Home » एका वर्षापेक्षा कमी वयातील मुलांना कधीच खायला देऊ नका ‘हे’ पदार्थ

एका वर्षापेक्षा कमी वयातील मुलांना कधीच खायला देऊ नका ‘हे’ पदार्थ

जर तुमचे मुल एक वर्षापेक्षा कमी वयाचा असल्यास पुढील काही पदार्थ त्याला अजिबात खायला देऊ नका. अन्यथा त्याला आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

by Team Gajawaja
0 comment
Kids food care
Share

Child Health Care : लहान मुलांचा बालपणापासून शारिरीक विकास होण्यास सुरू होतो. पण नवजात बालकाला काही गोष्टी खायला देताना काळजी घेतली पाहिजे. कारण त्यांचे पोट आपल्यासारखे मजबूत नसते. यामुळे लहान मुलांना कोणते पदार्थ खायला द्यावेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…

मध
मधामध्ये एक विशिष्ट जीवाणू असतो, ज्याला बोटुलिज्म असे म्हटले जाते. हा जीवाणू लहान मुलांच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतो. यामुळे तुमचे मुल एक वर्षापेक्षा कमी वयाचे असल्यास त्याला मध देऊ नका. यामुळे मुलाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

गाईचे दूध आणि सोया मिल्क
गाईचे दूध आणि सोया मिल्कमध्ये असे प्रोटीन आणि मिनिरल्स असतात जे लहान मुलांमध्ये पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात. अशातच एका वर्षांपेक्षा कमी वयातील मुलांना गाईचे दूध आणि सोया मिल्क देणे टाळले पाहिजे.

नट्स आणि फळं
नट्स आणि फळं मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. असे पदार्थ लहान मुलं सहज खाऊ शकत नाही. नट्स किंवा फळं खाल्ल्याने मुलांना श्वास घेण्यास समस्या उद्भवू शकते. यामुळे मुलं एका वर्षाची झाल्यानंतर त्यांना नट्स किंवा फळं खाण्यासाठी देऊ शकता. (Child health care)

अधिक मीठ आणि साखर
लहान मुलांना अत्याधिक प्रमाणात मीठ किंवा साखरेचे पदार्थ खायला देऊ नका. यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब अशा समस्या समस्या उद्भवू शकतात. लहान मुलांचे अधिक वजन असणेही आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. यामुळे एका वर्षांपेक्षा लहान वयातील मुलांना अधिक मीठ किंवा साखर खाण्यास देऊ नका.


आणखी वाचा :
लहान मुलांना पावडरचे दूध प्यायला देता… हे आहेत दुष्परिणाम
दिवसभर बसून काम केल्याने हृदयाचे आरोग्य बिघडते, वाचा काय म्हणतात आरोग्यतज्ज्ञ
मानसिक आणि फिजिकल ब्रेकची का गरज भासते? जाणून घ्या फायदे

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.