Home » ‘या’ राशीचे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार

‘या’ राशीचे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 15 May to 21 May)

मेष – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण कामानिमित्त प्रवास योग दर्शविते. विदेशात आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यात यश येईल. व्यवसाय उद्योगात मोठे प्रकल्प हाती घ्याल. धाडसी निर्णय घेतले जातील. राशीतील बुध, गुरु, राहू निरनिराळ्या संधी उपलब्ध करून देतील. धार्मिक शुभ समारंभात सक्रिय सहभाग राहील. हातून दानधर्म घडतील. संत सज्जनांचाचा सहवास लाभेल. आपल्या संभाषणाचातुर्याच्या जोरावर जनसंपर्कातून लाभ करून घ्याल. धनस्थानातील रवी आपली आर्थिक बाजू भक्कम करणारा राहील. वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. कुटुंबात आपल्या मतांचा आदर वाढेल. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक घ्यावेत.

शुभ दिनांक – 19 ते 21

वृषभ – राशीच्या लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. राशीतून होणाऱ्या रवी भ्रमणामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. स्वकर्तृत्वाच्या बळावर मोठे निर्णय घ्याल. व्ययस्थानातून बुध, गुरु, राहू आणि हर्षल यांचे भ्रमण होत आहे. इम्पोर्ट-एक्सपोर्टच्या व्यवसायातून लाभ होतील. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या जातील. परदेशात आपला व्यवसाय वृद्धिंगत करता येईल.
तीर्थस्थळांना भेटी द्याल. आध्यात्मिक प्रगती होईल. दानधर्म कराल. आपल्या मतांचा कुटुंबात आदर केला जाईल. प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. कामानिमित्त झालेले प्रवासातून कार्यसिद्धी होईल. उत्तरार्धात कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाता येईल.

शुभ दिनांक – 15, 16

मिथुन- आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या कर्मस्थानातून चंद्राचे भ्रमण होत असल्याने तरुणांना नोकरीच्या सुसंधी चालून येतील. आपल्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल. वरिष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. बेकारांना नोकरीच्या सुसंधी चालून येतील. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. कोर्ट कचेरीच्या कामात तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. मित्र परिवाराच्या गाठी भेटीतून आनंद लाभेल. उत्तरार्धात धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तीर्थस्थळांना भेटी दिल्या जातील. परदेशस्थ भावंडांची सुसंवाद साधाल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

शुभ दिनांक – 15, 16

कर्क – आपल्या राशीतून मंगळाचे तर भाग्यशनातून चंद्राचे भ्रमण होत आहे. दशमातील बुध, गुरु, राहूमुळे चांगल्या संधी चालून येणार आहेत. त्या संधीचा फायदा आपणास भविष्यकाळातील भरभराटीच्या दृष्टीने अनुकूल राहील. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात . बेकारांना रोजगार मिळेल. आपण केलेल्या चांगल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असणाऱ्या तरुणांना यश लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत नावलौकिक प्राप्त होईल. न्याय प्रविष्ट प्रकरणात आपल्या बाजूने निकाल लागेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे योग येतील. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश लाभेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल.

शुभ दिनांक – 15, 16

सिंह – आपल्या राशीच्या अष्टमस्थानातून होणाऱ्या चंदाच्या भ्रमणामुळे कोणतेही धाडसी निर्णय घेऊ नका. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. संत सज्जनांचा सहवास लाभेल. भाग्यस्थानातील बुध, गुरु, राहूमुळे धार्मिक सरांना भेटी द्याल. कामानिमित्त प्रवास घडतील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. विविध मार्गाने अर्थार्जन होईल. नोकरी अधिकाऱ्यांकडून आपल्या कामाचे कौतुक होईल. आपल्या मतांचा आदर केला जाईल. राजकीय क्षेत्रातून विविध उपक्रम राबवण्यात यश येईल. वडिलांचे चांगले सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक – 17 ते 19

कन्या – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे भागीदारी व्यवसायातून व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात यश मिळेल. मोठे निर्णय घेताना मात्र योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन जरूर घ्यावे. अध्यात्मिक ओढा वाढेल. मात्र अंधश्रद्धेला बळी पडू नका. अष्टमातील बुधामुळे कोणताही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडून आपली नुकसान करून घेऊ नका. उत्तरार्धात भाग्य स्थानातील रवीमुळे आणि लाभस्थानातील मंगळामुळे आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी लाभेल.

