Home » ‘या’ राशीची आर्थिक बाजू राहील भक्कम

‘या’ राशीची आर्थिक बाजू राहील भक्कम

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 19 June to 25 June)

मेष – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातील रवीवरून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे धाडसी निर्णय घेतले जातील. वैयक्तिक उत्कर्षाच्या घटना घडतील. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. महत्त्वाची कामे चर्चेतून मार्गी लागतील. सुखस्थानातील शुक्र, मंगळामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. कौटुंबिक गैरसमज दूर होतील. वाहन-वास्तूचे योग असल्याने खरेदी केली जाईल. गृह सुशोभीकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी होईल. घरातील सुख सुविधा वाढवण्यासाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी होईल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. स्वजनांबरोबर वेळ मजेत घालवाल. उत्तरार्धात नोकरीत भरतीचे योग संभवतात.

शुभ दिनांक – 24, 25

वृषभ – आपल्या राशीतून बुधाचे तर धनस्थानातून रवि-चंद्राचे भ्रमण होत आहे.गोड बोलून आपली रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यात यश लाभेल. आपले कर्तृत्व आणि नेतृत्व शक्ती दिसून येईल. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल भावंड सौख्य लाभेल. भावंडांसाठी खरेदी कराल. दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सहलीत सहभागी व्हाल. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. कौटुंबिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. लेखक, साहित्यिक यांच्या दर्जेदार लिखाणास पुरस्कार प्राप्त होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल.

शुभ दिनांक – 23 24

मिथुन – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीतील रवीवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपल्या कार्याची समाजाकडून प्रशंसा होईल. नवीन कार्यारंभ केले जातील. आपल्या मतांचा समाजात आदर केला जाईल. धनस्थानातून होणाऱ्या शुक्र मंगळाच्या भ्रमणामुळे आपली आर्थिक बाजू भक्कम राहणार आहे नोकरीत बढती बदलीचे योग येतील. कुटुंबात अत्याधुनिक वस्तूंची खरेदी केली जाईल. भावंड सौख्य लाभेल. कामानिमित्त घडणाऱ्या प्रवासातून कार्यसिद्धी होईल. उत्तरार्धात कुटुंबात पाहुण्यांची वर्दळ राहील. स्वजनांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल.

शुभ दिनांक – 19 ते 21

कर्क – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या व्ययस्थानातील धनेश रवीवरून चंद्राचे भ्रमण होतत आहे. तेव्हा अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता राहते. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. राशीतील शुक्र, मंगळामुळे वैयक्तिक उत्कर्षाच्या वार्ता कानी येतील. कवी कलाकारांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. सामाजिक पतप्रतिष्ठाा उंचावेल. आठवड्याच्या उत्तरार्धात जुनी येणी वसूल होतील. कामानिमित्त प्रवास घडतील. इम्पोर्ट एक्स्पोर्टच्या व्यवसायातून चांगले लाभ होतील.

शुभ दिनांक – 21 ते 23

सिंह – राशीस्वामी रवीचे लाभस्थानातून होणारे भ्रमण आपल्या रेंगाळलेल्या कामांना गती देणारे राहील. सरकारी कामे मार्गी लागतील. स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांना यश लाभेल तसेच सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांना सुसंधी लाभतील. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून फायदा होईल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. मित्र परिवाराच्या सहकार्याने कठीण गोष्टी सहज साध्य करता येतील. व्ययस्थानातील शुक्र मंगळामुळे सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल अशी खरेदी केली जाईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. सहलीत सहभागी व्हाल. उत्तरार्धात हाती पैसा येईल.

शुभ दिनांक – 23 ते 25

कन्या – आपल्या राशीच्या दशमस्थानातून रवीचे तर भाग्यस्थानातून राशीस्वामी बुधाचे भ्रमण होत आहे. कामानिमित्त परदेश प्रवास घडतील. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याने रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल. बढती बदलीचे योग संभवतात. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल. कवी, कलाकार, गायक, वादक यांना कलाक्षेत्रात चांगला नावलौकिक लाभेल. क्रीडाक्षेत्रात खेळाडूंना पुरस्कार मिळतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रातून सतत कार्यरत राहाल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. या आठवड्यातील ग्रहमान अतिशय अनुकूल असल्यामुळे सर्व गोष्टी मनाजोग्या घडणार आहेत. वैयक्तिक उत्कर्ष होईल.

