Home » सतत स्वत:ला आरशामध्ये पाहिल्याने होऊ शकतो बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर

सतत स्वत:ला आरशामध्ये पाहिल्याने होऊ शकतो बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर

प्रत्येकालाच सुंदर दिसायचे असते. पण बहुतांशजण स्वत:ला सतत आरशामध्ये पाहत राहतात. स्वत:वर प्रेम करणे वाईट गोष्ट नाही पण सतत आरशामध्ये तुम्ही स्वत:ला पाहत असाल तर याला वैद्यकिय भाषेत आजाराचे नाव देण्यात आले आहे.

by Team Gajawaja
0 comment
body dysmorphic disorder
Share

Body dysmorphic disorder : खरंतर जी लोक प्रत्येकवेळी स्वत:ला सतत आरशामध्ये पाहतात त्यांच्यामध्ये एक डिसऑर्डर दिसून येतो, ज्याला बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर असे म्हटले जाते. हा आजार तुम्हाला हळूहळून डिप्रेशनच्या जाळ्यात अकडवतो. यामधून बाहेर पडणे मुश्किल होऊन जाते. जाणून घेऊया बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर नक्की काय आहे याबद्दल सविस्तर….

बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर नक्की काय आहे?
बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर अशा प्रकारचा मानसिक आजार आहे जो त्या लोकांना होतो जे स्वत:ला खूप ऐकटे समजतात. अथवा नेहमीच दुसऱ्यांपेक्षा आपण किती उत्तम दिसतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. या डिसऑर्डरकडे लक्ष न दिल्यास तो ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर, एन्जायटी आणि डिप्रेशनचे रुप घेऊ शकतो. काही प्रकरणात व्यक्तीमध्ये ईटिंग डिसऑर्डरही निर्माण होते. याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर होतो.

Body dysmorphic disorder (BDD): Symptoms, causes, and treatment

लक्षणे काय आहेत?
बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डरमध्ये स्वत:च्या शरिराचा राग करणे, नकारात्मक विचार करणे, आपला चेहरा झाकून ठेवणे, एकट्यात राहणे आणि स्वत:ची तुलना दुसऱ्यांशी करणे. (Body dysmorphic disorder)

असे राहा दूर
स्वत:वर प्रेम करा, नकारात्मक विचारांपासून दूर राहा. याशिवाय अन्य जणांसोबत स्वत:ची तुलना करणे टाळा, स्वत:मधील चांगल्या गोष्टी शोधून काढा, आवडीच्या गोष्टी करा, मित्रपरिवारासोबत वेळ घालवा, एखादी नवी गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि स्वत: ला एखाद्या कामात व्यस्त ठेवा.

टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.


आणखी वाचा :
पार्टनरच्या घोरण्यामुळे तुमची झोपमोड होते? करा हे घरगुती उपाय
ब्युटी पार्लरच्या या चुकांमुळे बिघडू शकते तुमचे आरोग्य
किचनमधील हे 5 मसाले करतील पोटावरील चरबी कमी

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.