Home » वयाच्या पंन्नाशीत मेकअप करताना करू नका या चुका, बिघडेल लुक

वयाच्या पंन्नाशीत मेकअप करताना करू नका या चुका, बिघडेल लुक

प्रत्येक वयातील महिलेला मेकअप करणे पसंत असते. पण काही चुकांमुळे मेकअप केल्यानंतरही लुक बिघडला जातो. खासकरून वाढत्या वयात मेकअपवेळी काही चुका करणे टाळले पाहिजे.

by Team Gajawaja
0 comment
Make up kit
Share

Makeup Tips :  मेकअप करणे प्रत्येक महिलेला आवडते. पण मेकअप करताना काही चुका केल्याने संपूर्ण लुक बिघडला जातो. आजकाल प्रत्येक वयातील महिलेला स्टाइलिश दिसावे असे वाटते. यामुळे फॅशनेबल कपड्यांसह मेकअपकडे देखील खास लक्ष दिले जाते. पण एका वयानंतर आपल्या त्वचेची खास काळजी घेणे आवश्यक आहे. अशातच मेकअपसंबंधित काही सामान्य चुका तुम्ही वयाच्या पंन्नाशीनंतर करू नये.

अधिक गडद मेकअप करू नये
बहुतांश महिला मेकअपदरम्यान डोळ्यांवर खूप मेकअप करतात. यामुळे संपूर्ण लुक बिघडला जातो. अधिक शॅडो किंवा डार्क ब्लॅक पेन्सिल आणि आयलाइनरचा वापर करू नये. वाढत्या वयासह डोळ्यांच्या आसपास स्किन पिगमेंटेशन होते, यामुळे डार्क मेकअप केल्याने तुमचा लुक बिघडला जाऊ शकतो.

मॅट लिपस्टिक आणि ग्लॉस
वाढत्या वयासह तुम्ही मॅट लिपस्टिक आणि लिप ग्लॉसपासून दूर रहावे. त्याऐवजी तुम्ही मॅट लिपस्टिक लावण्याआधी लिप बाम किंवा लाइट वेट लिपस्टिक लावू शकता.

लोअर आय मेकअप
काही मेकअप एक्सपर्ट्स असे म्हणतात की, वयाच्या पंन्नाशींतर तुम्ही वॉटर लाइन आणि लॅश लाइनवर वॉटर प्रुफ पेन्सिलचा वापर करावा. फ्रेश आय मेकअपसाठी डोळ्यांखाली त्याचा वापर करू नये. (Makeup Tips)

लाइट शेड आय शॅडो
बहुतांश मेकअप आर्टिस्ट नेहमीच महिलांच्या वयानुसार आय शॅडोची निवड करतात. मेकअप एक्सपर्ट्सच्या मते, वाढत्या वयासह लाइट शॅडोचा वापर करू नये. त्याऐवजी तुम्ही मिडनाइट ब्लू आय शॅडोचा वापर करू शकता.

आय लॅश प्राइमर
मेकअप लावण्याआधी नेहमीच आय लॅश प्राइमरचा वापर करा. यामुळे आय लॅशेजला वॉल्यूम मिळेल आणि डोळ्यांची सुंदरता वाढली जाईल. यामुळे वाढत्या वयात क्लिन आय मेकअपसाठी आय लॅश प्रायमर जरूर लावा.


आणखी वाचा :
उन्हामुळे पायाची त्वचा काळवंडलीये? करा हे उपाय
होळीच्या रंगामुळे त्वचा बिघडू नये म्हणून चेहऱ्याला लावा ‘या’ गोष्टी
कोरडी त्वचा असेल तर आंघोळीच्या पाण्यात ‘या’ गोष्टी मिक्स करून पाहा फरक

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.