शुभ दिनांक – 24, 25

तूळ – आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून रवीवरून चंद्राचे भ्रमण होत आहे तर दशमस्थानातून मंगळ- शुक्र भ्रमण होत आहे. नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. नोकरीतील कामानिमित्त मनाजोग्या ठिकाणी बदलीची ऑर्डर मिळेल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. आपले आवडते छंद जोपासता येतील, तसेच त्यांना व्यावसायिक स्वरुप देखील देता येईल. कलाकारांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. समाजात आपली पतप्रतिष्ठा उंचावेल. कामानिमित्त प्रवास घडतील. तसेच धार्मिक स्थळांना भेटी द्याल. हातून दानधर्म घडतील. सामाजिक राजकीय क्षेत्रातून आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. नवीन मार्ग खुले होतील.

शुभ दिनांक – 19, 20

वृश्चिक – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या अष्टमस्थानातून दशमेश रवीवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरीत बदल करु नयेत. वरिष्ठांची मर्जी संपादन करुन काम करावे लागेल. Boss is always right हे विसरून चालणार नाही. कोणतीही महत्वाची कामे करताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. राशीस्वामी मंगळ व्ययेश शुक्राबरोबर भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. कामानिमित्त परदेश प्रवास घडतील. मानसिक ताण-तणाव दूर होतील. स्वजनांचे सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक – 23, 24

धनु – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सप्तमस्थानातील रवीवरून चंद्राचे भ्रमण होत आहे. जोडीदाराचे वर्चस्व वाढेल जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विवाहेच्छूक तरुणांना मनापसंत जोडीदार मिळेल. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ कराल. अष्टमस्थ शुक्र-मंगळामुळे कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होतील. प्रकृतीच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष करू नका. उष्णतेचे विकार, पित्तविकार यांचा त्रास होऊ शकतो. उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी लाभतील.

शुभ दिनांक – 19, 20

मकर – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या षष्ठस्थानातील रवी वरून चंद्राचे भ्रमण होत आहे. आरोग्याच्या तक्रारी हळूहळू दूर होतील. मनस्वास्थ लाभेल. नोकरीत आपण केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. तसेच एखाद्या सवलतीचा लाभही मिळेल. सप्तमातील शुक्र मंगळामुळे जोडीदाराच्या भरभराटीस अनुकूल काळ राहील. जोडीदाराचे वर्चस्व वाढेल. दैनंदिन जीवनातून विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न कराल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उत्तरार्धात अनपेक्षित धनप्राप्ती होईल. वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने हा आठवडा आपणास अनुकूल फलदायी ठरेल.

शुभ दिनांक – 24, 25

कुंभ – पंचमस्थानातील रवीवरून चंद्राचे होणारे भ्रमण संततीच्या उत्कर्षाची वार्ता देणारे राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या दृष्टीने मित्र परिवाराचे चांगले सहकार्य मिळेल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. तरुणांना नोकरीच्या चांगल्या संधी चालून येतील. आपल्या अंगभूत कलाआपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. जुनी येणी वसूल होतील. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. उष्णतेचे विकार तसेच संसर्गजन्य विकारांचा त्रास होऊ शकतो. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. उत्तरार्धात मनाविरुद्ध एखादी घटना घडू शकते. तेव्हा नाराज न होता आलेल्या परिस्थितीला मोठ्या शिताफिने सामोरे जा.

शुभ दिनांक – 22 ते 24

मीन – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कौटुंबिक शुभ समारंभात सक्रिय सहभाग घ्याल. वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, ऊर्जावर्धक राहील. पंचम स्थानातील शुक्र, मंगळ कलाकार तसेच खेळाडूंना अनुकूल फलदायी ठरतील. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला भाव मिळेल. आवडते छंद जोपासता येतील. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. भागीदारी व्यवसायातून लाभ होतील. उत्तरार्धात प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्षष करू नका.

शुभ दिनांक – 20, 21

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.