Home » हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहिल्यास ५ हजारांचा दंड

हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहिल्यास ५ हजारांचा दंड

by Team Gajawaja
0 comment
Share

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमध्ये मोबाईल सुद्धा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग झाला आहे. थोडावेळ जरी हातात मोबाईल नसेल तर बैचेन व्हायला लागते. फोनवरुन खुप काही गोष्टी करता येतात हे खरं आहे. पण काही माणसं सार्वजनिक ठिकाणी फोनवर जोरजोरात गाणी अथवा एखादे व्हिडिओ पाहत असतात. अथवा फोनवर जोरात समोरच्या व्यक्तीशी बोलतात. अशातच मोबाईलचा वापर करणाऱ्यांसाठी एक नवा नियम जारी करण्यात आला आहे. (BEST Bus New Rule)

त्यानुसार जर तुम्ही बसमध्ये प्रवास करताना फोनवर जोरात बोलल्यास अथवा हेडफोनशिवाय व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला ५ हजारांचा दंड भरावा लागू शकतो. त्याचसोबत ३ महिन्यांचा तुरुंगवास ही होऊ शकतो.

सध्या बसमध्ये हेडफोनशिवाय प्रवास करतेवेळी मोबाईलवर व्हिडिओ पाहिल्याल तर तुरुंगात नेण्याच्या नवा नियम बेस्ट करुन जारी करण्यात आला आहे. बेस्टने मोबाईल फोनवर स्पीकरवर व्हिडिओ पाहणे किंवा गाणी लावण्यावर ही बंदी घातली आहे. नव्या नियमाबद्दल नागरिकांना जागृक करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नवा नियम हा केवळ सध्या मुंबईसह आजूबाजूच्या शहरांसाठी लागू केला गेला आहे.

बेस्टकडून गेल्या आठवड्यातच फोनच्या स्पिकरवरुन व्हिडिओ पाहणे अथवा गाणी ऐकण्यासाठी बंदी घातली. या संबंधित २५ एप्रिलला जारी करण्यात आलेल्या अधिसुचनेत या नव्या नियमाबद्दल सांगितले गेले होते. नव्या नियमाप्रति जागृतकेसाठी नोटिफिकेशन ही लावली जात आहेत.

दरम्यान दोषींवर बॉम्बे पोलीस अधिनियमच्या कलम 38/112 च्या अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, बसमध्ये नोटिफिकेशन संदर्भातील निर्देशन जारी केले आहेत. त्याचसोबत खासकी कंपन्यांकडून लीजवर घेतलेल्या वाहनांसह बेस्ट बसवर सुद्धा काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही याबद्दल जागृक केले जाणार आहे. जवळजवळ ३४० बसेस या मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भायंदर सारख्या ठिकाणी आपली सर्विस देतात. बेस्ट बसच्या माध्यमातून दररोज ३० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. (BEST Bus New Rule)

हे देखील वाचा- जनगणनेत चीनला टाकले मागे, वाचा भारताच्या लोकसंख्येवरील हा रिपोर्ट

का लावलाय नियम?
मोबाईल फोन संदर्भात एक नियम काढण्यामागील कारण असे की, ध्वनी प्रदुषण होते. त्याचोसबत बसमधील प्रवाशांचा असुविधेपासून बचाव होण्यासाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे. नव्या सर्कुलरनुसार आवाजाच्या डेसिबलला कमी करण्यासाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे. अशातच कोणत्याही बस प्रवाशाने मोठ्या आवाजात बोलले तर त्यासाठी परवानगी नसणार आहे. त्याचसोबत जर तुम्हाला गाणी ऐकायची असतील तर हेडफोन्स लावून ऐकावीत असे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.