Home » ‘या’ राशींना मिळणार व्यावसायिक यश

‘या’ राशींना मिळणार व्यावसायिक यश

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 08 May to 14 May)

मेष – आपल्या राशीतून रवी, बुध, गुरु, राहू आणि हर्षल यांचे भ्रमण तर पराक्रम स्थानातून शुक्र-मंगळाचे आणि अष्टमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. धाडसी निर्णय घेतले जातील. व्यवसाय उद्योगातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या जातील. मात्र वडील भावंडांच्या सहकार्याने आपले व्यावसायिक निर्णय यशस्वी केले जातील. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. अविचाराने कोणतेही निर्णय घेऊ नका. 10 मे रोजी राशी स्वामी मंगळ आपल्या सुखस्थानात प्रवेश करत आहे. घरातील सुख सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिकच्याा वस्तूंची खरेदी केली जाईल. आठवड्याच्या उत्तरार्धात तीर्थस्थळांना भेटी दिल्या जातील. तरुणांना नोकरीच्या चांगल्या संधी चालून येतील. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. आपल्या इच्छा अपेक्षांची पूर्तता होईल. जुनी येणी वसूल होतील.

शुभ दिनांक – 12 ते 14

वृषभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. व्ययस्थानात असलेले ग्रहाधिक्य कामानिमित्त दूरचे प्रवास घडवेल. त्याचप्रमाणे व्ययस्थानात असलेल्या गुरूमुळे तीर्थस्थळांना भेटी द्याल. अध्यात्मिक प्रगती होईल. हातून दानधर्म होतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्याल. आपल्या मतांचा कुटुंबात तसेच समाजात आदर केला जाईल. सरकारी नोकरीत असलेल्या तरुणांना मनाजोग्या ठिकाणी बदली मिळेल. समजदारीने कामे केली तर आपणास अनुकूल असे यश लाभेल. पराक्रम स्थानात येणारा मंगळा आपणांस धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल. उत्तरार्धात नोकरी व्यवसायात चांगली भरभराट झाल्यामुळे हाती पैसा येईल. आपल्या श्रमा बरोबरच नशिबाची चांगली साथ मिळाल्यामुळे फायदा होईल. मन प्रसन्न राहील.

शुभ दिनांक – 8, 9

मिथुन – आपल्या राशीतून शुक्र, मंगळाचे भ्रमण होत आहे तर लाभस्थानातून रवी, बुध, गुरु, राहू, हर्षलचे आणि षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असणाऱ्या तरुणांना यश लाभेल. आपण केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. कोर्ट कचेरीच्या कामातून आपल्या बाजूने निकाल लागेल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून तसेच संशोधन पर अभ्यासक्रमातून फायदा होईल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. मन प्रसन्न होणाऱ्या घटना घडतील. मित्र परिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. कवी, कलाकारांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. कौटुंबिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. शुभ दिनांक – 13, 14

कर्क – आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे प्रमाण होत आहे. दशम स्थानात ग्रहाधिक्य असून व्ययस्थानात शुक्र, मंगळ आहेत. तेव्हा सामाजिक पतप्रतिष्ठा वाढेल अशी खरेदी केली जाईल. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. 10 मे रोजी दशमेश मंगळ आपल्या राशीत प्रवेश करत आहे. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. नवनवीन व्यावसायिक उपक्रम राबवली जातील. उत्तम संभाषण चातुऱ्याच्या जोरावर अनेक रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यात यश येईल. स्वतःसाठी महागड्या वस्तूंची खरेदी कराल. महत्त्वाचे निर्णय घेताना तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन जरूर घ्यावे. धार्मिक रुची वाढेल. धार्मिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. संत सज्जनांचा सहवास लाभेल.

शुभ दिनांक – 11, 12

सिंह – आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. राशी स्वामी रवी आणि धनेश बुध यांची गुरु बरोबर भाग्यस्थानातून युती होत आहे. कुटुंबातील सदस्यांसंबंधी सुवार्ता कानी येतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. घरात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. संत सज्जनांचा सहवास लाभेल. गृह सुशोभीकरणासाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपला नावलौकिक वाढेल. नवीन व्यावसायिक कार्यारंभ केले जातील. इलेक्ट्रॉनिकच्या व्यवसायातून लाभ होतील. आपली आर्थिक बाजू भक्कम होण्याच्या दृष्टीने नशिबाची चांगली साथ लाभेल. वैयक्तिक दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून भरघोस यश लाभेल.

शुभ दिनांक – 8 ते 10

कन्या – आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आपल्या कामात वेगवान प्रगती घडविणारे राहील. तर राशीच्या लाभस्थानात येणारा मंगळ आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देणारा राहील. राशीचा अष्टमेश असलेला मंगळ लाभस्थानात असून धनस्थानावर मंगळाची दृष्टी असल्यामुळे वडिलोपार्जित इस्टेटीतून चांगली आवक होईल. वडीलधाऱ्या व्यक्तींचे चांगले सहकार्य लाभेल‌. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. एकीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्या तर दुसरीकडे व्यवसाय उद्योगात होणारी धावपळ यामुळे होणारी तारेवरची कसरत आपल्याला नवनवीन अनुभव देणारी राहील. कवी, कलाकार यांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात मोलाचा सहभाग घ्याल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. हातून पुण्य कर्म घडेल. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी लाभेल. विद्यार्थ्यांना संशोधन पर अभ्यासक्रमातून यश मिळेल. मित्र परिवाराच्या सहकार्याने धाडसी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी कराल.‌

