Home » ‘या’ राशींचे व्यक्ती करू शकतात नवीन व्यवसायाला सुरुवात

‘या’ राशींचे व्यक्ती करू शकतात नवीन व्यवसायाला सुरुवात

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 05 June to 11 June)

मेष – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या अष्टमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. प्रकृतीच्या जुन्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता राहते. प्रवासात आपले खिसा पाकीट सांभाळावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. कामानिमित्त प्रवास घडतील. प्रवासात झालेल्या नवीन ओळखींचा भविष्यात फायदा होणार आहे. तरुणांना नोकरीच्या संधी चालून येतील. आपल्या राशीतून बुध, गुरु, राहू यांचे प्रमाण होत आहे तर दिनांक 7 रोजी बुध आपल्या राशीतून धनस्थानात प्रवेश करत आहे.
धनस्थानातील रवी बुधामुळे आपली आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. नोकरीत बढतीचे योग संभवतात. आपल्या इच्छा आकांक्षापूर्तीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. हाती घेतलेल्या कामात सहज यश लाभेल.

शुभ दिनांक – 7, 8

वृषभ – भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवड्याची सुरुवात खूपच अनुकूल फलदायी ठरणार आहे. नवीन व्यावसायिक शुभारंभ होतील. परंतु प्रत्येक निर्णय घेताना त्यात स्वतः लक्ष घालण्याची गरज आहे. कामानिमित्त प्रवास घडतील. अनोळखी व्यक्तीवर मात्र विश्वास ठेवू नका. कामाचा व्याप वाढला तरी प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. दिनांक 7 जून रोजी आपल्या राशीत बुध प्रवेश करत आहे. आपल्या उत्तम संवाद शैलीच्या जोरावर अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावता येतील. आपल्या मतांचा समाजात आदर केला जाईल. सामाजिक राजकीय क्षेत्रात आपला नावलौकिक वाढेल. उत्तरार्धात नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी चालून येतील.

शुभ दिनांक – 8 ते 10

मिथुन – आठवड्याच्या सुरुवातीला राशीच्या षष्ठ स्थानातील चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून काम करावे लागेल. महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. जोडीदाराची चांगली साथ लाभेल‌. कामानिमित्त परदेश प्रवास घडतील. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. उष्णतेचे विकार, नेत्र विकार यांचा त्रास होऊ शकतो. दिनांक 7 जून रोजी राशीस्वामी बुध आपल्या राशीच्या व्ययस्थानात प्रवेश करत आहे. उत्तरार्धात महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील. परंतु कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. सकारात्मक ऊर्जा वाढेल.

शुभ दिनांक – 9, 10

कर्क – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. संततीच्या प्रगतीची वार्ता कानी येईल. मातुल घराण्याच्या गाठीभेटीतून आनंद मिळवाल. लाभातील रवी, बुधामुळे लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी चालून येतील. नवीन व्यावसायिक शुभारंभातून लाभ घडतील. कामाचा व्याप वाढेल. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. अनपेक्षित धनप्राप्ती होईल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. उत्तरार्धात एखादी फसवी संधी येऊ शकते. तेव्हा सावध राहावे, कोणतेही निर्णय घेताना योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊनच आपले मत ठरवावे.

शुभ दिनांक – 5, 6

सिंह – आपल्या राशीच्या सुखस्थानातून जरी चंद्राचे भ्रमण होत आहे तर दशमस्थानातून राशीस्वामी रवीवरुन धनेश बुधाचे भ्रमण सुरू होईल. अर्थार्जनाचा दृष्टीने नवनवीन उपक्रम राबवण्यात यश लाभेल. गृहसुशोभीकरणासाठी शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. आईच्या प्रकृतीची काळजी वाटेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. समाजात आपल्या मतांचा आदर केला जाईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. कुटुंबीयांना वेळ देता येईल. जोडीदाराच्या सहकाऱ्यांनी रेंगाळलेली काही कामे मार्गी लावता येतील.

शुभ दिनांक – 9 ते 11

कन्या – आठवड्याच्या सुरुवातीलाच तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. भावंडांवर आपली मते लागू नका नाहीतर वादंग होतील.‌ ठरवलेली कामे पूर्णत्वास नेताना काही अडचणींना सामोरे जावे लागेल. कुटुंबीक शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. कुटुंबीयांसंबंधीच्या सुवार्ता कानी येतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. आपली इच्छापूर्ती होणाऱ्या घटना घडतील. त्यामुळे नव्या जोमाने कामाला सुरवात कराल.

