Home » भारतातील ‘या’ मंदिरात बुलेट गाडीची केली जाते पूजा

भारतातील ‘या’ मंदिरात बुलेट गाडीची केली जाते पूजा

तुम्ही कधी बुलेट मोटरसायकलच्या मंदिराबद्दल ऐकले आहे का? खरंतर राजस्थानमध्ये असे एक मंदिर आहे जेथे बुलेट बाइकची पूजा केली जाते.

by Team Gajawaja
0 comment
Bullet Temple
Share

Bullet Mandir : भारतात गाडीसंदर्भात वेगवेगळ्या मान्यता आहे. काहीजण नवी कार किंवा बाइक खरेदी केल्यानंतर सर्वप्रथम त्याची पूजा करण्याची मंदिरात जातात. पण काहीजण असे देखील आहेत, त्यांच्या गाडीमध्ये देवी-देवतांचे फोटो असतात. पण तुम्ही कधी बुलेट मोटरसायकलच्या मंदिराबद्दल ऐकले आहे का? खरंतर राजस्थानमध्ये असे एक मंदिर आहे जेथे बुलेट बाइकची पूजा केली जाते. पाली-जोधपुर हायवेवर चोटिला गावातील रस्त्याजवळ एका झाडाजवळ एक पारा तया करण्यात आला आहे. यावर बुलेट मोटरसायकल उभी आहे. जोधपुर पासून हे मंदिर 53 किलोमीटरवर आहे.

मंदिराची कथा
राजस्थानमधील बुलेट मंदिराची कथा खास आहे. खरंतर, सन 1991 मध्ये एक दुर्दैवी अपघात घडला असता त्यामध्ये राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील ओम सिंह राठौड यांचा मृत्यू झाला होता. जेथे ओम यांचा अपघात झाला तेथेच ते मंदिर आहे. या ठिकाणी फोटोसोबत बुलेटही उभी करण्यात आली आहे. असे मानले जाते की, त्यांचा आत्म आजही हायवेवर होणाऱ्या अपघातापासून बचाव करतात.

मोटरसायकल झाली होती गायब
अपघातानंतर पोलिसांनी मोटरसायकल पोलीस स्थानकात आणली होती. पण रात्री मोटरसायकल तेथे नव्हती. ती ओम सिंह राठौड यांचा अपघात झाला तेथे होती. पोलिसांना देखील हे पाहून धक्का बसला. यानंतर पुन्हा मोटरसायकल पोलीस स्थानकात आणत साखळीने बांधून ठेवण्यात आली. यानंतर रात्रीच्या वेळी गाडी आपोआप सुरू झाली होती. (Bullet Mandir)

मंदिराबद्दलची मान्यता
मंदिराच्या आसपासच्या गावातील लोक ओम सिंह राठौड यांना आपला देव मानतात. केवळ हिच लोक नव्हे तर दूरदूरवरुन येणारी मंडळी देखील बुलेटची पूजा करतात. याळिवाय लोक बुलेटवर लाल धागा बांधत आपली इच्छाही व्यक्त करतात. लोक म्हणतात की, त्यांच्या इच्छा येथे आल्यानंतर पूर्ण होतात.


आणखी वाचा :
वाराणसी येथील मसान होळीबद्दच्या खास गोष्टी
उत्तरप्रदेश प्रयागराज येथे 2025 मध्ये महाकुंभ होणार
नंदा देवीच्या दर्शनासाठी देशविदेशातील पर्यटकांची गर्दी

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.