानातून शुक्र आणि व्ययस्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे. सुखस्थानातून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे गृहसुशोभीकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. मातृसौख्य लाभेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. समाजात आपल्या मतांचा आदर केला जाईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. सरकारी नोकरीच्या संधी चालून येतील. उत्तरार्धात जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक – 5, 6

तूळ – आठवड्याच्या सुरुवातीलाच तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. भावंडांशी सुसंवाद साधाल. ठरवलेली कामे पूर्णत्वास नेताना काही अडचणींना सामोरे जावे लागेल. कौटुंबीक शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. कुटुंबीयांसंबंधीच्या सुवार्ता कानी येतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

शुभ दिनांक – 4, 5

वृश्चिक – धनस्थानातून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे आपली आर्थिक स्थिती मज‌बूत होईल. अष्टमस्थानातून होणारे रवी – बुधाचे भ्रमण स्थावर मालमत्तेतून लाभ देणारे राहील. दशामातील शुक्र -मंगळ कलाकार खेळाडू यांच्यासाठी अनुकूल फलदायी ठरेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उत्तम संवाद शैलीमुळे इतरांना आपलेसे कराल. कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकाराल. घरातील सुखसुविधा वाढवण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. घरातील वातावरण आनंदी उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करावा. कामानिमित्त घडलेल्या प्रवासातून कार्यसिद्धी होईल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात सतत कार्यरत राहाल. नवनवीन योजनांची आखणी कराल.

शुभ दिनांक – 4, 5

धनू – आपल्याच राशीतून चंद्राचे भ्रमण होत आहे. तर सप्तमस्थानातून रवी बुधाचे अष्टमातून शुक्राचे आणि भाग्यस्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे. जोडीदाराच्या सल्ल्याने धाडसी निर्णय घेतले जातील. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याने रेंगाळलेली कामांना गती मिळेल. नोकरीत वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल. बढती बदलीचे योग संभवतात. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल. कवी, कलाकार, गायक, वादक यांना कलाक्षेत्रात चांगला नावलौकिक लाभेल. क्रीडाक्षेत्रात खेळाडूंना पुरस्कार मिळतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रातून सतत कार्यरत राहाल.

शुभ दिनांक – 3 ते 5

मकर – आपल्या राशीच्या द्वादशभावातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तेव्हा आठवड्याच्या सुरुवातीलाच कामानिमित्त प्रवास योग घडून येतील. आपल्या प्रकृतीची हेळसांड करू नका. मनस्वास्थ्य बिघडवणारी एखादी घटना घडण्याची शक्यता राहते. तेव्हा कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे विचार करून मगच निर्णय घ्यावा. आठवड्याच्या उत्तरार्धात जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वेळ द्यावा लागेल. भावंडांशी सुसंवाद साधाल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. आपल्या कार्यामुळे सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल.

शुभ दिनांक – 4 ते 6

कुंभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद लुटाल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्णत्वास जातील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. प्रवासात आपली प्रकृती तसेच खिसा – पाकीट सांभाळावे. नवनवीन व्यावसायिक उपक्रम राबवण्यात यशस्वी व्हाल. इम्पोर्ट एक्स्पोर्टच्या व्यवसायातून फायदा होईल. सप्तमातील मंगळामुळे जोडीदाराचे वर्चस्व वाढेल.

शुभ दिनांक – 6 ते 8

मीन – आपल्या राशीच्या दशमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तर पंचमस्थानातून बुध आणि शुक्राचे भ्रमण होत आहे. लेखक साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. कलाकार गायक वादक यांच्या कला कौशल्याची प्रशंसा होईल. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. वरिष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा केली जाईल. आजवर रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. आपली इच्छापूर्ती होईल. सुख-समृद्धी लाभेल. धार्मिक कार्यात विशेष रुची वाढेल. तीर्थस्थळांना भेटी द्याल.

शुभ दिनांक – 7, 8

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.