Home » बायकोला पागल बोलणे चुकीचे नाही- बॉम्बे हायकोर्ट

बायकोला पागल बोलणे चुकीचे नाही- बॉम्बे हायकोर्ट

बॉम्बे हायकोर्टाने असे म्हटले आहे की, नवऱ्याने बायकोला 'तुला अक्कल नाही, तु वेडी आहेस' असे बोलणे चुकीचे नाही. न्यायाधीश नितीन यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, बायकोला असे बोलणे म्हणजे शिव्या देण्यासारखे नाही.

by Team Gajawaja
0 comment
Bombay high court
Share

बॉम्बे हायकोर्टाने असे म्हटले आहे की, नवऱ्याने बायकोला ‘तुला अक्कल नाही, तु वेडी आहेस’ असे बोलणे चुकीचे नाही. न्यायाधीश नितीन यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, बायकोला असे बोलणे म्हणजे शिव्या देण्यासारखे नाही. (Bombay high court)

कोर्टाने या प्रकरणी सुनावणी करत असे म्हटले की, हे वाक्य सर्वसामान्यपणे बोलले जाते. ते अपमानजनक भाषेतील नाही. ज्या संदर्भात त्याचा वापर केला होता त्याचा अर्थ असा होत नाही की, त्या व्यक्तीचा अपमान करायचा होता. प्राप्त झालेल्या माहितीनुसार पत्नीने अशा उदाहरणांचा हवाला देत नवऱ्यावर मानसिक, शारीरिक शोषणाचा आरोप लावला होता. जेव्हा तो रात्री उशिरा घरी यायचा तेव्हा त्याला आपण बाहेर जाऊयात असे विचारले असता तो आवज चढवायचा. कोर्टाने असे म्हटले की, बायकोने अशा घटनांचे स्पष्टीकरण दिले नाही ज्यामध्ये तिला अपमानजनक शब्दांचा वापर केला होता. त्यामुळे अशा शब्दांचा वापर करणे अपमानजनक भाषेचा वापर करणे नाही.

नक्की काय आहे प्रकरण?
कपलचा विवाह २००७ मध्ये झाला होता. मात्र लग्नाच्या काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. यावरुन नवऱ्याचे असे म्हणणे आहे बायकोला आधीच माहिती होते जॉइंट फॅमिलित रहायचे आहे. मात्र लग्नानंतर तिला वेगळे रहायचे आहे असे पाठी लागली होती. नवऱ्याने असा सुद्धा आरोप लावा की, बायकोने तिच्या सासू-सासऱ्यांचा सुद्धा सन्मान केला नाही. त्यांची काळजी घेतली नाही. ऐवढेच नव्हे तर आपले वैवाहिक आयुष्य आणि घर ही सोडले.

याउलट पत्नीने असा दावा केला आहे तिचे वैवाहिक आयुष्य अतिशव वाईट पद्धतीने जात होते. ती लग्नामुळे नाखूश होती. तिने असे चुकीचे वर्तन कधीच पाहिले नव्हते. तिने नवऱ्यासह सासरच्या मंडळींवर असा आरोप लावला की, ते लो मँन्टॅलिटीचे आणि दुखी व्यक्ती होते. त्याचसोबत असे ही म्हटले नवऱ्याने २००९ मध्ये तिच्या नवऱ्याने घर सोडले होते आणि ते दोघे वेगळे राहत होते. ((Bombay high court)

हेही वाचा- सरकारची मोठी घोषणा, 75 लाख महिलांना मोफत मिळणार गॅस सिलिंडर

तर नवऱ्याने २०१२ स्थानिक निवडणूका लढल्या होत्या. कोर्टासमोर त्याने वेगळ्या राहत असलेल्या बायकोने २०१३ मध्ये दाखल केलेल्या एफआयआरचा उल्लेख केला होता. त्याने असे म्हटले होते की, हे सर्व अशावेळी झाले जेव्हा २००९ मध्ये घटस्फोटाची प्रक्रिया सुरु झाली होती. नवऱ्याने असे मत मांडले की, महिलेने केलेल्या एफआयआरमध्ये निराधार आरोपांमुळे त्याची आणि परिवाराची प्रतिष्ठा मलीन झाली आहे. ही एक क्रुरता आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.