Home » मणिपूरमध्ये महिलांची विवस्र धिंड काढण्यासाठी कारणीभूत ठरली ‘ही’ अफवा

मणिपूरमध्ये महिलांची विवस्र धिंड काढण्यासाठी कारणीभूत ठरली ‘ही’ अफवा

मणिपूरमध्ये दोन महिलांची विविस्र धिंड काढण्याच्या प्रकरणावरुन मानवजातीवर आता विविध प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात तुफान व्हायरल झाले.

by Team Gajawaja
0 comment
Manipur Violence
Share

मणिपूरमध्ये दोन महिलांची विविस्र धिंड काढण्याच्या लज्जास्पद प्रकरणावरुन मानवजातीवर आता विविध प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलीय. प्रत्येक स्तरातून याचा संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियात ही विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. खरंतर ही घटना ४ मे रोजीची आहे. मात्र ७७ दिवसानंतर ती उघडकीस आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या गदारोळामुळे या घटनेत नक्की काय काय झाले याची अधिक माहिती आता समोर आली आहे. पोलिसांच्या सुत्रांनी असे म्हटले आहे की, ही लज्जास्पद घटना एका फेक न्यूजच्या कारणास्तव घडली. (Manipur Violence)

मणिपूरमध्ये ३ मे रोजी मैतेई आणि कुकी समाजात हिंसाचार झाला होता. खरंतर मणिपूर मधील मैतेई समाजाची अशी मागणी आहे की, त्यांना कुकी समाजाप्रमाणे राज्यात शेड्युल ट्राइब (ST) चा दर्जा मिळावा. याच्या विरोधात कुकी समाजाने आवाज उठवला आणि आदिवासी एकजुटता रॅली काढली. याचाच विरोध झाला आणि हिंसाचार झाला.

पसरली होती बलात्काराची अफवा
सुत्रांच्या मते, हिंसाचाराला जेव्हा सुरुवात झाली त्यानंतर अशी अफवा समोर आली की, मैतेई समुदायातील एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. या बातमीमुळे मैतेई समुदायातील लोक संतप्त होत मैतेई समाजातील लोकांच्या जमावाने कोंगपो जिल्ह्यात प्रवेश केला. येथील स्थानिकांची घर लुटली आणि काही ठिकाणी आग ही लावली. येथीन कुकी समाजातील एका परिवारातील चार लोक आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या शेजाऱ्यांसोबत जंगलात पळून गेले. त्यानंतर जंगलातून पोलिसांनी पाच लोकांना वाचवले आणि त्यांना घेऊन पोलीस स्थानकाच्या दिशेने निघाले.

त्याचवेळी मैतेई समुदायातील लोकांचा जमाव तेथे पोहचला आणि त्यांनी पोलिसांचा मार्ग अडवला. सर्व पाच लोकांना मैतेई समाजातील लोकांनी पोलिसांच्या ताब्यातून हिसकावून घेतले. पाच लोकांपैकी भाऊ आणि वडिलांची हत्या केली गेली. तर राहिलेल्या तीन महिलांना विवस्र करण्यात आले आणि त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार केलेच. पण त्याचा व्हिडिओ ही काढला. नंतर यामधील एक महिलेने तेथून कसातरी आपला जीव वाचवत पळ काढला. (Manipur Violence)

४ मे चे प्रकरण, १८ तारखेला तक्रार दाखल
जमावाने आपल्यासोबत केलेल्या या लज्जास्पद प्रकारामुळे तीन महिला घाबरल्या गेल्या आणि त्यांनी पोलिसात तक्रार सुद्धा केली नाही. त्यानंतर १८ मे रोजी गावातील काही लोकांनी तक्रार दाखल केल्यानंतर २१ मे रोजी याचा एफआयआर दाखल केला गेला.

जवळजवळ एक महिना उलटल्यानंतरही या प्रकरणावर कारवाई केली गेली नाही. मात्र जेव्हा २० जुलैला व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले. आता पर्यंत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा- लादेनला ठार करण्यासाठी ओबामांनी असा बनवला होता सिक्रेट प्लॅन

या एकूणच प्रकरणावर मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, ज्यावेळी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा आम्ही तातडीने अॅक्शन घेत आरोपींची ओळख पटवून कारवाई केली. या व्यतिरिक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असे म्हटले की, या घटनेतील गुन्हेगारांना माफ केले जाणार नाही.


हे सुद्धा पहा- 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.