Home » इंटरनेटशिवाय तुम्ही करू शकता अधिक पैशांचे ट्रांजेक्शन

इंटरनेटशिवाय तुम्ही करू शकता अधिक पैशांचे ट्रांजेक्शन

भारतीय रिजर्व्ह बँकेने इंटरनेटशिवाय युपीआय लाइटच्या माध्यमातून पेमेंट करण्याची मर्यादा २०० रुपयांवरुन ५०० रुपये केली आहे.

by Team Gajawaja
0 comment
UPI Lite
Share

पेमेंटसाठी युपीआय लाइटचा वापर करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय रिजर्व्ह बँकेने इंटरनेटशिवाय युपीआय लाइटच्या माध्यमातून पेमेंट करण्याची मर्यादा २०० रुपयांवरुन ५०० रुपये केली आहे. आरबीआयने मॉनिटरी पॉलिसीची घोषणा करत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली आहे. (UPI Lite)

युपीआय लाइट एक ऑन डिवाइस वॉलेट सुविधा आहे. त्यामध्ये युजर्सला रियल टाइममध्ये लहान अमाउंटचे पेमेंट युपीआय पिनशिवाय करता येणार आहे. सर्वसामान्यपणे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज असते. युपीआय लाइटमध्ये अधिकाधिक २ हजार रुपयांपर्यंतचा बॅलेंन्स ठेवता येऊ शकतो. आरबीआयच्या युपीआय मर्यादेत वाढ करण्याच्या घोषणेमुळे देशात डिजिटल पेमेंटला अधिक प्रोत्साह मिळू शकते.

युपीआय लाइटच्या पेमेंटची मर्यादा २०० रुपयांनी वाढवून ५०० रुपये करण्यामागील उद्देश असा की, सध्याच्या दिवसात लहान ट्रांजेक्शनसाठी युपीआयचा वापर करण्यासाठी नागरिकांना सक्षम बनवणे. युपीआय लाइटच्या लॉन्चिंगनंतर याच्या ट्रांजेक्शनची मर्यादा वाढवावी अशी मागणी केली जात होती. अशातच आरबीआयने याची मर्यादा ५०० रुपयांपर्यंत केली आहे.

एमपीसी बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी असे म्हटले की, डिजिटल पेमेंटचा अनुभव उत्तम बनवण्यासाठी आर्टिफिशियल सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस सिस्टिमला जोडण्यास मदत केली जाईल.त्याचसोबत ग्राहकांना उत्तम अनुभव ही येईल.

या व्यतिरिक्त आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मॉनिटरी पॉलिसीच्या समितीच्या बैठकीनंतर असे म्हटले की, रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. असे सातत्याने दुसऱ्यांदा झाले आहे की, बँकांचा रेपो रेट स्थिर ठेवण्यात आला आहे. रेपो रेट मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्याजदर यामुळे ६.५ टक्केच राहणार आहे.याचा अर्थ असा की, सामान्य नागरिकाचे होम लोन, ऑटो लोन किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे कर्ज महागणार नाही आणि त्यांच्यावर अतिरिक्त ईएमआयचा बोझा सुद्धा पडणार नाही. (UPI Lite)

हेही वाचा- तुम्ही बनावट IRCTC चा अॅप तर डाउनलोड केला नाही ना? असे ओळखा

Google Pay वर कसे अॅक्टिव्हेट कराल लाइट फिचर
-सर्वात प्रथम गुगल पे सुरु करा
-अॅपच्या होम स्क्रिनवर सर्वात वर डाव्या बाजूला असलेल्या प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा
-आता UPI Lite Pay Pin Free वर क्लिक करा आणि गाइडलाइन्सचे पालन करा
-पैसे अॅड केल्यानंतर एक बँक खाते निवडण्याचा पर्याय तु्म्हाला दाखवला जाईल, जो युपीआय लाइटला सपोर्ट करेल
-युपीआय पिन टाकल्यानंतर युपीआय लाइट अकाउंट यशस्वीपणे अॅक्टिव्ह होईल
-लक्षात ठेवा तुम्ही गुगल पे वर केवळ युपीआय लाइट अकाउंटच तयार करु शकता


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.