Home » ‘या’ राशीची सरकारी कामे मार्गी लागतील…

‘या’ राशीची सरकारी कामे मार्गी लागतील…

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 12 June to 18 June)

मेष – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या द्वादशस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. गेल्या आठवड्यात बुधाचा धनस्थानात झालेला प्रवेश आपल्या आमदानीत वाढ करणारा राहील. राशीतून गुरु आणि राहू वरून होणारे चंद्राचे भ्रमण आपल्या वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने अनुकूल फलदायी ठरेल. नवीन संधी चालून येतील. धार्मिक – अध्यात्मिक क्षेत्रात ओढा वाढेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. आपल्या मतांचा समाजात आदर केला जाईल. जुनी येणी वसूल होतील. उत्तरार्धात पराक्रम स्थानातून रवी आणि चंद्राचे होणारे भ्रमण आपल्या नेतृत्वशक्तीत वाढ करणारे राहील. भावंडांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. भावंडांशी सल्लामसलत करून एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल.

शुभ दिनांक – 16, 17

वृषभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. सरकारी कामे मार्गी लागतील. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मोठी मजल मारता येईल. भविष्यकाळाच्या दृष्टीने गुंतवणूक करण्यात यश येईल. मित्रपरिवाराचेे सहकार्य लाभेल. व्ययस्थानातील गुरु राहूमुळे धार्मिक स्थळांनाा भेटी द्याल. कामानिमित्त प्रवास घडतील आणि प्रवासातून कार्यसिद्धी होईल. राशीत आलेल्या बुधामुळे आपल्या संभाषण चातुर्याच्या जोरावर इतरांना आपलेसे कराल. धनस्थानातील रवीमुळे कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. बड्या व्यक्तींच्या सहकार्याने रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.

शुभ दिनांक – 16 ते 18

मिथुन – राशीच्या कर्मस्थानातून होणाऱ्या चंद्रगभ्रमणामुळे तरुणांच्या नोकरी व्यवसाय संबंधीच्या समस्या दूर होतील. चांगल्या संधी चालून येतील. मोठ्या व्यक्तींच्या सहकार्यामुळे आपली कामे मार्गी लावण्यात यश लाभेल. न्यायप्रविष्ट प्रकरणातून लाभ होतील. मित्र परिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. घरातील वातावरण आनंदी राहण्यास मदत होईल. राशीत आलेल्या रवी मुळे आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत राहाल. उत्तरार्धात वैयक्तिक उत्कर्षाच्या वार्ता कानी येतील.

शुभ दिनांक – 17, 18

कर्क – आपल्या राशीच्या भाग्यस्थानातील नेपच्यूनवरून चंद्राचे होणारे भ्रमण अध्यात्मिक ओढा वाढवणारे राहील. तीर्थस्थळांना भेटी द्याल, हातून पुण्य कर्म घडेल, दानधर्म होतील. राजकीय सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून गरजूंना मदत केली जाईल. दशमस्थानातील गुरु, राहूमुळे नोकरीच्या संधी चालून येतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. लाभस्थानातील वृषभ राशीतील बुधामुळे महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. विविध व्यावसायिक उपक्रम यशस्वीपणे राबवले जातील. उत्तरार्धात कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल.

शुभ दिनांक – 13, 14

सिंह – आपल्या राशीच्या अष्टमस्थानातून नेपच्यूनवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. गुढ शास्त्राबद्दल ओढा वाढेल.अध्यात्मिक प्रगती होईल. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. भाग्यस्थानातील गुरु, राहू मुळे तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. धार्मिक शुभ समारंभात सक्रिय सहभाग घ्याल. दशम स्थानात झालेला बुधाचा प्रवेश तरुणांना नोकरीच्या सुसंधी देणारा राहील. व्यवसाय उद्योगात नवीन कार्यारंभ केले जातील. लाभस्थानातील रवीमुळे उत्तरार्धात आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. आपल्या नेतृत्वाखाली मोठी कामे यशस्वीपणे पार पाडली जातील.

