Home » सरकारची मोठी घोषणा, 75 लाख महिलांना मोफत मिळणार गॅस सिलिंडर

सरकारची मोठी घोषणा, 75 लाख महिलांना मोफत मिळणार गॅस सिलिंडर

केंद्रातील मोदी सरकारने देशातील ७५ लाख महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. कॅबिनेटच्या बैठकत नुकत्याच उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजूरी दिली गेली आहे.

by Team Gajawaja
0 comment
Pradhan Mantri Ujjwala Yojana
Share

केंद्रातील मोदी सरकारने देशातील ७५ लाख महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. कॅबिनेटच्या बैठकत नुकत्याच उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजूरी दिली गेली आहे. त्या अंतर्गत ७५ लाख नवे मोफत एलपीजी कनेक्शन दिले जाणार आहेत. आता उज्ज्वला योजनेचा फायदा ९.६० कोटी महिलांना होत आहे. नव्या फ्री एलपीजी कनेक्शननंतर याचा आकडा १० कोटींच्या पार जाणार आहे. (Pradhan Mantri Ujjwala Yojana)

उज्ज्वला योजना मोदी सरकारच्या फ्लॅगशिप योजनेपैकी एक आहे. देशभरात दारिद्र रेषेखालील महिलांपर्यंत स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन देण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली होती. नुकत्याच सरकारने रक्षाबंधनाच्या दिवशी देशभरात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरवर २०० रुपयांची सब्सिडी देण्याची घोषणा केली होती. तर योजनेच्या लाभार्थ्यांना यासाठी सूट एकूण ४०० रुपयांची केली होती.

Tweet: 

मोदी सरकारने स्पष्ट केले आहे की, ७५ लाख कनेक्शन पुढील तीन वर्षात वितरित केले जातील. उज्ज्वला योजनेअंतर्गत फ्री एलपीजी गॅस सिलिंडर कनेक्शनवर प्रत्येक कनेक्शनसाठी २२०० रुपयांची सब्सिडी दिली जाईल. यावर शासकीय खजिन्यातून जवळजवळ १६५० कोटींचा खर्च केला जाईळ. तर पहिला सिलिंडर मोफत भरणे आणि त्याचसोबत एक गॅस मोफत देण्याचा संपूर्ण खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलतील.

उज्ज्वला योजनेच्या विस्ताराबद्दल घोषणा करत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी असे म्हटले की, याचा लाभ बहुतांशकरुन त्या महिलांना मिळणार आहे जे कोळसा किंवा लाकडाची चूल वापरतात. त्यांना या धुरातून मुक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय महत्त्वाचा आहे. त्याचसोबत पर्यावरणाची सुद्धा यामुळे हानि होणार नाही. (Pradhan Mantri Ujjwala Yojana)

हेही वाचा- One Nation One Election चे फायदे-तोटे

मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेची सुरुवात २०१६ मध्ये झाली होती. तेव्हा यामध्ये ५ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर ८ कोटी ते केले. या योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शनसह सब्सिडीवर सिलिंडर भरण्याची सुद्धा सुविधा दिली जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.