Home » हा आठवडा ‘बढती बदली अन आर्थिक उलाढालीचा’

हा आठवडा ‘बढती बदली अन आर्थिक उलाढालीचा’

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 24 Apr to 30 Apr)

मेष – आपल्या राशीतून रवी बुध गुरु आणि हर्षल यांचे भ्रमण होत आहे तर धनस्थानातील धनेश शुक्रावरून चंद्राचे भ्रमण होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपला चांगला नावलौकिक होईल. व्यवसाय उद्योगात नवीन संधी चालून येतील. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या जातील. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. राशीतील रवीमुळे धाडसी निर्णय घेतले जातील. स्वतंत्र विचारसरणीमुळे कामाचा व्याप वाढवण्यात यश लाभेल. या आठवड्यात कितीतरी आनंदाचे क्षण आपल्या वाट्याला येतील आणि इच्छित गोष्टी प्राप्त होतील. पराक्रमस्थानातील मंगळामुळे आत्मविश्वास वाढल्याने धाडसी निर्णय घेतले जातील. आठवड्याच्या उत्तरार्धात स्वजनांचा सहभास लाभेल. कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन होईल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल.

शुभ दिनांक – 27 ते 29

वृषभ – राशीस्वामी शुक्रावरून चंद्राचे भ्रमण होत आहे. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळणार आहे. व्ययस्थानातून रवी, बुध, गुरु, राहू आणि हर्षल यांचे भ्रमण होत आहे. इम्पोर्ट-एक्सपोर्टच्या व्यवसायातून लाभ होतील. मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या जातील. संत सज्जनांचा सहवास लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल. दानधर्म कराल. राशीतील शुक्रामुळे कवी, कलाकारांच्या कलागुणांना परदेशात वाव मिळेल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आपल्या मतांचा कुटुंबात आदर केला जाईल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी लाभेल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी होईल‌. सहलीत सहभागी व्हाल. उत्तरार्धात कुटुंबात शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल.

शुभ दिनांक – 29, 30

मिथुन – राशीच्या लाभस्थानातून रवी, बुध, गुरु आणि राहू तर व्ययस्थानातून शुक्र-चंद्राचेे भ्रमण होत आहे. आजवर रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील मित्र परिवाराचे सहकार्य लाभेल आपल्या इच्छा अपेक्षांची पूर्ती होणारे ग्रहमान या आठवड्यात आपणास लाभलेले आहे. व्ययस्थानातील शुक्रचंद्र यांच्या युतीमुळे मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाईल. सहलीत सहभागी व्हाल. राशीतील मंगळामुळे आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी येईल. आपला आत्मविश्वास वाढणाऱ्या घटना घडतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखून काम कराल. बढती बदलीचे योग संभवतात. कुटुंबातील सदस्यांसंबंधी शुभ कार्य ठरेल. भावंडांच्या गाठीभेटीतून आनंद मिळेल. महत्त्वाची कागदपत्रे हाती लागतील.

शुभ दिनांक – 25, 26

कर्क – आपल्या राशीच्या दशमस्थानात रवी, बुध, गुरु, राहू आणि हर्षल यांची युती होत आहे. व्यवसाय उद्योगात नवीन संधी चालून येतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना मनाजोगी नोकरी मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. बढती- बदलीचे योग येतील. लाभस्थानातील शुक्रावरून चंद्राचे भ्रमण होत आहे. मित्र परिवाराचे चांगले सहकार्य लाभेल. इच्छित गोष्टी प्राप्त होतील. महागड्या वस्तूंची खरेदी केली जाईल. आजवर रेंगाळलेली कामे मित्रांच्या सहकार्याने पूर्ण होतील. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल. कवी, कलाकारांसाठी ग्रहमान अतिशय अनुकूल आहे. नवनवीन कल्पना आकार घेतील. व्यवसायातील महत्त्वाचे सौदे पार पाडण्यासाठी प्रवास करावा लागेल. नव्या जोमाने कामाला लागल.

शुभ दिनांक – 27, 28

सिंह – आपल्या राशीच्या भाग्यस्थानातून रवी, बुध, गुरु, राहू यांचे भ्रमण तर दशम स्थानातून शुक्र-चंद्राचे भ्रमण होत आहे. नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. नोकरीतील कामानिमित्त मनाजोग्या ठिकाणी बदलीची ऑर्डर मिळेल. उच्च राशीतील रवीमुळे समाजात आपली पतप्रतिष्ठा उंचावेल. कामानिमित्त प्रवास घडतील. तसेच धार्मिक स्थळांना भेटी द्याल. हातून दानधर्म घडतील. सामाजिक राजकीय क्षेत्रातून आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. दशमातील शुक्र-चंद्रामुळे कलाकारांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आवडते छंद जोपासता येतील. कोर्ट कचेरीच्या प्रकरणातून आपल्या बाजूने निकाल लागेल. नवीन मार्ग खुले होतील. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल.

शुभ दिनांक – 29, 30

कन्या – आपल्या राशीच्या अष्टमस्थानात रवी, बुध, गुरु, राहू आणि हर्षल आहेत तर भाग्यस्थानात शुक्र आणि दशमस्थानात मंगळ अशी गृहस्थिती या आठवड्यात आपल्याला लाभलीी आहे. अष्टमस्थानातील ग्रहाधिक्यामुळे अनपेक्षित धनलाभ होतील. महत्त्वाची कागदपत्र हाती लागतील. परंतु कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. भाग्यस्थानातील भाग्येश शुक्रावरून होणारे चंद्राचे भ्रमण आपणास अतिशय अनुकूल फलदायी ठरेल. प्रियजनांच्या गाठीभेटी होतील. सहलीत सहभागी व्हाल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात मात्र व्यवसाय उद्योगाच्या दृष्टीने मोठे निर्णय घेतले जातील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. मित्र परिवारांबरोबर वेळ मजेत घालवाल. इच्छित गोष्टी प्राप्त होतील. कामानिमित्त प्रवास घडतील.

