Home » जात विचारुन दिले जातेय खत, महाराष्ट्र विधानसभेत पोहचला वाद

जात विचारुन दिले जातेय खत, महाराष्ट्र विधानसभेत पोहचला वाद

by Team Gajawaja
0 comment
Maharashtra Assembly Budget Session
Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सरकार आल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प सादर केला गेला. यामध्ये सामान्य नागरिक, महिला आणि विविध जातींसाठी सवलती व तरतुदींचा समावेश करत वर्ष २०२३-२४ साठी तुटीचा अर्थसंकल्प जाहीर केला. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी त्यांची जात सांगावी लागत आहे. याच कारणास्तव शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर लागला आहे. या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील विधानसभेत विरोधक आक्रमक झाले. नेते अजित पवार यांनी असे म्हटले की, आपल्यातील बहुतांश लोक शेतकरी आहेत. आपली जात शेतकरी आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी असे म्हटले की, महाराष्ट्र एक विकसनशील राज्य आहे. येथे जात-पात दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे जातिवाद वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले. (Maharashtra Assembly Budget Session)

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी असे म्हटले की, केंद्र सरकारचा असा कोणताच उद्देश नाही की शेतकऱ्यांसोबत जातीच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. असे नाही की, शेतकऱ्यांना सब्सिडी जात विचारुन दिली जात आहे. बाव्वीशे रुपयांचे युरिया शेतकऱ्यांना शंभर-दोनशे रुपयांना दिले जाते. अन्य खर्च सरकार उचलते. ही सब्सिडी शेतकऱ्यांना जात विचारुन दिली जात नाही. सॉफ्टवेअरवर जर कोणत्याही बदलाची गरज असेल तर केंद्राला यासाठी माहिती दिली जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदनात आश्वासन दिले की, शेतकऱ्यांची नाराजी आणि सनदावर आपली नाराजी राज्य सरकार केंद्राला सांगणार आहे. सॉफ्टवेअरमध्ये बदलावासाठी सुद्धा मागणी करणार आहे.

ई-पॉज मशीनमध्ये जात सांगावी लागते
खरंतर ई-पॉज मशीनच्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल केले आहेत. जेव्हा शेतकरी खत घेण्यासाठी जातो तेव्हा त्याला काही माहिती द्यावी लागत आहे, त्याचनुसार त्यांना जात ही विचारली जाते. जात न सांगितल्यास सॉफ्टवेअर पुढे जात नाही. यामुळेच शेतकऱ्यांना खत आणि युरिया मिळत नाही. खत विक्री करणाऱ्यांना जेव्हा या बद्दल शेतकरी प्रश्न विचारतात तेव्हा मशीन मध्ये नवे अपडेट आले असे सांगतात. त्यांना याबद्दल काहीच माहिती नाही असे म्हणतात. (Maharashtra Assembly Budget Session)

हे देखील वाचा- औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नावात बदल

आता पर्यंत हेच होत होते
आता पर्यंत शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी नाव, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक सांगावा लागतो. त्यानंतर ई पॉस मशूनवर अंगठा लावून खत दिले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ई-पॉस मध्ये काही अपडेट्स आले आहेत त्यानुसार त्यांना जात सांगावी लागत आहे. यामुळेच संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.