Home » ST चे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन

ST चे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन

by Team Gajawaja
0 comment
Share

महाराष्ट्रातील पुणे-अहमदनगर मार्गावर १ जून १९४८ रोजी चालवण्यात आलेल्या राज्य परिवहानाच्या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांनी निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन मंडळ (एमएसआरटीसी) च्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, केवटे यांनी मुंबई पासून २७५ किमी दूर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील मालीवाडा येथील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ट्विट करत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. (Maharashtra ST Bus)

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहले होते की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे पहिले एसटी वाहक श्री.लक्ष्मण शंकर केवटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःख देणारी आहे. १९४८ साली महाराष्ट्रात सुरु झालेल्या एसटीचे पहिले वाहक म्हणून सेवा बजावणारे श्री.केवटे यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत मोलाचे कार्य केले आहे. त्यांची अलौकिक सेवा सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्रात प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची असणाऱ्या एसटी सेवेने असंख्य प्रवाशांना आपलेसे केले आहे.

या एसटीच्या प्रवासाची सुरुवात करणाऱ्या श्री.केवटेंचा जीवनप्रवास जरी थांबला असला तरी एसटीच्या इतिहासात त्त्यांच्या कार्याची दखल कायमस्वरूपी घेतली जाईल.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच केवटे कुटुंबाला दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.

केवटे यांचा जन्म १७ ऑघस्ट १९२४ रोजी झाला होता. त्यांनी १ जून १९४८ रोजी राज्य परिवहनात कंडक्टरच्या रुपात आपल्या करियरला सुरुवात केली होती. ही अशी एक ऐतिसाहिक तारीख आहे जेव्हा राज्य परिवहनाने स्वांत्र्यानंतर महाराष्ट्रात आपली पहिली बस सेवा सुरु केली होती. परिवहन मंडळाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, केवटे यांनी शासकीय परिवहन मंडळासोबत ३६ वर्ष काम केले. ते ३० एप्रिल १९८४ रोजी सेवानिवृत्त झाले होते. पण सेवानिवृत्तीनंतर ही ते परिवहन मंडळाच्या काही गोष्टी करण्यात सक्रीय सहभाग घ्यायचे. (Maharashtra ST Bus)

हेही वाचा- केवळ राजकरणच नव्हे तर क्रिकेट आणि कॉर्पोरेटमध्ये ही शरद पवारांची होते चर्चा

यंदा १ जूला एसटीला ७५ वर्ष पूर्ण होणार आहेत. या अमृत महोत्सवाला ते हवे होते असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले. पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एसटीच्या इतिहासाचा साक्षीदार गमावला असे ही बरगे यांनी म्हटले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.