शुभ दिनांक – 7, 8

तूळ – आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तेव्हा आपली आवक वाढेल. कुटुंबीयांसाठी अनपेक्षित खर्च केले जातील. धार्मिक समारंभात सहभागी व्हाल. भावंडांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. भावंडांची सुसंवाद साधाल. त्यांच्या प्रगतीच्या वार्ता कानी येतील. कामानिमित्त घडणाऱ्या प्रवासातून फायदा होईल. अनोळखी व्यक्तीच्या सहकार्यातून एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल. नवीन वाहन – वस्तूचे योग येतील. गृह उद्योग तसेच लघु उद्योगातून नवीन कार्यारंभ केले जातील. सकारात्मक ऊर्जा वाढल्याने अतिशय उत्साही वातावरण राहील.

शुभ दिनांक – 5 ते 7

वृश्चिक – आपल्याच राशीतून चंद्राचे भ्रमण होत आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना दहा वेळा विचार करावा. आपली मते ठाम ठेवा. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. आपल्या सहकार्यामुळे अनेकांना आपला आधार वाटेल. परदेशस्थ भावंडांशी सुसंवाद साधाल. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील. पाहुण्यांची सतत वर्दळ राहील. प्रत्येक कामात यश प्राप्ती होईल. विवाहेच्छूक तरुणांना मनापसंत जोडीदार मिळेल. घरातील सुख सुविधा वाढवण्यासाठी मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. मातृसौख्य लाभेल.

शुभ दिनांक – 5, 6

धनु – आपल्या राशीच्या व्यस्थानातून होणाऱ्या चंद्रभ्रमणामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच धार्मिक स्थळांना भेटी द्याल. अध्यात्मिक प्रगती होईल. आपल्या मतांचा समाजात आदर केला जाईल. धाडसी निर्णय घेतले जातील. वैयक्तिक सुवार्ता कानी येतील. वरिष्ठांची कृपा लाभेल. विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून हाती पैसा येईल. जबाबदारीची कामे स्वीकाराल. उष्णतेच्या विकारांचा त्रास जाणवण्याची शक्यता राहते. कुटुंबीयांना समजून घ्याल. उत्तरार्धात अनेक नवीन लोकांच्या ओळखी होतील. आपल्या व्यावसायिक उत्कर्षाच्या दृष्टीने पूरक वातावरण राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

शुभ दिनांक – 5 ते 7

मकर – लाभस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण अनपेक्षित लाभ दर्शवणारे राहते. मात्र मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे तूर्तास टाळावे. मित्र परिवारावर भरवसा ठेवून कोणतेही निर्णय घेऊ नयेत. सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांनी नवीन जबाबदारी स्वीकारताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा. वरिष्ठांची मर्जी संपादन केली तर एखाद्या सवलतीचा लाभ घेता येईल. कामानिमित्त प्रवास करावे लागतील. उत्तरार्धात आपल्या वाक्यात तूर याच्या जोरावर मोठी मजल माराल. जुनी येणी वसूल होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. वडीलधाऱ्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक – 7, 8

कुंभ – आपल्या राशीच्या कर्मस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे, तेव्हा नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांनी सावध राहावे. नवीन नोकरीच्या आलेल्या संधी फसव्या असण्याची शक्यता राहते. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची पूर्तता झाल्यामुळे हाती पैसा येईल. शेअर्स मधून लाभ होतील. आपली इच्छापूर्ती होण्याच्या दृष्टीने या आठवड्यातील ग्रहमान अतिशय अनुकूल आहे. तीर्थस्थळांना भेटी द्याल. उत्तरार्धात आपल्या गोड बोलण्याने इतरांना आपलेसे कराल. आपले ध्येय गाठण्यासाठी जवळच्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्याल. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल.

शुभ दिनांक – 10, 11

मीन – आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत राहाल. समाजात आपल्या मतांचा आदर केला जाईल. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. नवनवीन उपक्रम राबवाल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. मित्र परिवारांचे चांगले सहकार्य लाभेल. दैनंदिन जीवनातून विरंगुळा शोधाल. अध्यात्मिक प्रगती होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुसंधी लाभतील. धाडसी निर्णय घेतले जातील. कवी, कलाकार, गायक, वादक यांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. आपल्या अंगभूत कला गुणांना चांगला वाव मिळेल. मनोबल वाढेल.

शुभ दिनांक – 5

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.