Home » मुलांना असे बनवा Emotionally Strong, आयुष्यातील प्रत्येक संकटात राहतील खंबीरपणे उभे

मुलांना असे बनवा Emotionally Strong, आयुष्यातील प्रत्येक संकटात राहतील खंबीरपणे उभे

बहुतांशवेळा असे होते की, जेव्हा मुलं रडतात त्यावेळी पालक प्रेमाने समजावून सांगण्याऐवजी आपल्या मुलांनीच स्वत:हून शांत व्हावे असे त्यांना वाटते. पण लहान मुलांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे सोप्पे काम नाही.

by Team Gajawaja
0 comment
parenting tips
Share

Parenting Tips : बहुतांशवेळा असे होते की, जेव्हा मुलं रडतात त्यावेळी पालक प्रेमाने समजावून सांगण्याऐवजी आपल्या मुलांनीच स्वत:हून शांत व्हावे असे त्यांना वाटते. पण लहान मुलांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे सोप्पे काम नाही. मनोवैज्ञानिक असे सांगतात की, प्रत्येक मुल वेगवेगळे असतात. त्यांचे वागणेही वेगळे असते.

मुलांमध्ये नकारात्मक भावना नियंत्रित करण्याची त्यांची क्षमता त्यांचा स्वभाव, ज्या वातावरणात ते वाढतायत यासह अन्य काही गोष्टींवर अवलंबून असते. याशिवाय मुलांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालक, शिक्षक किंवा त्यांची काळजी घेणारी लोक शिकवतात. पण जी मुलं आपल्या भावना व्यवस्थितीत कंट्रोल करू शकतात तिच मुलं शाळेत उत्तम कामगिरी करतात. यादरम्यान, पालकांची मुलांप्रति भुमिकाही फार महत्त्वाची असते. अशातच मुलांचा मानसिक विकास उत्तम होण्यासह भावनांवर कंट्रोल करणे कसे शिकवावे याबद्दल जाणून घेऊया….

-मुलांना इमोशनली स्ट्रॉन्ग बनवायचे असल्यास त्यांच्याशी आधी पालकांनी मित्रत्वाचे नाते तयार केले पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याच्यासोबत शेअर केली पाहिजे. याशिवाय मुलाला देखील त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी विचारल्या पाहिजेत. (Parenting Tips)

-पालक किंवा घरातील अन्य मंडळी मुलांच्या वागण्याबद्दल अशावेळी बोलतात जेव्हा ते फार लहान असतात. अशातच तुम्ही मुलांना एखादा सिनेमा किंवा पुस्तकातील पात्र दाखवून त्यांच्या भावनांवर कंट्रोल करण्यास शिकवू शकता.

-काही अभ्यासातून असे समोर आले आहे की, मुलांसोबत पालकांची वागणूक उत्तम असेल तर मुलही आपल्या भावना त्यांच्यसोबत खुलेपणाने व्यक्त करू शकतात.

-मुलांना त्यांच्या भावना ओखळणे आणि त्यांना नाव देण्यास शिकवा. जेणेकरुन जेव्हा ते एखाद्या समस्येत असतील त्यावेळी भावना व्यक्त करताना त्याबद्दल अधिक स्पष्टपणे बोलू शकतात.


आणखी वाचा :
मुलांना घरात एकटे सोडण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
नोकरीसाठी इंटरव्यू देण्यासाठी चिंता सतावतेय? या ट्रिक वापरुन राहा टेंन्शन फ्री
रिलेशनशिपमध्ये प्रेमच नव्हे तर ‘या’ गोष्टींनाही द्या महत्त्व

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.