शुभ दिनांक – 24 ते 26

तूळ – सप्तमसस्थानातील ग्रहाधिक्यामुळे भागीदारी व्यवसायातून लाभ होतील. नवीन कार्यारंभ केले जातील. कामाचा व्याप वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. अष्टमेश शुक्राच्या अष्टमातील भ्रमणावरून चंद्राचे होणारे भ्रमण जोडीदाराकडून अथवा सासुरवाडीहून लाभ दर्शवतो. नवीन कल्पना आकार घेतील, आणि कृतीत येतील. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना प्रतिष्ठा लाभेल. आपल्या कार्याबद्दल वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. सामाजिक पतप्रतिष्ठा वाढवण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राहाल. आपला आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा वाढेल. एखाद्या वादावर पडदा पडेल. तरुणांना नोकरी व्यवसायाच्या संधी चालून येतील. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील.

शुभ दिनांक – 29, 30

वृश्चिक – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून सप्तमेश शुक्रावरून चंद्राचे भ्रमण होत आहे. विवाहेच्छूक तरुणांचे विवाह जमतील. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. अष्टमातील मंगळामुळे प्रकृतीच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता राहते. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. नोकरी, व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. नोकरीत बढती- बदलीचे योग येतील. सरकारी वाहन लाभेल. सहकाऱ्यांचे कामात सहकार्य लाभेल. नवीन व्यावसायिक सौदे होतील. तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. आपले विचार कृतीत येतील.

शुभ दिनांक – 28 ते 30

धनु – राशीच्या पंचमस्थानातून रवी, बुध, गुरु, राहू आणि हर्षल यांचे भ्रमण होत आहे. तर षष्ठस्थानातून शुक्र, चंद्र आणि सप्तम स्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यात आपला सक्रिय सहभाग राहील. समाजात मानाचे स्थान लाभेल. नोकरीत स्त्री अधिकारी वर्गाकडून सहाय्य मिळेल. मामा, मावशीच्या गाठीभेटी होतील. जोडीदाराचे वर्चस्व राहील. भागीदारी व्यवसायातून कामाचा व्याप वाढेल. मात्र प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. प्रवासात आपले खिसा, पाकीट सांभाळावे. आठवड्याच्या उत्तरार्धात धार्मिक स्थळांना भेटी द्याल. हातून दानधर्म घडेल. अध्यात्मिक प्रगती होईल. संत सज्जनांचा सहवास लाभेल.

शुभ दिनांक – 25, 26

मकर – आपल्या राशीच्या सुखस्थानात रवी, बुध, गुरु असल्याने नवीन वाहन वास्तूचे योग दिसून येतात. घरात मंगल कार्याची नांदी होईल. गृह सुशोभीकरणासाठी आकर्षक वस्तूंची खरेदी केली जाईल. थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. पंचमस्थानातील शुक्र आणि चंद्र यांच्या भ्रमणामुळे संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षातून यश लाभेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रकृतीच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष करू नका. उष्णतेचे विकार, पित्त विकार, नेत्र विकार यांचा त्रास होण्याची शक्यता राहते. उत्तरार्धात जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीची पूर्तता झाल्याने हाती पैसा येईल.

शुभ दिनांक – 27 ते 29

कुंभ – आपल्या राशीच्या पराक्रम स्थानातील रवी, बुध, गुरु, राहू यांच्यामुळे आपल्या कामात वेगवान प्रगती झालेली दिसेल. या आठवड्यातील ग्रहांची बैठक आपणास व्यावसायिक तसेच कौटुंबिक दृष्टीने पूरक आणि सुख समाधान देणारी राहील. एकीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्या तर दुसरीकडे व्यवसाय उद्योगात होणारी धावपळ यामुळे होणारी तारेवरची कसरत आपल्याला नवनवीन अनुभव देणारी राहील. लेखक, साहित्यिक यांच्या हातून झालेल्या दर्जेदार लिखाणाला प्रसिद्धी लाभेल. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात मोलाचा सहभाग घ्याल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. हातून पुण्य कर्म घडेल. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी लाभेल. विद्यार्थ्यांना संशोधन पर अभ्यासक्रमातून यश मिळेल. मित्र परिवाराच्या सहकार्याने धाडसी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी कराल.‌ नवपरिणींना नवीन पाहुण्याची चाहूल लागेल. उत्तरार्धात विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल.

शुभ दिनांक – 29, 30

मीन – धनस्थानातील ग्रहाधिक्यामुळे आपली आर्थिक स्थिती मज‌बूत होईल. आपल्या उत्तम संवाद शैलीमुळे इतरांना आपलेसे कराल. कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकाराल. भावंडांचे चांगले सहकार्य लाभेल. घरातील सुखसुविधा वाढवण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. घरातील वातावरण आनंदी उत्साही ठेवण्याचा प्रयत्न करावा. संततीच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. हितशत्रूंच्या कारवायांना सामोरे जावे लागेल. कामानिमित्त घडलेल्या प्रवासातून कार्यसिद्धी होईल. कोणत्याही भुलथापांना बळी पडू नका. सामाजिक, राजकीय क्षेत्रात सतत कार्यरत राहाल.

शुभ दिनांक – 27 ते 29

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.