Home » आता रशियाच्या रेल्वेमार्गाचे नवे पर्व सुरु होणार

आता रशियाच्या रेल्वेमार्गाचे नवे पर्व सुरु होणार

by Team Gajawaja
0 comment
Russia RailwaysMarge
Share

भारत आणि रशिया या दोन देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधाचा पुढचा अध्याय आता सुरु होत आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभर रशियावर टीका करण्यात आली.  मात्र अशाही वेळी भारताबरोबर रशियाचे संबंध मैत्रीपूर्ण होते. याच काळात भारतानं रशियाबरोबर व्यापार वाढवला. पुढच्या काही काळात हाच व्यापार अधिक वेगानं होणार असून त्यासाठी नव्या रेल्वेमार्गाचे काम सुरु आहे. अर्थातच रशियाची राजधानी मास्को ते आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई असा थेट रेल्वे मार्ग असणार आहे. या मार्गावरुन अवघ्या दहा दिवसांचा प्रवास करुन दोन्ही देशात जाता येणार आहे. स्वप्नवत वाटणा-या या मार्गाची पूर्तता पुढच्या तीन वर्षात होण्याची आशा आहे.  हा मार्ग सुरु झाल्यावर या दोन्ही देशांसह अरबदेशांबरोबरही भारताला व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.  (Russia RailwaysMarge)

भारताच्या व्यापार विकासात महत्त्वाची भूमिका बजावणा-या मुंबई-मॉस्को मार्गाच्या कामाला वेग आला आहे.  या दोन्ही देशांमधील व्यापाराच्या विकासासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे.  इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर असे या कॉरिडॉरचे नाव आहे. या मार्गाची लांबी 7200 किमी आहे. भारत, रशिया, इराण आणि अझरबैजान हे त्याचे भागीदार आहेत. या मार्गाने, समुद्र, रेल्वे आणि रस्ते मार्गे 45 दिवसांऐवजी 10 दिवसांत भारतातून रशियाला व्यावसायिक मालाची वाहतूक करता येईल. याचा सर्वाधिक फायदा नाशवंत मालाला होणार आहे.  या मार्गाचा महत्त्वाचा भाग असलेल्या अझरबैजान या देशामध्ये फळांचे भांडार आहे.  येथील फळांना जगभर मोठ्याप्रमाणात मागणी आहे.  हा सागरी रेल्वे मार्ग झाल्यावर या देशालाही त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.  (Russia RailwaysMarge)

युक्रेनबरोबर युद्ध सुरु केल्यावर रशियाचे आणि युरोपचे संबंध तणावाचे झाले आहेत.  त्यामुळे युरोपबरोबर रशियाचा व्यापारही मंदावला आहे.  याचा फायदा काही प्रमाणात आशीयाई देशांना जाला आहे.  आता याच आशिया खंडातील देशांसाठी हा नवा रेल्वेमार्ग प्रगतीचे नवे द्वार ठरणार आहे.  यामुळे युरोपीय देशांवर अवलंबून असलेल्या अनेक गरजा पूर्ण करता येणार आहेत.  त्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ, नाशवंत फळे, आणि अन्य गोष्टींचा समावेश आहे.  या रेल्वे मार्गाचा सर्वात मोठा भाग असलेला 14 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला 165 किमी लांबीचा रेल्वे मार्ग हा रशिया आणि इराण यांच्यामधील बंदरांना जोडण्यात येणार आहे.  या देशांना जाण्यासाठी हवाई मार्ग किंवा बोटीचा वापर करण्यात असे.  हवाई मार्ग खर्चिक तर बोटीचा मार्ग हा जास्त वेळ लावणारा आहे. 

यावर उपाय म्हणून चालू होणा-या रेल्वेमार्गामुळे मॉस्को, सेंट पीटर्सबर्गसारख्या रशियन शहरांमधून मुंबईमधील बंदर गाठायला अवघा दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे.   या प्रकल्पासाठी रशियाने इराणला सुमारे 12 हजार कोटी रुपयांचे कर्जही दिले आहे.  त्यामुळे इराणने 160 किमी लांबीचा रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. इराणमधील रस्त शहर ते अस्तारा यांना जोडणाऱ्या रेल्वे ट्रॅकचे कामही  वेगाने सुरू झाले आहे. अझरबैजानमधील रेल्वे ट्रॅक आणि यार्डचे काम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे.   अशाच वेगानं हे काम झाले तर 2028 या वर्षाच्या सुरुवातीलाच हा संपूर्ण कॉरिडॉर तयार होऊन नवीन व्यापार संधी उपलब्ध होणार आहेत.(Russia RailwaysMarge)

स्वतः रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन या नव्या मार्गासाठी उत्सुक आहे.  हा रेल्वेमार्ग सुरु झाल्यावर सुएझ कालव्याचे महत्त्व संपूष्ठात येईल, अशीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी व्यापारावर असलेले युरोपचे नियंत्रणही संपूष्ठात येणार आहे.  या रेल्वे मार्गाने रशियन व्यावसायिकांना भारतासह सौदी अरेबिया, यूएई आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्ये पोहोचणे सोपे होणार आहे. याशिवाय रशिया आणि चीनमधील व्यापारी मार्गांसाठी नवीन पर्यायही उपलब्ध होणार आहे. (Russia RailwaysMarge)

============

हे देखील वाचा : उन्हामुळे पायाची त्वचा काळवंडलीये? करा हे उपाय

============

मुंबई, पर्यायानं भारतासाठी हा मार्गही खूप फायदेशीर ठरणार आहे.  आज मुंबईहून मॉस्कोला व्यापारी वाहतूक करायची असेल तर त्यासाठी  14 हजार किमी अंतर कापावे लागते. हा मार्ग सुएझ कालव्यातून जातो. 45 दिवसांचा कालावधी लागणारा हा मार्ग खर्चिक आहेच.  शिवाय त्यावर लागणा-या वेळेमुळे अनेकवेळा व्यापारी मालाचे नुकसानही होत आहे.  पण मुंबई ते मास्को हा रेल्वेमार्ग सुरु झाल्यावर हा कालवधी फक्त दहा दिवसांचा असेल.  शिवाय रेल्वे असल्यामुळे त्यात माल अधिक पाठवता येणार आहे.  त्याचा वाहतूक खर्चही अतिशय कमी असणार आहे.  पुढच्या चार वर्षात सुरु होणा-या या रेल्वे मार्गाची प्रतीक्षा भारत आणि रशिया यांना आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.