Home » मुंबईतील लालबाग हत्याकांडातील आरोपी महिलेने केले नवे खुलासे

मुंबईतील लालबाग हत्याकांडातील आरोपी महिलेने केले नवे खुलासे

by Team Gajawaja
0 comment
Mumbai Murder Case
Share

सख्ख्या आईची हत्या करत शवाचे पाच तुकडे करणाऱ्या आरोपी महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता त्यामध्ये काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. तिने असे सांगितले की, तिची आई कोणत्याही गोष्टीशिवाय तिची अडवणूक करायची. त्यामुळे ती नेहमीच त्रस्त असायची. जेव्हा तिच्या आईचा पायऱ्यांवरुन पडून मृत्यू झाला तेव्हा आरोप लावला जाईल या भीतीने तिने आईच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले. मुंबईतील लालबाग चाळीत राहणाऱ्या आरोपी महिलेने चौकशीत हे कबुल केले की, दोन महिने शवाचे तुकडे घरात ठेवल्याने दुर्गंधी येत होती. (Mumbai Murder Case)

अशातच घरातील दुर्गंध दूर करण्यासाठी चहाची पात, फिनॉल आणि जवळजवळ ४० बाटल्या एअर फ्रेशनरचा वापर केला. प्रकरणाचा खुलासा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी आरोपी महिला रिंपल जैन हिला अटक केली. या प्रकरणी आता पुढील चौकशी करण्यासाठी सध्या तिला पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. आरोपीने पोलिसांना चौकशीत असे सांगितले की, आईचा मृत्यू झाल्यानंतर तिने इंटरनेटवर शव कसे नष्ट करावे याचे मार्ग शोधले आणि नंतर जवळच्याच दुकानातून मार्बल कटर खरेदी केले.

दोन दिवस घरात दुर्गंधी येऊ लागली अशता तेव्हा तिने इंटरनेटवर ती दूर करण्यासाठी पर्याय शोधले. ऑनलाईन चहा पत्ती, फिनॉल आणि एअर फ्रेशनर खरेदी करुन त्याचा वापर केला. पोलिसांच्या मते रिंपलने आपल्या विधानात असे म्हटले की, गेल्या वर्षात २७ डिसेंबरला तिची आई पायऱ्यांवरुन पडून गंभीर जखमी झाली होती. तर त्याच्या दोन दिवसानंतर तिचा मृत्यू झाला होता. रिंपलने असे ही म्हटले की, आईच्या मृत्यूमुळे ती घाबरली गेली. तिला वाटत होते की, आईच्या हत्येचा आरोप तिच्यावर येईल. त्यामुळेच आईच्या शवाचे पाच तुकडे केले आणि पॉलिथिनमध्ये भरले. (Mumbai Murder Case)

हे देखील वाचा- देशात राष्ट्रीय पुरुष आयोगाची का केली जातेय मागणी?

तिने पोलिसांना असे सांगितले की, शव कापण्यासाठी मार्बल कटर ही विकत घेतले. मात्र जेव्हा शरिर पूर्णपणे कापले गेले नाही तेव्हा चाकूचा सुद्धा वापर केला. पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीचा जबाब नोंदवला आहे. या व्यक्तिला पोलिसांनी लखनौ वरुन ताब्यात घेतले होते. परंतु चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, या हत्येमध्ये त्याचा काही थेट संबंध नव्हता. परंतु त्याला पोलिसांना कळवल्याशिवाय शहर सोडून न जाण्यासाठी बंदी घातली आहे. हा व्यक्ती आधीपासूनच रिंपलच्या संपर्कात होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.