Home » वाराणसी येथील मसान होळीबद्दच्या खास गोष्टी

वाराणसी येथील मसान होळीबद्दच्या खास गोष्टी

वाराणसी येथे मसान होळी खेळण्याचे विशेष महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की, रंगभरी एकादशीच्या दिवसापासून बाबा विश्वनाथ आपल्या नगरीत भक्त आणि देवी-देवतांसोबत होळी खेळतात. याच्या दुसऱ्या दिवशी भस्म होळी खेळली जाते.

by Team Gajawaja
0 comment
Masan Holi
Share

Masan Holi : सनातन धर्मात होळी सणाला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण देशात होळीचा उत्साह पाहायला मिळतो. वेगवेगळ्या राज्यात होळीचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. पण काशीमध्ये भस्म होळी खेळण्याचे विशेष महत्त्व आहे. जेथे रंगभरी एकादशीच्या दुसऱ्या दिवसी महास्मशान मणिकर्णिका घाटावर मसान होळी खेळली जाते. अशातत वाराणसी येथील होळीचे महत्त्व काय आहे याबद्दलच जाणून घेऊया अधिक….

वाराणसीतील होळीचे महत्त्व
उत्तर प्रदेशातील मणिकर्णिका घाटावर मसान होळी आनंद-उत्साहात खेळली जाते. येथे शिव भक्त चितेच्या राखेने होळी खेळतात. वाराणसीमध्ये डमरुच्या आवाजासह शिव भक्त मसान नाथ मंदिरात शंकराची विशेष पूजा करतात. याशिवाय एकमेकांना चितेची राख लावून होळी खेळली जाते.

What is Masan Holi in Varanasi? - Quora

मसान होळीचे धार्मिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की, रंगभरी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी भगवान शंकर सर्व गुणांसोबत मणिकर्णिका घाटावर सर्व भक्तांना दर्शन गेतात आणि भस्म होळी खेळतातत. कारण लोकांचे असे मानणे आहे की, शंकराला भस्म अत्यंत प्रिय आहे. शंकर भस्मानेही आपला श्रृंगार करतात.

याशिवाय असे ही म्हटले जाते की, रंगभरी एकादशीच्या दिवशी भगवान शिव (भगवान शिवपूजा) आणि माता पार्वतीचा विवाह झाल्यानंतर, गौण पूजा केल्यानंतर, शिवाने त्यांना आपल्या घरी आणले आणि शंकरांने देवी-देवतांसोबत होळी खेळली. पण या होळीत भगवान शंकराचे प्रिय गण, भूत-प्रेत, पिश्चाच, निशाचर सहभागी झाले नाही. अशातच होळी खेळण्यासाठी भगवान शंकर स्वत: मसान घाटावर आले आणि भस्म होळी खेळली. (Masan Holi)

मसान मंदिराचा इतिहास
ऐतिहासिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की, 16 व्या शतकात जयपुरचा राजा मान सिंहने गंगा नदीच्या किनाऱ्यावरील मणिकर्णिका घाटावर मसान मंदिर उभारले. धार्मिक ग्रंथांमध्येही याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. येथे दररोज 100 लोकांवर अंत्यसंस्कार केले जातात. मसान होळीच्या दिवशी होळी खेळण्यासाठी विशेष रुपात चार ते पाच किलो लाकूड जाळले जाते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.