Home » ‘या’ राशींच्या तरुणांना मिळणार सरकारी नोकरीमध्ये यश

‘या’ राशींच्या तरुणांना मिळणार सरकारी नोकरीमध्ये यश

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 29 May to 04 June)

मेष – आपल्या राशीतून बुध गुरु राहू आणि हर्षलचे तर धनस्थानातून रवीचे आणि पराक्रमस्थानातून शुक्राचे तर सुखस्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. बड्या व्यक्तींचे घराला पाय लागतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या मोठ्या शिताफिने हाताळाल. षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असणाऱ्या तरुणांना यश लाभेल. आपण केलेल्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. कोर्ट कचेरीच्या कामातून आपल्या बाजूने निकाल लागेल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. मन प्रसन्न होणाऱ्या घटना घडतील. मित्र परिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. कवी, कलाकारांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल.

शुभ दिनांक – 1, 2

वृषभ – आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. लाभस्थानातून बुध, गुरु, राहू यांचे भ्रमण होत आहे. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून चांगले यश लाभेल. मित्र परिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. सहलीत सहभागी व्हाल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. नवनवीन व्यावसायिक उपक्रम राबवली जातील. उत्तम संभाषण चातुऱ्याच्या जोरावर अनेक रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यात यश येईल. स्वतःसाठी महागड्या वस्तूंची खरेदी कराल. महत्त्वाचे निर्णय घेताना तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन जरूर घ्यावे. धार्मिक रुची वाढेल. धार्मिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. संत सज्जनांचा सहवास लाभेल.

शुभ दिनांक – 29, 30

मिथुन – आपल्या राशीच्या लाभस्थानातील बुध, गुरु, राहू यांच्यामुळे आपल्या कामात वेगवान प्रगती झालेली दिसेल. या आठवड्यातील ग्रहांची बैठक आपणास व्यावसायिक तसेच कौटुंबिक दृष्टीने पूरक आणि सुख समाधान देणारी राहील तर सुखस्थानातून होणाऱ्या चंद्राच्या भ्रमणामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडाव्या लागतील. घराच्या नूतनी करण्यासाठी वेळ द्याल. घरातील वातावरण आनंदी काही राहील. मोठी खरेदी केली जाईल. लेखक, साहित्यिक यांच्या हातून झालेल्या दर्जेदार लिखाणाला प्रसिद्धी लाभेल. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात मोलाचा सहभाग घ्याल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. हातून पुण्य कर्म घडेल. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी लाभेल. मित्र परिवाराच्या सहकार्याने धाडसी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी कराल.‌ नवपरिणींना नवीन पाहुण्याची चाहूल लागेल.

शुभ दिनांक – 1, 2

कर्क – आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आपल्या कामात वेगवान प्रगती घडविणारे राहील. आणि राशीतील मंगळ आपल्या कर्तृत्वाला झळाळी देणारा राहील तर लाभेश शुक्राचा आपल्या राशीत होणारा प्रवेश वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने अनुकूल फलदायी ठरेल. राशीतील पंचमेश मंगळामुळे क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. धनेश रवीचे लाभस्थानातून होणारे भ्रमण आर्थिकदृष्टय़ा शुभ फलदायी ठरेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुसंधी लागतील. व्यवसाय उद्योगातून नवीन कार्यारंभ होऊन यशस्वीपणे पार पाडले जातील. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. कवी, कलाकार यांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात मोलाचा सहभाग घ्याल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. हातून पुण्य कर्म घडेल. परिवाराच्या सहकार्याने धाडसी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी कराल.‌

शुभ दिनांक – 2, 3

सिंह – राशीस्वामी रवीचे दशम स्थानातून होणारे भ्रमण आपल्या उत्कर्षास अनुकूल फलदायी ठरणारे राहील. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. सरकारी नोकरीत असणाऱ्या तरुणांना मनाजोग्या ठिकाणी बदली मिळेल. व्ययस्थानातून होणाऱ्या चतुर्थेश मंगळाच्या भ्रमणामुळे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी जाण्याचे योग संभवतात. विदेशात कामाच्या विस्तार याचा व्याप वाढेल. इम्पोर्ट-एक्सपोर्टच्या व्यवसायातून लाभ होतील. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या जातील. संत सज्जनांचा सहवास लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल. दानधर्म कराल. उंची वस्त्रलंकारांची खरेदी होईल. सहलीत सहभागी व्हाल. उत्तरार्धात कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल.