शुभ दिनांक – 11 ते 13

तूळ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. पंचमस्थानात शनि तर सप्तमस्थानातून रवी, बुध, गुरु, राहू आणि हर्षल यांचे भ्रमण होत आहे. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. भाग्यस्थानातील मंगळ शुक्रामुळे जोडीदाराबरोबर सहलीला जाण्याचे योग येतील. 10 मे रोजी सप्तमेश मंगळ आपल्या राशीच्या दशम स्थानात प्रवेश करत आहे. तरुणांच्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. अंगभूत कला गुणांना चांगला वाव मिळेल. भागीदारी व्यवसायातून नवीन प्रकल्प राबवले जातील. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. भावंडांच्या सहकार्याने अनेक कामे मार्गी लावता येतील. आपल्या उत्तम संवाद शैलीमुळे अनेकांना आपलेसे कराल. उत्तरार्धात घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. आनंदी आणि प्रसन्न वातावरणामुळे हा आठवडा आपल्याला खूप समाधान देणारा राहील.

शुभ दिनांक – 11, 12

वृश्चिक – आपल्याच राशीतून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे, तर रवी, बुध, गुरु, राहू आणि हर्षल यांचे षष्ठस्थानातून भ्रमण होत आहे, असे अतिशय अनुकूल असे ग्रहमान आपल्याला लाभलेले आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात नावलौकिक लाभेल. आपल्याला अनेक सुसंधी चालून येतील त्याचा निश्चित फायदा घ्यावा. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैयक्तिक तसेच कौटुंबिक उत्कर्षामुळे मन प्रसन्न राहील. रेंगाळलेली सरकारी कामे, वडिलोपार्जित जमीन जुमल्या संबंधीची कामे मार्गी लागतील व त्यातून फायदा होईल. भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. उत्तरार्धात स्वजनांच्या गाठीभेटीमुळे संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. धार्मिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. अध्यात्मिक प्रगती होईल.

शुभ दिनांक – 8 ते 9

धनु – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण कामानिमित्त प्रवास योग दर्शविते. विदेशात आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यात यश येईल. व्यवसाय उद्योगात मोठे प्रकल्प हाती घ्याल. धाडसी निर्णय घेतले जातील. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. कवी, कलाकार यांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. अंगभूत कला गुणांना चांगला वाव मिळेल. आपले आवडते छंद जोपासता येतील. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. सप्तमस्थानात होणाऱ्या मंगळ, शुक्राच्या युतीमुळे आपणावर मातालक्ष्मी प्रसन्न राहील. उत्तरार्धात मंगळाचा अष्टमस्थानात प्रवेश होत आहे. गोड बोलून कामे करून घ्यावी लागतील. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक घ्यावेत नाहीतर नुकसान संभवते. धार्मिक कार्यात रुची वाढेल. तीर्थस्थळांना भेटी द्याल. दानधर्म कराल. उत्तरार्धात भावंडांचे सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक – 9, 10

मकर – आपल्या राशीच्या लाभस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आपणास सुख समाधान देणारे राहील. लाभस्थानावर असलेल्या शुक्राच्या दृष्टीमुळे कवी, कलाकारांना हा आठवडा भाग्यकारक ठरेल. नवनवीन कल्पना आकार घेतील. विरंगुळ्यासाठी सहलीचे आयोजन केले जाईल. मित्रपरिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. एखादे रेंगाळलेले काम बड्या व्यक्तींच्या सहकार्याने पूर्णत्वास जाईल. आपले ध्येय गाठण्यात यश लाभेल. कोर्ट कचेरी संबंधीच्या कामातून आपणास फायदा होईल. समाजात आपली पत-प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहाल. तरुणांच्या कौशल्याला वाव मिळेल. नोकरीतील कामानिमित्त मनात उभ्या ठिकाणी बदलीची ऑर्डर येईल. इच्छित गोष्टी सहज साध्य होतील. उत्तरार्धात जुनी येणी वसूल होतील.

शुभ दिनांक – 11, 12

कुंभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या कर्मस्थानातून चंद्राचे भ्रमण होत असल्याने तरुणांना नोकरीच्या सुसंधी चालून येतील. आपल्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल. वरिष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. दशमेश मंगळाचा षष्ठ स्थानात होणारा प्रवेश आपल्या कर्तृत्वाला यशाची झालर चढविणारा राहील. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. उत्तरार्धात धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तीर्थस्थळांना भेटी दिल्या जातील. परदेशस्थ भावंडांची सुसंवाद साधाल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

शुभ दिनांक – 13, 14

मीन – राशीस्वामी गुरुचे धनस्थानातून तर चंद्राचे लाभस्थानातून होणारे भ्रमण आपल्या उत्कर्षास अनुकूल फलदायी ठरेल. नवीन संधी चालून येतील. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात . बेकारांना रोजगार मिळेल.विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे योग येतील. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश लाभेल. न्यायप्रविष्ट प्रकरणात आपल्या बाजूने निर्णय लागल्याने मन शांत होईल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. मन प्रसन्न होणाऱ्या घटना घडतील. भविष्यकाळाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करता येईल. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ केले जातील. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील.

शुभ दिनांक – 11, 12

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.