Home » मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणे १ एप्रिल पासून महागणार, १८ टक्क्यांनी वाढणार टोल

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करणे १ एप्रिल पासून महागणार, १८ टक्क्यांनी वाढणार टोल

by Team Gajawaja
0 comment
Toll Tax Hike
Share

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांना १ एप्रिल पासून टोलसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण या दिवसापासून टोलच्या शुल्कात वाढ होणार आहे. यामध्ये ही वाढ १८ टक्क्यांनी वाढणार आहे. यामुळे दोन्ही शहरांमध्ये येण्याजाण्यासाठीचा खर्च थोडा वाढला जाणार आहे. महाराष्ट्र स्टेट रोड डेवलपमेंट कॉर्पोरेशनच्यानुसार, एक्सप्रेस वे वर टोल प्रत्येक वर्षी ६ टक्क्यांनी वाढला जातो. अशा प्रकारे तीन वर्षात एकदाच लागू केला जातो. यापूर्वी १ एप्रिल २०२० मध्ये टोल वाढवण्यात आला होता. टोल वाढी संबंधतची सुचना प्रत्येक तीन वर्षांनी केली जाते. (Toll Rates Hike)

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, एमएसआरडीसीनुसार प्रत्येक वर्षाला ई-वे वर टोल ६ टक्क्यांनी वाढला जातो. मात्र प्रत्येक तीन वर्षांनी तो एकत्रित लागू केला जातो. गणनेनुसार १ एप्रिल पासून टोलमध्ये १८ टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, या हिशोबानेच टोलच्या दरात वाढ केली गेली आहे. रिपोर्टनुसार, बस, कार आणि ट्रकसाठी टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. तर जाणून घेऊयात कोणत्या वाहनांसाठी किती टोल लागणार आहे.

खासगी वाहनांसाठी १ एप्रिल पासून ९५ किमी लांब एक्सप्रेसवे वर एका बाजूच्या टोलच्या रुपात ३२० रुपयांचे पेमेंट करावे लागणार आहे. सध्या २७० रुपये आहे. कार चालकांना पुण्यातून मुंबईत येण्यासाठी ३६० रुपये पेमेंट करावे लागेल. टेंम्पोसाठी टोल ४२० रुपयांवरुन ४९५ रुपये झाला आहे. ट्रकसाठी ५८० च्या ऐवी ६८५ रुपये करण्यात आला आहे. बसला आता ७९९ ऐवजी ९४० रुपये टोल द्यावा लागणार आहे. बस आणि टॅक्सी चालकांसाठी वाढवण्यात आलेल्या टोलमुळे याचा बोझा प्रवाशांच्या भाड्यावर होणार आहे.(Toll Rates Hike)

हे देखील वाचा- कोकणातील रत्नागिरीत आढळला रामगड किल्ला

भारतातील पहिल्या एक्सप्रेस कंट्रोल्ड एक्सप्रेस वे २००२ मध्ये बनून तयार झाला होता. मात्र सहापदरी एक्सप्रेस वे आहे. याची सुरुवात नवी मुंबईतील कळंबबोळी येथून होते आणि पुण्यातील किवाले येथे संपते. हा एक्सप्रेस वे सुंदर सह्याद्री पर्यत रागांमधून जातो. ९५ किमी लांब असलेल्या या एक्सप्रेसवर काही भोगदे सुद्धा आहेत. भले ही देशातील पहिला एक्सप्रेस असल्याचा याला मान असला तरीही अन्य महामार्गांच्या स्पीडच्या तुलनेत मागे आहे. जेथे अन्य एक्सप्रेस वेवर अधिकाधिक स्पीड १८० किमी प्रति तास आहे तर येथे कमीत कमी स्पीड १०० किमी प्रति तासाची आहे. आता या एक्सप्रेस वेच्या रुंदीकरणाचे काम सुरु होणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.