Home » WhatsApp घेऊन येणार नवे प्रायव्हसी फिचर, आता प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट काढता येणार नाही

WhatsApp घेऊन येणार नवे प्रायव्हसी फिचर, आता प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट काढता येणार नाही

र्केटमध्ये अनेक प्रकारचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. पण तरीही व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर मेसेजिंगसाठी केला जातो. याच कारणास्तव वेळोवेळी व्हॉट्सअॅपकडून अपडेट्स आणले जातात

by Team Gajawaja
0 comment
WhatsApp New Feature
Share

WhatsApp Privacy Feature : मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. पण तरीही व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर मेसेजिंगसाठी केला जातो. याच कारणास्तव वेळोवेळी व्हॉट्सअॅपकडून अपडेट्स आणले जातात. अशातच आता प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट युजर्सला काढता येणार नाही. खरंतर, कंपनीने मेसेजिंग अॅपच्या प्रायव्हेसीच्या कारणास्तव हा निर्णय घेण्याचा विचार केला जात आहे.

अॅन्ड्रॉइड पोलिसांच्या रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅपवर प्रायव्हेसी संदर्भात काम केले जात आहे. दरम्यान, मेटा किंवा व्हॉट्सअॅपने याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. नवे प्रायव्हेसी अपडेट व्हॉट्सअॅप सर्वरकडून येणार आहे. याचा अर्थ असा आहे की, अॅप आणि ब्राउजरसाठी नवे अपडेट आणळे जाणार आहे.

व्हॉट्सअॅपवर प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट काढता येणार नाही
रिपोर्टनुसार, कोणत्याही युजरला दुसऱ्या युजरच्या प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट घेता येणार नाही. त्याला स्क्रिनशॉर्ट घेताना अॅलर्टचा मेसेज दाखवला जाईल. मोबाईल फोन आणि डेस्कटॉप या दोघांमध्ये व्हॉट्सअॅपच्या बीटा आणि स्टेबल अशा दोन्ही वर्जनमध्ये प्रायव्हेसी अपडेटचे काम केले जाणार आहे. सध्या व्हॉट्सअॅपला सिग्नल आणि टेलिग्रामकडून टक्कर दिली जात आहे. पण हे दोन्ही प्लॅटफॉर्म युजर्सला प्रायव्हेसीचे कोणतेही फिचर्स देत नाही. (WhatsApp Privacy Feature)

आणखी एक नवे फीचर येणार
व्हॉट्सअॅप आणखी एक नव्या फीचरवर काम करत आहे. याच्या मदतीने युजर्सला दुसऱ्या मेसेजिंग अॅपवर देखील मेसेज पाठवता येणार आहेत. युजर्सला मेसेज शेअर करण्यासाठी सिग्नल, टेलिग्राम सारख्या अॅपचे ऑप्शन मिळणार आहे. WABetainfo च्या मते हे फीचर सध्या व्हॉट्सअॅप बीटा वर्जन 2.24.5.18 वर उपलब्ध आहे.


आणखी वाचा :
देशातील पहिले डॉफ्लिन संशोधन केंद्र
जगातील श्रीमंत महिलांमध्ये ‘या’ भारतीय लेडीचाही समावेश
जगातील सर्वाधिक मोठी शंकराची मूर्ती या ठिकाणी आहे

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.