Home » ‘या’ राशींच्या व्यक्तींना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी

‘या’ राशींच्या व्यक्तींना घ्यावी लागेल आरोग्याची काळजी

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 22 May to 28 May)

मेष – आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आपल्या कामात वेगवान प्रगती घडविणारे राहील. मानसिक ताणतणाव दूर होतील. आपल्या बोलण्याने भावंडे नाराज होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. कामानिमित्त प्रवास घडेल. मात्र प्रवासातून थकवा जाणवू शकतो. सुखस्थानातील मंगळामुळे घरात अत्याधुनिक सुख सुविधांसाठी खर्च केला जाईल. घरातील वातावरण शांत ठेवण्याकडे लक्ष द्यावे. आपली मते कुटुंबीयांवर लाजू नका. लघुउद्योग तसेच गृहउद्योगातून लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात मोलाचा सहभाग घ्याल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. हातून पुण्य कर्म घडेल. विद्यार्थ्यांना संशोधन पर अभ्यासक्रमातून यश मिळेल. मित्र परिवाराच्या सहकार्याने धाडसी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी कराल.‌ योगसाधना तसेच ध्यानधारणेच्या जोरावर कणखर बनाल.

शुभ दिनांक – 22, 23

वृषभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. अर्थार्जनाचे नवे मार्ग खुले होतील. स्वजनांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. घरातील वातावरण अतिशय प्रसन्न राहणार आहे. मानसिक ताण-तणाव दूर होतील. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. परदेशस्थ भावंडांशी सुसंवाद साधाल. आपल्या व्यवसाय उद्योगाच्या दृष्टीने प्रवास घडतील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. शेजाऱ्यांचेे सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक शुभ समारंभाचे आयोजन होईल. घरातील सुख सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक वस्तूंची खरेदी केली जाईल. सतत कार्यरत राहाल. संतती संबंधित वार्ता कानी येथीलसंतती संबंधित वार्ता कानी येईल. आपल्या इच्छा, आकांक्षांची पूर्तता झाल्याने आनंदी राहाल. मित्र परिवारासोबत वेळ मजेत घालवाल.

शुभ दिनांक – 24, 26

मिथुन – आपल्याच राशीतील शुक्रावरून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. कवी, कलाकारांना चांगल्या संधी चालून येतील. लाभस्थानातील बुध, गुरु, राहू आणि हर्षल यांच्या भ्रमणामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक वाढली करताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. धनस्थानातील लाभेश मंगळावरून चंद्राचे भ्रमण होताना अर्थार्जनाचे अनेक मार्ग खुले होतील. कुटुंबीयांवर आपली मते लादू नका. सामाजिक, राजकीय क्षेत्रात नावलौकिक लाभेल. आपल्याला अनेक सुसंधी चालून येतील त्याचा निश्चित फायदा घ्यावा. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैयक्तिक तसेच कौटुंबिक उत्कर्षामुळे मन प्रसन्न राहील. भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. धार्मिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. अध्यात्मिक प्रगती होईल. मनस्वास्थ्य लाभेल.

शुभ दिनांक – 22 ते 24

कर्क – आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. दैनंदिन जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सहलीत सहभागी व्हाल. नशिबाची चांगली साथ आपल्याला या आठवड्यात लाभणार आहे. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ होतील. जुनी व्यावसायिक येणे वसूल होतील. कलाक्षेत्रातून व्यावसायिक प्रदर्शने भरवता येतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचा लाभ घ्याल. राशीतील मंगळामुळे आपला आत्मविश्वास आणि नेतृत्व शक्ती यांच्या जोरावर मोठी मजल माराल. या आठवड्यात कितीतरी आनंदाचे क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत.

शुभ दिनांक – 24, 25

सिंह – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या लाभस्थानातील शुक्रावरून चंद्राचे भ्रमण होत आहे. लाभातील शुक्रामुळे मित्र परिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. नवनवीन उपक्रम यशस्वीपणे राबवले जातील. आजवर रेंगाळलेली कामे सहजतेने मार्गी लागतील. सामाजिक राजकीय क्षेत्रातून पत प्रतिष्ठा उंचावेल. कोणतेही निर्णय घेताना घाईघाईनेे घेऊ नका. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. आपल्या उत्तम संवाद शैलीमुळे अनेकांना आपलेसे कराल. नवीन ओळखी होतील, त्यातून भविष्यात निश्चित लाभ होतील. उत्तरार्धात घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. आनंदी आणि प्रसन्न वातावरणामुळे हा आठवडा आपल्याला खूप समाधान देणारा राहील.

शुभ दिनांक – 27, 28

कन्या – दशमस्थानातील धनेश शुक्रावरून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे. अनेक मार्गांनी अर्थार्जण होईल. नवनवीन प्रकल्प यशस्वीरित्या राबवले जातील. कर्म स्थानातून होणारे शुक्राचे हे भ्रमण आपणासाठी आनंददायी आणि उत्कर्षवर्धक राहील. आजवर रेंगाळलेल्या घटना मार्गी लागतील. वडीलधाऱ्या व्यक्तींचे चांगले सहकार्य लाभेल. तरुणांनी समोर आलेल्या संधींचा फायदा घ्यावा. न्यायप्रविष्ट प्रकरणातून आपल्या बाजूने निकाल लागतील. लाभातील मंगळ आपला आत्मविश्वास वाढवणारा राहील. आपल्या कामाची आखणी करताना प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नये. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. समाजात आपणास चांगला नावलौकिक लाभेल.

