Home » दिवसभर बसून काम केल्याने हृदयाचे आरोग्य बिघडते, वाचा काय म्हणतात आरोग्यतज्ज्ञ

दिवसभर बसून काम केल्याने हृदयाचे आरोग्य बिघडते, वाचा काय म्हणतात आरोग्यतज्ज्ञ

दीर्घकाळ बसून राहिल्याने हृदयावर वाईट परिणाम होतो. यामुळे शारिरीक हालचाल करणे अत्यंत गरजेचे आहे.

by Team Gajawaja
0 comment
Full time part time job
Share

Desk Job Health Issues : बहुतांशजण डेस्क जॉब करतात. यामुळे सातत्याने एकाच जागी बसून काम करावे लागते. पण असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, दीर्घकाळ बसून राहिल्याने हृदयावर त्याचा वाईट परिणाम होतो का? खरंतर, डॉक्टर्स किंवा काही रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की, एकाच ठिकाणी खूप तास बसून राहिल्याने लठ्ठपणा, फ्लेक्सिबिलिटी इफेक्टेड आणि हाड ठिसूळ होऊ शकतात. यामुळे कामादरम्यान काही मिनिटांचा ब्रेक घेणे अत्यावश्यक आहे. ब्रेकवेळी थोडावेळ चालावे. अथवा हलकी स्ट्रेचिंग करावी.

हृदयावर होतो का परिणाम?
आरोग्य तज्ज्ञानुसार, हृदय आपल्या शरिरातील सर्वाधिक महत्त्वाचा अवयव आहे. हृदय संपूर्ण शरिराला ब्लडला पंप करते जेणेकरून ब्लड सर्कुलेशन उत्तम होऊ शकते. अशातच गरजेचे आहे की, हृदय हेल्दी राहणे आवश्यक आहे. हृदयासंबंधित एखादी समस्या उद्भवल्यास संपूर्ण शरिरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर होऊ शकते. (Desk Job Health Issues)

संपूर्ण दिवसभर बसून काम केल्याने हृदयावर परिणाम होतो का याबद्दल आरोग्य तज्ञ म्हणतात की, दिवसभरातील 10 तासांपेक्षा अधिक वेळ सिस्टिमसमोर बसून काम केल्यास हृदयावर त्याचा वाईट परिणाम होतो. अशातच व्यक्तीने शरिराची हालचाल करावी.

स्वत:ला हेल्दी ठेवण्यासाठी हार्ट हेल्दी असणे अत्यावश्यक आहे. तुम्ही दररोज एक्सरसाइज केल्यास हेल्दी राहाल. यामुळे खूप वेळ एकाच ठिकाणी बसून राहण्याएवजी दिवसभरातील काही वेळ शरिराची हालचाल करावी. जेवल्यानंतर 10-20 मिनिटे तरी चाला. वेळोवेळी ब्रेक घ्या. यामुळे शरिर अॅक्टिव्ह राहिल. खूप वेळ बसून काम केल्याने मधुमेह आणि कार्डिओवस्कुल आजार होऊ शकतात.

(अशाच  आरोग्यासंबंधितच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)

आणखी वाचा :
मानसिक आणि फिजिकल ब्रेकची का गरज भासते? जाणून घ्या फायदे
तुम्हाला सतत भूक लागते? करू नका दुर्लक्ष अन्यथा….
उष्माघातापासून दूर राहण्यासाठी ‘या’ टिप्स लक्षात ठेवा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.