Home » उष्माघातापासून दूर राहण्यासाठी ‘या’ टिप्स लक्षात ठेवा

उष्माघातापासून दूर राहण्यासाठी ‘या’ टिप्स लक्षात ठेवा

एप्रिल महिन्यातच उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होताना दिसून येतेय. अशातच उन्हाच्या झळांपासून दूर राहण्यासाठी पुढील काही खास टिप्स लक्षात ठेवा. जेणेकरून उष्माघाताच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होईल.

by Team Gajawaja
0 comment
heatstroke in summer
Share

Heatstroke in Summer : एप्रिल महिना सुरू झाला असला तरीही उन्हाच्या झळांनी नागरिकांच्या अंगाची लाही लाही केली आहे. भारतातील तापमानाचा पार 40 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. याशिवाय पहाडांच्या ठिकाणी तापमान 30 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. गरमा वाढल्याने त्यासंबंधित आजारही वाढू लागले आहेत. यामुळे कडाक्याच्या उन्हात शरीर थंड ठेवल्यास तुम्ही उष्माघातासह थकवा येणे, हायपरथर्मियासारख्या आरोग्यासंबंधित समस्यांपासून दूर राहू शकता.

हाइड्रेट राहा
डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी दररोज तीन लीटर पाण्याचे सेवन करा. शरिरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास तुम्ही आजारी पडू शकता. पाणी, फळांचा ज्यूस किंवा भाज्यांच्या सेवनाने तुम्ही शरिरातील पाण्याची कमतरता भरून काढू शकता. अधिक गरमा होत असल्यास छास किंवा लस्सीचे सेवन करू शकता.

पचनास हलके पदार्थ खा
स्वत:ला उन्हाळ्यात आजारांपासून दूर ठेवण्यासाठी आणि शरीर आतमधून थंड राहण्यासाठी पाणीदार फळांचे सेवन करा. स्ट्रॉबेरी, संत्र, काकडी अथवा सॅलड खा. यामुळे शरिराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल.

व्यायाम करा
व्यायामाआधी दोन ते तीन तास आधी 17-20 ग्लास पाणी, फळांचा ज्यूस जरूर प्या. कारण व्यायाम करताना थकवा कमी जाणवेल आणि शरिरात डिहाइड्रेशनची समस्याही उद्भवणार नाही. (Heatstroke in Summer)

या गोष्टींमुळे उद्भवते हिडाइट्रेशनची समस्या
कॅफेन किंवा अल्कोहोलयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळा. कारण यामुळे आरोग्यासंबंधित उन्हाळ्यात समस्या वाढल्या जाऊ शकतात.

डिहाइड्रेशनवेळी शरिरात दिसतात ही लक्षणे
तोंड सुकणे, चक्कर येणे डोकेदुखी ही डिहाइड्रेशनची लक्षणे असू शकतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लक्षणांवर उपचार करा.

(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


आणखी वाचा :
या लोकांनी खाऊ नये भोपळा, पडाल आजारी
महिलांनी प्रत्येक तीन महिन्यांनी ‘या’ वैद्यकीय चाचण्या जरुर कराव्यात
कच्च्या हळदीच्या चहाचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.