Home » ‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल

‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

प्रत्येकाला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 26 June to 02 July)

मेष – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी चालून येतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मातुल घराण्यातील आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. भागीदारी व्यवसायातील मोठे निर्णय तूर्तास लांबणीवर टाका. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी वाटेल. अध्यात्मिक रुची वाढेल. वडिलोपार्जित इस्टेटीची कामे मार्गी लागतील. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. कोणतीही महत्वाची कामे करताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. राशीस्वामी मंगळ व्ययेश शुक्राबरोबर भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. मानसिक ताण-तणाव जाणवण्याची शक्यता राहते.

शुभ दिनांक – 26, 27

वृषभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. संततीच्या प्रगतीची वार्ता कानी येईल. मातुल घराण्याच्या गाठीभेटीतून आनंद मिळवाल. धनस्थानातील रवी, बुधामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. जुनी व्यावसायिक येणे वसूल होतील. आपल्या गोड बोलण्यामुळे अनेक रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. कुटुंबात आपला दरारा वाढेल. नवीन व्यावसायिक शुभारंभातून लाभ घडतील. कामाचा व्याप वाढेल. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. अनपेक्षित धनप्राप्ती होईल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. उत्तरार्धात एखादी फसवी संधी येऊ शकते. तेव्हा सावध राहावे, कोणतेही निर्णय घेताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊनच आपले मत ठरवावे.

शुभ दिनांक – 30, 1

मिथुन – आपल्या राशीतून रवी आणि बुधाचे भ्रमण होत आहे तर राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. गृहसुशोभीकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. आईच्या प्रकृतीची काळजी वाटेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. समाजात आपल्या मतांचा आदर केला जाईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. कुटुंबीयांना वेळ देता येईल. जोडीदाराच्या सहकाऱ्यांनी रेंगाळलेली काही कामे मार्गी लावता येतील. उत्तरार्धात जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक – 1, 2

कर्क – आठवड्याच्या सुरुवातीलाच तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. भावंडांशी सुसंवाद साधाल. ठरवलेली कामे पूर्णत्वास नेताना काही अडचणींना सामोरे जावे लागेल. कौटुंबीक शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. कुटुंबीयांसंबंधीच्या सुवार्ता कानी येतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपली प्रशंसा होईल.

शुभ दिनांक – 29

सिंह – आपल्या राशीतून मंगळाचे तर धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. धनस्थानावर असलेल्या शनीच्याा दृष्टीमुळे जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. धाडसी निर्णय घेतले जातील. क्रीडापटूंना क्रीडा क्षेत्रात चांगले यश मिळेल. लाभस्थानातील रवी, बुधामुळे राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तरुणांना नावलौकिक लाभेल. सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्याल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. आठवड्याच्या उत्तरार्धात घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल.

शुभ दिनांक – 1, 2

कन्या – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्याच राशीतून चंद्राचे भ्रमण होत आहे. इम्पोर्ट एक्स्पोर्टच्या व्यवसायातूनन लाभ होतील. अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता राहते. कुटुंबात धार्मिक कार्याचे आयोजन केले जाईल. कामानिमित्त प्रवास घडतील. भावंडसौख्य लाभेल. स्वजनांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. गृह उद्योगातून कामाचा व्याप वाढेल. उत्तरार्धात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून चांगले यश मिळेल. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचा प्रयत्न करत असणाऱ्याा विद्यार्थ्यांना यश लाभेल.

शुभ दिनांक – 26, 27

तूळ – आपल्या राशीच्या द्वादशभावातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तेव्हा आठवड्याच्या सुरुवातीलाच कामानिमित्त प्रवास योग घडून येतील. आपल्या प्रकृतीची हेळसांड करू नका. मनस्वास्थ्य बिघडवणारी एखादी घटना घडण्याची शक्यता राहते. तेव्हा कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे विचार करून मगच निर्णय घ्यावा. आठवड्याच्या उत्तरार्धात जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वेळ द्यावा लागेल. भावंडांशी सुसंवाद साधाल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील.

शुभ दिनांक – 30, 1

वृश्चिक – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. दशमातील मंगळ मात्र नोकरीत बढतीचे योग दर्शवतो. आपल्या मतांचा आदर केला जाईल. प्रवासात आपली प्रकृती तसेच खिसा – पाकीट सांभाळावे. राशी स्वामी मंगळाची आपल्या राशीवर दृष्टी असल्यामुळे आपल्या कर्तृत्वाला झळाळी येणाऱ्या घटना घडतील. नवनवीन व्यावसायिक उपक्रम राबवण्यात यशस्वी व्हाल.

शुभ दिनांक – 30 ते 2

धनु – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या कर्मस्थानातून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे तरुणांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून काम केले तर एखादी सवलत नक्की मिळेल. गुरु, रवी आणि बुधाची आपल्या राशीवर पूर्ण दृष्टी असल्यामुळे महत्त्वाकांक्षेच्या जोरावर मोठी मजल माराल. आपल्या धोरणी वृत्तीमध्ये वाढ होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लावताना बड्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. अनोळखी व्यक्तींपासून मात्र सावध रहा.

शुभ दिनांक – 27

मकर – आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण आपल्या वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने पूरक राहील. नवनवीन उपक्रम राबवण्यात यशस्वी व्हाल. अनेक नवीन व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नवीन झालेल्या ओळखीतून लाभ होतील. आपल्या मित्र परिवारात वाढ होईल. स्वजनांबद्दल आपुलकी वाटेल. व्यवसाय उद्योगात येणाऱ्या अडचणींवर मात कराल. षष्ठस्थानातील रवी आणि बुधामुळे आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. अष्टमातील मंगळामुळे मात्र उष्णतेचे विकार जाणवू शकतात. आठवड्याचा उत्तरार्ध आपल्या इच्छा – आकांक्षा पूर्ततेचा राहील.

शुभ दिनांक – 30, 1

कुंभ – आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपल्या राशीत शनी तर सप्तमस्थानात मंगळ असल्यामुळे जोडीदाराचे वर्चस्व वाढणार आहे. त्यामुळे घरात आपल्याला कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाचा विरोध करून चालणार नाही. भागीदारी व्यवसायातून धाडसी निर्णय घेतले जातील. नवीन कार्यारंभ होतील. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश लाभेल. नोकरीच्या सुसंधी चालून येतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. आजवर रेंगाळलेल्या सरकारी कामांना गती मिळेल.

शुभ दिनांक – 27

मीन – आपल्या राशीच्या सप्तम स्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण जोडीदाराचा उत्कर्ष करणारी राहील. आपल्या वैयक्तिक कामात जोडीदाराचे सहकार्य लाभेल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आहार विहारावर नियंत्रण ठेवावे. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. उत्तरार्धात तरुणांना नोकरीच्या चांगल्या संधी चालून येतील.

शुभ दिनांक – 2

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.