Home » जुने घर विक्री करताना किती टॅक्स भरावा लागतो?

जुने घर विक्री करताना किती टॅक्स भरावा लागतो?

तुम्हाला जुने घर विकायचे असल्यास आणि त्यामधून येणारे पैसे टॅक्स फ्री नसल्यास काय करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

by Team Gajawaja
0 comment
Property Gift Deed
Share

Property Info : घर खरेदी किंवा विक्री करण्याआधी प्रत्येकाला काही ना काही प्रश्न असतता. घर विक्री करून येणाऱ्या पैशांबद्दलही काही प्रश्न विचारले जातात. जसे की, घर विक्री केल्यानंतर त्यावर टॅक्स लागेल का, किती लागेल आणि टॅक्स लागणार असल्यास त्यापासून कसा बचाव करायचा अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया…..

कधी आकारला जातो कॅपिटल गेन टॅक्स
तुम्ही रहिवाशी प्रॉपर्टी विक्री करून नफा मिळवत असल्यास तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. इन्कम टॅक्सच्या सेक्शन 48 नुसार, एखादे घर खरेदी केल्यानंतर दोन वर्षांमध्ये विक्री केल्यास त्याच्या नफ्यावरील टॅक्स भरावा लागेल. याशिवायय दोन वर्षांपेक्षा अधिक काळानंतर विक्री केल्यास तुम्हाला त्यामधून मिळणाऱ्या नफ्याला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन असे म्हटले जाते. यावर तुम्हाला 20 टक्के हिशोबाने कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. (Property Info)

दुसरे घर खरेदी केल्यानंतर मिळणार सूट
इन्कम टॅक्सच्या कलम 54 नुसार, तुम्ही घर विक्री करून नवी रहिवाशी प्रॉपर्टी खरेदी करत असल्यास तुम्हाला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये सूट मिळते. ही सूट केवळ इंडिविज्युअल इन्कम टॅक्स पेयर्स किंवा हिंदू अनडिवाइडेड फॅमिलीलाच मिळेल. खरेदी आणि विक्री करण्यात आलेल्या प्रॉपर्टी कर्मशिअल नसावी. जुने घर विक्री करून दोन वर्षात नवे घर घ्यावे लागते. याशिवाय घराचे बांधकाम करणार असल्यास तीन वर्षांपर्यंत सूट मिळते. लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्सची ही सूट 10 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रॉपर्टीवरच मिळू शकतो.


आणखी वाचा :
असे कोणते देश आहेत जेथे एकही भारतीय नागरिक नाही
बंद फोन हरवल्यावर शोधून देईल Google
आता रशियाच्या रेल्वेमार्गाचे नवे पर्व सुरु होणार

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.