शुभ दिनांक – 31, 1

कन्या – आपल्या राशीतून चंद्राचे भ्रमण होत आहे. दशम आणि लाभस्थानातून होणाऱ्या शुक्राच्या भ्रमणामुळे आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. नवनवीन उपक्रम राबवाल. सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रात आपला चांगला नावलौकिक होईल. व्यवसाय उद्योगात नवीन संधी चालून येतील. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या जातील. महत्त्वाचे निर्णय घेण्यात आणि पार पाडण्यात कुटुंबीयांचे चांगले सहकार्य लाभेल. या आठवड्यात कितीतरी आनंदाचे क्षण आपल्या वाट्याला येतील आणि इच्छित गोष्टी प्राप्त होतील. उत्तरार्धात स्वजनांचा सहभास लाभेल. कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन होईल. भावंडांचे चांगले सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक – 29 ते 31

तूळ – राशीच्या व्ययस्थानातून होणाऱ्या चंद्रभ्रमणामुळे प्रकृतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता राहते. अनपेक्षित खर्च उद्भवू शकतो. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. आपल्या राशीतून राशी स्वामी गुरु धनस्थानात प्रवेश करत आहे. घरगुती स्वरूपात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना चांगली अर्थप्राप्ती होईल. पूर्वी मिळालेल्या कामाच्या ऑर्डर्स वाढवल्या जातील. विरोधकांवर विजय मिळवाल. प्रतिस्पर्धी आपल्या मतांची सहमत होतील. आपल्या कामातील अडचणी दूर झाल्यामुळे समाधान लाभेल. आपल्या संवाद शैलीमुळे इतरांना आपलेसे कराल. आठवड्याच्या उत्तरार्धात सहलीचे आयोजन केले जाईल. भावंडांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल शुभ दिनांक – 1, 2.

वृश्चिक – आपल्या राशीच्या लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. आपण केलेल्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल. भाग्यस्थानातील मंगळ शुक्रामुळे अंगभूत कलागुणांना चांगला भाव मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. आपल्या संभाषण चातुर्याच्या जोरावर महत्वाची कामे विनासायास पार पडतील. न्यायप्रविष्ट प्रकरणातून मनस्ताप होऊ शकतो. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. नोकरी व्यवसाय निमित्ताने परदेशी संस्थांशी सुसंवाद साधाल. कामानिमित्त घडलेल्या प्रवासातून कार्यसिद्धी लाभेल. प्रवासात आपले खिसा पाकीट आणि महत्त्वाची कागदपत्रे सांभाळावीत. आपल्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज करून घेऊ नका. उत्तरार्धात कामाचा व्याप वाढणार आहे.

शुभ दिनांक – 3

धनु – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या कर्मस्थानातून चंद्राचे भ्रमण होत असल्याने तरुणांना नोकरीच्या सुसंधी चालून येतील. आपल्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल. वरिष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. बेकारांना नोकरीच्या सुसंधी चालून येतील. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. कोर्ट कचेरीच्या कामात तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. मित्र परिवाराच्या गाठी भेटीतून आनंद लाभेल. उत्तरार्धात धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तीर्थस्थळांना भेटी दिल्या जातील. कामानिमित्त परदेशी जाण्याचे योग येतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

शुभ दिनांक – 29 ते 31

मकर – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तसेच सप्तम स्थानातून मंगळ शुक्राचे भ्रमण होत आहे. कामानिमित्त प्रवास घडतील. वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल राहील‌. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याचे प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. सप्तमातील मंगळ- शुक्रामुळे जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून काम करावे लागेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. उत्तरार्धात करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल.

शुभ दिनांक – 2, 3

कुंभ – अष्टमस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण जुन्या वास्तूतून तसेच स्थावर मालमत्तेतून लाभ दर्शवते. स्थावरासंबंधीचे व्यवहार मार्गी लागतील. व्यवसाय उद्योगातील जुनी येणी वसूल होतील. पराक्रमस्थानातील बुध, गुरूमुळे हातून दानधर्म होतील. व्यवसायातील महत्त्वाचे सौदे पार पाडण्यासाठी प्रवास करावा लागेल. नव्या जोमाने कामाच्या विस्ताराचा ध्यास घ्याल. आपल्या संभाषण चातुर्यामुळे स्वजनांना आपलेसे करून घ्याल. नात्यातील दुरावा दूर होईल. उत्तरार्धात नोकरी व्यवसायातून चांगला उत्कर्ष साधता येईल.

शुभ दिनांक – 1 ते 3

मीन – आपल्या राशीच्या सप्तमास्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. भागीदारी व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. नवीन कामे मिळतील. आपल्या कामात होणारी वेगवान प्रगती आपणास निश्चित जाणवेल. या आठवड्यातील ग्रहांची बैठक आपल्याला पूरक आणि समाधान देणारी असेल. पंचमस्थानातील मंगळ शुक्र संततीचा उत्कर्ष दर्शवतात. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील परंतु कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये. उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडतील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल.

शुभ दिनांक – 2, 3

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.