Home » डॉकी मिल्कची वाढती क्रेझ

डॉकी मिल्कची वाढती क्रेझ

by Team Gajawaja
0 comment
Donkey Milk
Share

भारतात सध्या मोठ्याप्रमाणात स्टार्टअप सुरु होत आहेत. यात तरुण वर्ग पुढाकार घेत असून त्यातून नवीन उद्योगाची उभारणी होत आहे.  मुख्य म्हणजे, तरुण वर्ग फक्त उद्योगाकडे वळला नसून तो शेतीउद्योगातही पुढाकार घेत आहे.  शेती आणि शेती पुरक व्यवसायातही आलेल्या या तरुणांनी विविधता जोपासली आहे.  या तरुणांमध्ये गुजरातच्या एका तरुणानं सुरु केलेल्या गाढवांच्या फार्म हाऊसची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. (Donkey Milk)

गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील धिरेन सोलंकी यानं नोकरी मिळाली नाही म्हणून दुधाचा व्यवसाय सुरु केला.  तोही गाढवाच्या दुधाचा.  त्यासाठी त्यानं आपल्या बचतीच्या पैशातून गाढवांची खरेदी केली. आता हा धिरेन या दुधापासून दरमहा लाखो रुपये कमवत आहे. त्याची या स्टार्टअपची स्टोरी सध्या सोशल मिडीयावर सर्वाधिक चर्चेत आहे. 

वास्तविक गाढवाचे दुध हे सौदर्यप्रसाधनांमध्ये वापरले जाते.  इजिप्तची राणी क्लियोपात्रा ही जगातील सर्वात सुंदर राणी मानली जाते. ही क्लियोपात्रा आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी गाढवाच्या दुधात आंघोळ करायची अशी कथा सांगितली जाते.  क्लिओपात्राची ही कथा सत्य आहे की असत्य याची पडताळणी करण्यापेक्षा सध्या गाढवाच्या दुधाचा भाव काय आहे, हे पहाणेही गरजेचे आहे.  कारण भारतात गाढवाचे दुध काही हजारात विकले जाते. या दुधाची पावडरही लाखाच्या घरात विक्रीला आहे.  त्यामुळे अत्यंत कमी भांडवलात होणा-या या व्यवसायाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.  (Donkey Milk)

गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या धीरेन सोळंकी याच्या स्टार्टअपने दुध व्यवसायाची नवी दिशा दाखवून दिली आहे.  आपल्याकडे दुध व्यवसाय म्हणजे, गायी, म्हशीच्या दुधाची विक्री असे मानले जाते.  क्वचित प्रसंगी बकरीचेही दुध विकले जाते.  मात्र या धिरनने चक्क गाढवीणीचे दुध विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे.  गाई-म्हशीचे दूध ६० ते ६५ रुपये प्रतिलिटर दराने विकले जाते.  तिथेच गाढवाच्या दुधाची किंमत याच्या अनेक पट आहे.  हे दुध ५००० ते ७०००  रुपये लिटर दराने विकले जाते.  धिरेनने माफक भांडवलापासून सुरु केलेला हा गाढवाच्या दुधाचा व्यवसाय आता अडीच कोटीच्या घरात गेला आहे.   त्याच्याकडे दुधाचा दर प्रती लिटर ५००० रुपये आहे.  हे दुधतो ऑनलाईनही विकतो.  त्यातून त्याला दरमहा ३ लाखांपर्यंत कमाई होत आहे.  

धिरेनच्या या गाढवाच्या दुधाच्या व्यवसायाची माहिती पुढे आल्यावर भारतातील या व्यवसायाबाबत अधिक माहिती जाणून घेतली.  वास्तविक उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात डिंकी फार्म नावाचा संकल्पना प्रसिद्ध आहे.  डिंकी फार्म म्हणजे, गाढवांचे फार्म.   गाई-म्हशीच्या दुधापेक्षा गाढवाचे दूध ७० पटीने महाग आहे.  कारण त्यात असलेल्या औषधी गुणधर्मामुळे हे दुध ५ हजार लिटर दराने विकले जाते.  दक्षिण भारतात गाढवाच्या दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  येथे असलेल्या सौदर्य प्रसाधनांच्या कारखान्यात त्याचा वापर करण्यात येत असल्याची माहिती आहे. (Donkey Milk)

गाढवाचे दुध ऑनलाईनही उपलब्ध आहे. कर्नाटक आणि केरळमधील अनेक  कॉस्मेटिक कंपन्यांमध्ये गाढवाच्या दुधाला मोठी मागणी आहे.  अनेकवेळा  डांकी फार्म चालक गाढवाच्या दुधाची पावडर करुन त्याची विक्री करतात.  कारण यामुळे दुध खराब होण्याचाही धोका नसतो.  या पावडरलाही मोठी मागणी आहे.  हातोहाथ ही पावडर संपते, असा या व्यवसायात असलेल्यांचा अनुभव आहे.  एक किलो पावडर दुधाची किंमत एक लाख रुपयांपर्यंत आहे.  गाढवाच्या दुधात प्रथिने आणि चरबी कमी असते, परंतु लैक्टोज जास्त असते. हे दूध सामान्य दुधापेक्षा जास्त फायदेशीर असल्याचे जाणकारांचे मत आहे.  गाढवाचे दुध मुख्यतः सौंदर्य प्रसाधने आणि फार्मास्युटिकल उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाते.

============

हे देखील वाचा : चंद्राला काबीज करु पाहणाऱ्या चीनची जमीन खचू लागली…

============

यामुळेच त्याची मागणी अधिक आहे आणि मागणी अधिक असल्यामुळे त्याच्या किंमतीत सतत वाढ होत असते.   गाढवाच्या दुधाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच रक्ताभिसरण सुधारते आणि मधुमेहासारख्या रोगातही गाढवाचे दुध उपयोगी पडते असे निरिक्षण आहे.  गाढवाच्या दुधात सहसा अन्नजन्य रोगजनक नसतात.   त्यामुळे त्याचे शेल्फ लाइफ जास्त असते.  गाढवाचे दूध आतड्यासाठीही असते. डांग्या खोकल्यासारख्या विषाणूंसाठी औषध म्हणून याचा काही ठिकाणी वापर होत असल्याचीही माहिती आहे. त्याच्यातील याच औषधी गुणधर्मामुळे गाढवाचे दुध हजारो रुपयांपर्यंत विकले जाते.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.