शुभ दिनांक – 20, 21

तूळ – आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे स्वजनांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. सप्तमातील बुध, गुरु, राहू आपणासाठी अनुकूल फलदायी ठरतील. विवाहेच्छूक तरुणांना मनापासून तर जोडीदार मिळेल. कामानिमित्त प्रवास घडतील. अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता राहते. अनोखी व्यक्तीवर विश्वास ठेवून कोणतेही कार्य करू नका. कामाचा व्याप वाढेल. आपल्या प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल. लेखकांच्या हातून दर्जेदार लेखन होईल. मनस्वास्थ्य लाभेल.

शुभ दिनांक – 17, 18

वृश्चिक – आठवड्याच्याराशी सुरुवातीला आपल्या राशीच्या पंचमास्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याचे प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. संशोधन पर अभ्यासक्रमातून यश लाभेल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. अध्यात्मिक उन्नती होईल. नवपरिणींना गोड बातमीची चाहूल लागेल. षष्ठस्थानातील बुध गुरुमुळे तरुणांना नोकरीच्या चांगल्या संधी चालून येतील. सहकाऱ्यांचे चांगले सहाय्य लाभल्यामुळे आपली कामे सहजतेने मार्गी लागतील. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. उत्तरार्धात करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल.

शुभ दिनांक – 15, 16

धनू – आपल्या राशीच्या सुखस्थानात चंद्राचे भ्रमण होत असल्याने नवीन वाहन वास्तूचे योग दिसून येतात. घरात मंगल कार्याची नांदी होईल. गृह सुशोभीकरणासाठी आकर्षक वस्तूंची खरेदी केली जाईल. थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रकृतीच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष करू नका. उष्णतेचे विकार, पित्त विकार, नेत्र विकार यांचा त्रास होण्याची शक्यता राहते. उत्तरार्धात जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची पूर्तता झाल्याने हाती पैसा येईल.

शुभ दिनांक – 18, 19

मकर – आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आपल्या कामात वेगवान प्रगती घडविणारे राहील. तर राशीच्या सप्तमस्थानातील मंगळ आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देणारा राहील. वडीलधाऱ्या व्यक्तींचे चांगले सहकार्य लाभेल‌. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. एकीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्या तर दुसरीकडे व्यवसाय उद्योगात होणारी धावपळ यामुळे होणारी तारेवरची कसरत आपल्याला नवनवीन अनुभव देणारी राहील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात मोलाचा सहभाग घ्याल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. हातून पुण्य कर्म घडेल. विद्यार्थ्यांना संशोधन पर अभ्यासक्रमातून यश मिळेल. मित्र परिवाराच्या सहकार्याने धाडसी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी कराल.‌

शुभ दिनांक – 20, 21

कुंभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. पारिवारिक जीवनात आनंददायी घटना घडतील. वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. आपल्याला मिळालेल्या संधींचा फायदा घेतल्यास भविष्यात चांगले लाभ होतील. समजदारीने वागण्याची जरुरी आहे. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगली आवक होईल. नशिबाची चांगली साथ मिळेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. भावंडांशी सुसंवाद साधाल. आठवड्याच्या उत्तरार्धात बड्या व्यक्तींच्या सहकार्यामुळे मोठे निर्णय घेणे सोपे जाईल. भूतदया दाखवाल. कवी, कलाकारांना आपल्या कलेला वाव देता येईल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल.

शुभ दिनांक – 15 ते 17

मीन – आपल्या राशीतून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपल्याराजकीय अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. नवनवीन उपक्रम राबवाल. सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रात आपला चांगला नावलौकिक होईल. व्यवसाय उद्योगात नवीन संधी चालून येतील. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या जातील. महत्त्वाचे निर्णय घेण्यात आणि पार पाडण्यात कुटुंबीयांचे चांगले सहकार्य लाभेल. या आठवड्यात कितीतरी आनंदाचे क्षण आपल्या वाट्याला येतील आणि इच्छित गोष्टी प्राप्त होतील. पराक्रमस्थानातील रविमुळे आत्मविश्वास वाढल्याने धाडसी निर्णय घेतले जातील. आठवड्याच्या उत्तरार्धात स्वजनांचा सहभास लाभेल. कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन होईल. भावंडांचे चांगले सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक -19, 20

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.