Home » उत्तरमेरुर शिलालेखाची ‘ही’ आहे खासियत

उत्तरमेरुर शिलालेखाची ‘ही’ आहे खासियत

by Team Gajawaja
0 comment
Uttaramerur inscription
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच तमिळनाडू मधील कांचीपुरम येथे असलेल्या उत्तरमेरुर शिलालेखाचा उल्लेख आपल्या भाषणात केला. भारताच्या लोकशाहीच्या इतिसावरील चर्चेदरम्यान त्यांनी या उल्लेन नक्की का केला? खरंर उत्तरमेरुरचा भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने पाहिल्यास त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे. असे मानले जाते की, हा शिलालेख ग्रामसभेसाठी एक स्थानिक संविधानाप्रमाणे आहे. तो असे सांगतो की, सभा कशी चालवाली? सदस्यांची योग्यता काय असावी? सदस्यंची निवड प्रक्रिया काय असावी आणि सदस्या कसे अयोग्य असतील.(Uttaramerur inscription)

कांचीपुरम मधील उत्तरमेरुर मध्ये काही वर्षांपासून काही शिलालेख आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रसिद्ध शिलालेख परांतकचा प्रथमचा उल्लेख मोदी यांनी आपल्या भाषणात केला. या शिलालेखात गावातील स्वशासनाबद्दल सविस्तरपणे माहिती दिली गेली आहे. इतिहासकार याचा उल्लेख लोकशाही कार्याचा पुरावा म्हणून करतात. परांतक प्रथमचा शासनकाल (९०७-९५३ ईस्वी) मानले जाते. उत्तरमेरुर चेन्नई पासून जवळजवळ ९० किमी दूर दक्षिण-पूर्वेला आहे.

Uttaramerur inscription
Uttaramerur inscription

कांचीपुरम जिल्ह्यात असलेल्या उत्तरमेरुर आज एक लहान शहर आहे. वर्ष २०११ मधील जनगणनेनुसार याची लोकसंख्या २५ हजार होती. हे पल्लव आणि चोल शासनकाळादरम्यान बनवण्यात आलेले आपले ऐतिहास मंदिरांपैकी एक असल्याचे मानले जातात. येथे प्रसिद्ध वैकुंठ पेरुमल मंदिरांच्या भींतीवर परांतक प्रथम यांच्या शासनकाळाचे प्रसिद्ध शिलालेख सुद्धा दिसतात.

शिलालेखात स्थानिक सभा, म्हणजेच ग्रामसभेच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये विशेष रुपात ब्राम्हणांची एक सभा सुद्धा होती आणि यामध्ये विविध गोष्टींसोबत काम करणारी एक विशेष समितीसुद्धा होती. या शिलालेखातील सदस्यांची निवड ते आवश्यक योग्यता, त्यांची भुमिका आणि जबाबदाऱ्या काय असायच्या याचा सुद्धा उल्लेख केला आहे. यामध्ये त्या परिस्थितींबद्दल ही सांगतिले गेले आहे की, ज्यामधून त्यांना हटवले जाऊ शकते. ग्रामसभेची स्थापनेसंदर्भात शिलालेख असे सांगतो की, यामध्ये ३० वॉर्ड असतील. यामध्ये राहणारे सर्व लोक मिळून ग्राम सभेसाठी एक प्रतिनिधीची निवड करतील.(Uttaramerur inscription)

हे देखील वाचा: अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी सुरु

ग्रामसभेचा प्रतिनिधी होण्यासाठी व्यक्तीचे वय ३५-७० वर्षादरम्यान असावी. त्यांच्याकडे एक निश्चित प्रमाणात जमीन असवी. प्रतिनिधी होण्यासाठी वेदांचे ज्ञान असणे गरजेचे होते. जमिनीच्या मालकीसंदर्भात सूट मिळू शकत होती. पण त्यासाठी त्याला एक वेद आणि भाष्यांची माहिती असणे गरजेचे होते. प्रतिनिधी होण्यासाठी व्यक्तीला व्यवसायात निपुण असणे आवश्यक होते. ऐवढेच नव्हे तर यामध्ये प्रतिनिधींच्या अयोग्यतेच्या नियमांबद्दल ही सांगितले गेले आहे. ज्या लोकांनी पाच महापाप केले आहेत ते प्रतिनिधी होऊ शकत नाही. यापैकी चार पाप ही ब्राम्हणाची हत्या, दारु पिणे, चोरी आणि व्याभिचार अशी होती. ज्यांना सदस्य व्हायचे होते त्याने स्वत: अपराधिक प्रवृत्तीचे नसावे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.