शुभ दिनांक – 16, 17

कन्या – आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे भागीदारी व्यवसायातून चांगले लाभ होतील. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय जोडीदाराच्या सहमत आणि घेतले जातील. अष्टमस्थानातील गुरुमुळे धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. रेंगाळलेली स्थावरमालमत्तेसंबंधीची कामे मार्गी लागतील. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. भाग्यस्थानातील बुधामुळे तरुणांना स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी लाभतील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल.

शुभ दिनांक – 12, 13

तूळ – आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली जाईल. वरिष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. आपल्या आजवरच्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. अष्टमस्थ बुधामुळे महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली तरी त्यावर सह्या करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. लाभेश रवीचे भाग्यस्थानातून होणारे भ्रमण आपले कर्तृत्व उजळून टाकणारे राहील.

शुभ दिनांक – 14, 15

वृश्चिक – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पंचमस्थानातून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश येईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी लाभतील. नोकरीत बढती बदलीचे योग येतील. मनाजोग्या ठिकाणी बदली झाल्याने आनंदाचे वातावरण राहील. भागीदारी व्यवसायातून आमदानीत वाढ होईल. नवीन कार्यारंभ केले जातील. उत्तरार्धात महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.

शुभ दिनांक – 16, 17

धनु – आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कुटुंबात धार्मिक शुभ कार्याचे आयोजन केले जाईल. स्वजनांच्या गाठीभेटीतून आनंद लाभेल. गृह सुशोभीकरणासाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. पंचमातील गुरुमुळे नवपरिणींना गोड बातमीची चाहूल लागेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मनाजोग्या शाखेत प्रवेश मिळेल. तीर्थस्थळांना भेटी द्याल. मित्र परिवाराबरोबर सहलीत सहभागी व्हाल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ झाल्यामुळे हाती पैसा येईल. जबाबदारीची कामे स्वीकाराल. महत्त्वाच्या कामात जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल.

शुभ दिनांक – 17, 18

मकर – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या तृतीयस्थानातील नेपच्यूनवरून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे धार्मिक ओढा वाढेल. तीर्थस्थळांना भेटी द्याल. हातून दानधर्म घडतील. घरात धार्मिक शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. नवीन वास्तुत प्रवेश होऊ शकतो. विद्यार्थ्यांना भरघोस यश प्राप्त होईल. लेखक, साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. आपण एखाद्या पुरस्काराचे मानकरी ठराल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. नव्या जोमाने कामाला लागाल.

शुभ दिनांक – 17, 18

कुंभ – आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपण केलेल्या मेहनतीचा योग्य मोबदला आपणास मिळणार आहे. आपल्या कष्टाचे चीज होईल. संशोधन पर अभ्यासक्रमातून यश लाभेल. घरात धार्मिक शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. परदेशस्थ भावंडांच्या गाठीभेटी होतील. कामानिमित्त घडणाऱ्या प्रवासातून कार्यसिद्धी होईल. लघुउद्योग तसेच गृह उद्योगातून नवीन कार्यारंभ केले जातील. आठवड्याच्या उत्तरार्धात घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. कुटुंबातील वातावरण अतिशय आल्हाददायी राहील. पंचमस्थ रवीमुळे संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. सामाजिक कार्यातून नावलौकिक वाढेल.

शुभ दिनांक – 14, 15

मीन – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीतून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे वैयक्तिक उत्कर्षाच्या घटना घडणार आहेत. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. कुटुंबातील सदस्यांसंबंधी सुवार्ता कांनी येईल. भावंड सौख्य लाभेल. नवीन व्यावसायिक करार होतील. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. उत्तरार्धात बड्या व्यक्तींचे पाय घराला लागतील. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. घरात उत्साहाचे वातावरण राहील. मनस्वास्थ्य लाभेल.

शुभ दिनांक – 18

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.