शुभ दिनांक – 22, 23

तूळ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तेथूनच राशी स्वामी शुक्राचे होणारे भ्रमण आपल्या वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने अनुकूल फलदायी ठरणारे राहील. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. कलाकारांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग आहेत. सप्तमातील गुरु, बुध, राहू, हर्षलमुळे अनपेक्षितपणे महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेऊन यशस्वी केले जातील. दशामातील धनेश मंगळामुळे तरुणांना नोकरीच्या चांगल्या संधींचा लाभ घेता येईल. नोकरीत बढती बदलीचे योग येतील. अर्थार्जनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवण्यात यश लाभेल. आपल्या इच्छा, अपेक्षा पूर्ण होतील. सरकारी कामे मात्र रेंगाळण्याची शक्यता राहते.

शुभ दिनांक – 26 ते 28

वृश्चिक – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या अष्टमस्थानातील व्ययेश शुक्रावरून चंद्राचे भ्रमणोत आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडून नुकसान करून घेऊ नका. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. वडिलोपार्जित इस्टेट इथून लाभ होऊ शकतात. राशीस्वामी मंगळाचे भाग्यस्थानातून होणारे भ्रमण आपल्या कर्तृत्वाला चांगला उजाळा देणारे राहील. कामानिमित्त प्रवास घडतील, प्रवासातून कार्यसिद्धी होईल. मानसिक ताण-तणाव दूर होतील. स्वजनांचे सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक – 24 ते 26

धनू – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. जोडीदाराबरोबर चांगला वेळ व्यतीत करता येईल. महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय घेतले जातील. पंचमस्थानातील रवी, बुध, गुरु, राहूमुळे आपली सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावणार आहे. मित्र परिवाराचे चांगले सहकार्य लाभणार आहे. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल. नवीन संधी चालून येतील. भागीदारी व्यवसाय उद्योगासाठी केलेली बोलणी यशस्वी होतील. तीर्थस्थळांना भेटी द्याल. हातून पुण्यकर्म घडेल. एकापेक्षा अधिक व्यवसाय करण्याच्या दृष्टीने थोरा-मोठ्यांचे सहकार्य लाभेल. आपल्या मेहनतीने, चिकाटीने व उत्तम बुद्धिमत्तेच्या जोरावर यश संपादन कराल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रहमान अनुकूल राहील.

शुभ दिनांक – 22, 23

मकर – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या षष्ठस्थानातील शुक्रावरून चंद्राचे भ्रमण होत आहे. गायक, वादक, कलाकारांना सुसंधी लाभतील. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. सुखस्थानातील बुध आणि गुरुमुळे कुटुंबातील वातावरण आनंदी, उत्साही राहणार आहे. जोडीदाराचे वर्चस्व राहील. विवाहेच्छूक तरुणांचे ओळखीतून विवाह जमतील. भागीदारी व्यवसायातून नवीन कार्यारंभ कराल. गृह उद्योगातून तसेच लघु उद्योगातून फायदा होईल. रेंगाळलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मनस्वास्थ्य लाभेल. उत्तरार्धात कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका.

शुभ दिनांक – 24 ते 26

कुंभ – राशीतील शनीमुळे आपण शांत संयमी आहात. तसेच गुंतवणुकीचे नवे मार्ग या काळात आपणास उपलब्ध होतील. पराक्रमस्थानातून बुध, गुरुचे तर पंचमस्थानातून शुक्रावरून चंद्राचे भ्रमण होत आहे. भावंडांचे चांगले सहकार्य लाभेल. व्यवसाय वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने विदेशात होणाऱ्या चर्चासत्रास योग्य गती मिळेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश प्राप्ती होईल. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. भाजणे, कापणे, पित्त विकार तसेच संधिवाताचा त्रास संभवू शकतो. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. उत्तरार्धात महत्त्वाच्या कामात जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक – 27, 28

मीन – धनस्थानातील ग्रहाधिक्यामुळे आपली आर्थिक स्थिती मज‌बूत होईल. आपल्या उत्तम संवाद शैलीमुळे इतरांना आपलेसे कराल. कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकाराल. वाहन वास्तूचे योग येतील. घरातील सुखसुविधा वाढवण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. घरातील वातावरण आनंदी उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करावा. संततीच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. हितशत्रूंच्या कारवायांना सामोरे जावे लागेल. कामानिमित्त घडलेल्या प्रवासातून कार्यसिद्धी होईल. कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका. सामाजिक, राजकीय क्षेत्रात सतत कार्यरत राहाल. नवनवीन योजनांची आखणी कराल.

शुभ दिनांक – 25, 26

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.