Home » Year Ender 2023 : 2 हजारांच्या नोटा ते UPI, यंदाच्या वर्षात झाले ‘हे’ मोठे बदल

Year Ender 2023 : 2 हजारांच्या नोटा ते UPI, यंदाच्या वर्षात झाले ‘हे’ मोठे बदल

प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षातही देशात काही मोठे बदल झाले. बँकिंग व्यवस्थेबद्दल काही गोष्टी बदलल्या गेल्या. दोन हजार रूपयांच्या नोटा ते युपीआयसाठी ट्रांजेक्शन मर्यादेत बदल करण्यात आले.

by Team Gajawaja
0 comment
Year Ender 2023
Share

Year Ender 2023 : यंदाचे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. यंदाच्या वर्षात देशात काही मोठे बदल झाले. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर पडला गेला. वर्ष 2023 मध्ये आरबीआयच्या सिस्टिममध्ये काही बदल करण्यात आले. दोन हजार रूपयांच्या नोटा चलनाबाहेर गेल्या. याशिवाय युपीआयच्या माध्यमातून ट्रांजेक्शन करण्यासंबंधितही काही बदल झाले. नुकत्याच आरबीआयने युपीआयच्या नियमांत बदल केले आहेत. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…

यंदाच्या वर्षात झाले हे बदल
यंदाच्या वर्षात 19 मे रोजी आरबीआयने दोन हजारांच्या नोटांसंबंधित एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानंतर सर्व देशभरात या निर्णयाची जोरदार चर्चा झाली. खरंतर सरकारने दोन हजारांच्या नोटा चलनातून काढून टाकल्या. दोन हजार रूपयांच्या नोटा अनधिकृत नसून त्या लीगल टेंडरच्या रूपात मान्य आहेत. दोन हजारांच्या नोटा बँकेत बदलून घेण्यासाठी नागरिकांना चार महिन्यांची मूदत दिली होती. आतापर्यंत आरबीआयकडे 97 टक्के नोटा परत आल्या आहेत.

असुरक्षित कर्जावर आरबीआयची कारवाई
आरबीआयच्या या निर्णयामुळे तुमच्या शिखावर अतिरिक्त भार पडू शकतो. येणाऱ्या काळात क्रेडिट कार्ड घेणे किंवा कंज्यूमर कर्जासाठी थोड्या समस्यांचा सामना करावा लाग होता. खरंतर आरबीआयने बँक किंवा नॉन-बँकांच्या फायनान्स कंपनीसाठी आता कंज्यूमर क्रेडिट लोनच्या रिस्कचे वेटेज 25 टक्क्यांनी वाढवले आहे. म्हणजेच असुरक्षित कर्ज बुडण्याची भीता पाहता बँकेला आता आधीपासूनच 25 टक्के अधिक प्रोव्हिजनिंग करावी लागणार आहे.

युपीआयमध्ये बदल
यंदाच्या वर्षात आरबीआयने युपीआय पेमेंटच्या ट्रांजेक्शन मर्यादेत बदल केला आहे. युपीआय ट्रांजेक्शनसाठी मर्यादा एक लाख रूपयांवरून पाच लाख रूपये करण्यात आली आहे. ही सुविधा हॉस्पिटल आणि शाळा-कॉलेजमधील युपीआय ट्रांजेक्शन संदर्भात करण्यात आली आहे. (Year Ender 2023)

रेपो रेटमध्ये बदल नाही
आरबीआयने एप्रिल महिन्यानंतर आतापर्यंत रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो रेट अद्याप 6.5 टक्के आहे. गेल्यावेळी रेपो रेटमध्ये वाढ फेब्रुवारी 2023 रोजी झाली होती. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास महागाई आणि लोकांच्या शिखाचा विचार करून आरबीआयने ईएमआयचा खर्च वाढवलेला नाही.


आणखी वाचा: 
EVM मशीनचे बटण दोन वेळेस दाबले तर काय होईल?
भारतातील मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना किती असतो पगार?
सरकारची मोठी घोषणा, 75 लाख महिलांना मोफत मिळणार गॅस सिलिंडर

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.