Home » बँकेचा ‘हा’ सर्वाधिक मोठा नियम बदलणार, ग्राहकांवर होणार परिणाम

बँकेचा ‘हा’ सर्वाधिक मोठा नियम बदलणार, ग्राहकांवर होणार परिणाम

देशभरात सर्वच व्यवहार हे डिजिटल पद्धतीने केले जातात. मात्र कधीना कधी तरी प्रत्येकाला बँकेत जाऊन त्या संबंधित काम करावेच लागते.

by Team Gajawaja
0 comment
Bank rule change
Share

देशभरात सर्वच व्यवहार हे डिजिटल पद्धतीने केले जातात. मात्र कधीना कधी तरी प्रत्येकाला बँकेत जाऊन त्या संबंधित काम करावेच लागते. अशातच चेक भरणे असो, चेक टाकणे अथवा मोठ्या रक्कमेचे ट्रांजेक्शन असो आपण बँकेत जातोच.  सध्या प्रत्येकाचेच बँकेत  खाते असते. मात्र लवकरच बँकिंग सिस्टिमचा असा एक नियम बदलला जाणार आहे, याचा थेट परिणाम ग्राहकावर होणार आहे. कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराची मात्र मज्जा होणार आहे. या बद्दल दीर्घकाळापासून विचार केला जात होता आणि इंडियन बँकिंग असोसिएशनने सुद्धा या बदलावाला मंजूरी दिली आहे. आता आर्थमंत्रलायाने यासाठी मंजूरी दिली असेल तर हा नियम लागू होऊ शकतो.(Bank rule change)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बँकांना आता आठवड्यातून एक ऐवजी दोन दिवसांची सुट्टी मिळू शकते. खरंतर सध्या महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद असते. आता केवळ पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सुद्धा बँकेला सुट्टी मिळू शकते. आयबीएम दीर्घकाळापासून आठवड्यातून दोन दिवसांच्या सुट्टीची मागणी करत होता आणि असोसिएशनकडून याला मंजूरी मिळाली आहे.

इंडियन बँकिंग असोसिएशनच्या २८ जुलैला झालेल्या बैठीकत कर्मचाऱ्यांच्या युनियनने बँकेला शनिवारी सुट्टीच मिळावी अशी मागणी केली, ती उद्योग संघटनेने सुद्धा स्विकारली. आयबीएने आता हा प्रस्ताव अर्थमंत्रालयाला पाठवला आहे. असोसिएशनला विश्वास आहे की, या प्रस्तावाला लवकरच मंजूरी मिळू शकते. सरकारला हा प्रस्ताव मंजूर करण्यास कोणतीही हरकत नसावी.

सुट्ट्यांच्या या प्रस्तावासह आणखी एका प्रस्तावाचा सुद्धा समावेश आहे. यामध्ये असे म्हटले गेले आहे की, आठवड्यातील भले कामाचे दिवस कमी केले जातील, मात्र कामाची वेळ वाढवली जाईल. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर केवळ आठवड्यातील पाच दिवस बँकांचे कामकाज केले जाईल. याऐवजी दररोजच्या कामाच्या वेळेपेक्षा अधिक ४५ मिनिटे काम करावे लागेल. एकूणच दररोज ४५ मिनिटे अधिक काम केल्याने कर्मचाऱ्यांना महिन्यात २ अधिक सुट्ट्या मिळू शकतात. (Bank rule change)

हेही वाचा- चेक जमा करण्यापूर्वी जाणून घ्या पोस्ट डेटेल, स्टेल आणि एंट डेटेड चेकबद्दल अधिक

असे हे पहिल्यांदाच होत नाही आहे की, सुट्ट्यांबद्दलचा नियम बदलला जाईल. याआधी २०१५ पासून सातत्याने बदल केला जात आहे. यापूर्वी बँकांचे सहा दिवस कामकाज चालायचे. केवळ रविवारीच सुट्टी असायची. मात्र त्यानंतर आता एका महिन्यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांची घोषणा केली होती. अशातच सुट्ट्यांची संख्या वाढली जाऊ शकते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.