Home » राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यता रद्द होणार? अॅक्शन मोडमध्ये आहे BJP

राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यता रद्द होणार? अॅक्शन मोडमध्ये आहे BJP

by Team Gajawaja
0 comment
Rahul Gandhi
Share

संसद ते रस्त्यावर सध्या गदारोळाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लंडनमध्ये दिलेल्या विधानावरुन त्यांनी माफी मागावी असा आग्रह धरला आहे. दरम्यान, काँग्रेसचे स्पष्ट म्हणणे आहे की, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी असे काहीच केले नाही. याच कारणास्तव संसदेत माफी मागावी. याच दरम्यान गांधी यांनी माफी न मागल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या पक्षात दिसून येत आहे.

भाजप नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विशेष समिती बनवून त्यांना सस्पेंड करणे अथवा सदस्यता रद्द करण्याच्या पक्षात आहे. पार्टीचे खासदार निशिकांत दुबे यांनी सुद्धा संसद, लोकशाही आणि संस्थांचा अपमान करणाऱ्या विधानांसाठी राहुलच्या विरोधात विशेष समिती बनवण्याची मागणी केली आहे. निशिकांत दुबे यांनी असे म्हटले की, राहुल यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी एक विशेष समिती बनवावी. २००५ मध्ये प्रश्नाच्या बदल्यात पैसे घेण्याप्रकरणी विशेष समिती बनवण्यात आली आहे.

संसदेच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहचवण्याच्या कारणास्तव विशेष समितीने अकरा सदस्यांचे सदसत्व रद्द केले होते. जे सुप्रीम कोर्टाने सुद्धा योग्य असल्याचे ठरवले होते. दुबे यांच्या मते, राहुल गांधी यांनी युरोप अमेरिकेला बोलावण्याचा आव्हान करत सातत्याने संसद आणि देशाची प्रतिष्ठा मलील केली. त्यासाठी त्यांना संसदेतून काढण्याची वेळ आली आहे. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत संसद भवनात आठ वरिष्ठ मंत्र्यांची बैठक झाली. यामध्ये आगामी काळात राहुल (Rahul Gandhi) यांच्या विरोधात हे प्रकरण पुढे नेण्यावर चर्चा करण्यात आली असून त्यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजप हल्ला चढवणार आहे.

हे देखील वाचा- सोनं, पैसा, डॉलर…लालू यादव यांच्या मुलीसह नातेवाईकांवर ईडीची छापेमारी

लंडनमध्ये राहुल गांधींनी केले असे विधान
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये एका कार्यक्रमादरम्यान आरोप लावला होता की, भारतीय लोकशाहीच्या जडणघडणीवर ‘बर्बर हल्ला’ होत आहे. त्यांनी खेद व्यक्त केला की, अमेरिका आणि युरोपासह जगातील लोकशाही हिस्से यावर लक्ष देण्यास नाकाम राहिले आहेत. राहुल यांनी आपल्या व्याख्यानात असा सुद्धा आरोप लावला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील लोकशाहीचा पाया नष्ट करत आहेत. याच गोष्टीवरुन संसदेच्या बजट सत्राच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवातीपासून सत्ता पक्षाच्या सदस्य लंडनमध्ये राहुल गांधी यांच्याकडून भरतीय लोकशाही संबंधित काही टिप्पणी संदर्भात त्यांनी माफी मागावी.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.