Home » बंद फोन हरवल्यावर शोधून देईल Google

बंद फोन हरवल्यावर शोधून देईल Google

गुगलने गेल्या वर्षात अॅन्ड्रॉइड 14 सिस्टिम लॉन्च केला होता. आता कंपनीने अॅन्ड्रॉइड 15 सिस्टमवर काम करत आहे. जे गुगलच्या अपकमिंग मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम आहे.

by Team Gajawaja
0 comment
Google Search Trends India
Share

Tech Info : अॅन्ड्रॉइड फोन युजर्ससमोर एक मोठी अशी की, त्यांची बॅटरी संपल्यानंतर किंवा फोन चोरी झाल्यानंतर तो चोरट्यांकडून बंद केला जातो. अशातच युजर्सला फोन शोधणे मुश्किल होते. पण गुगलच्या आगामी अपडेटनंतर अॅन्ड्रॉइड युजर्सला फोन बंद झाल्याच्या स्थितीत आपला स्मार्टफोनचे नेमके लोकेशन अगदी सहज शोधू शकतात. यासाठी अधिक मेहनत करावी लागणार नाही.

खरंतर, गुगल लवकरच अॅन्ड्रॉइड 15 अपडेट घेऊन येणार आहे. यानंतर अॅन्ड्रॉइड युजर्सला आपला फोन बंद झाल्यानंतरही सहज शोधता येणार आहे. आतापर्यंत अॅन्ड्रॉइड फोन्समध्ये हे फीचर दिले जात नव्हते. याशिवाय गुगलने हे फीचर सर्वप्रथम पिक्सल सीरिजमध्ये रोलआउट केले होते. अशातच दुसऱ्या अॅन्ड्रॉइड युजर्सला या फीचरसाठी थोडी वाट पहावी लागणार आहे.

गुगलच्या या फोनमध्ये मिळणार अॅन्ड्रॉइड 5
गुगलने गेल्या वर्षी अॅन्ड्ऱॉइड 14 सिस्टिम लाँच केली होती. आता कंपनी अॅन्ड्रॉइड 15 सिस्टिमवर काम करत आहे. अॅन्ड्रॉइड 15 OS मध्ये गुगल स्मार्टफोन युजर्सला उत्तम फीचर देणार असून फोन बंद झाल्यानंतरही त्याचे लोकेशन कळणार आहे. (Tech Info)

फाइंड माय फीचर गुगल करणार बंद
अॅन्ड्रॉइड पोलीस यांच्या रिपोर्ट्सनुसार, गुगल अॅन्ड्रॉइड 15 अपडेटमध्ये फाइंड माय फीचर बंद करणार आहे. हे फीचर पिक्सल 8 आणि पिक्सल 8 प्रो फोन आणि गुगलच्या अपकमिंग फोनवर मिळणार आहे.

गुगलच्या अपकमिंग OS अॅन्ड्रॉइड 15 मध्ये पासवर्ड आणि फाइंडिंग फिचर मिळणार आहे. हे नवे सिस्टिम प्रीक्प्यूटेड ब्लुटूथ बीकन असणार आहे. याशिवाय डिवाइस मेमोरीने कंट्रोल केले जाणार आहे. दरम्यान, यासाठी डिवाइसच्या हार्डवेअरमध्ये काही बदलही करावे लागणार आहेत. ज्यामुळे फोन बंद झाल्यानंतरही ब्लुटूथ कंट्रोलला पॉवर सप्लाल मिळत राहिल. याशिवाय डिवाइसचे डिटेल शेअर केल्यानंतर ब्लुटूथ फाइंडर हार्डवेअर एब्स्ट्रॅक्शन लेअर सपोर्ट करणार आहे.


आणखी वाचा :

WhatsApp घेऊन येणार नवे प्रायव्हसी फिचर, आता प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट काढता येणार नाही

OTT प्लॅटफॉर्म, वेबसाइट आणि अॅपवरील अश्लील कंटेट अशा प्रकारे सरकारकडून तपासून पाहिला जातो

KYC च्या नावाखाली केली जातेय फसवणूक, फोनवर आलेल्या या मेसेजपासून राहा सतर्क


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.