Home » हेल्दी राहण्यासाठी Apple Cider Vinegar चा वापर करता? जाणून घ्या फायद्यासह तोटे

हेल्दी राहण्यासाठी Apple Cider Vinegar चा वापर करता? जाणून घ्या फायद्यासह तोटे

परफेक्ट फिगर आणि लठ्ठपणा दूर करण्यासाठी आजकाल अॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तुम्हीही वजन कमी करण्यासाठी अॅप्पल सायडर व्हिनेगरचे सेवन करता का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया....

by Team Gajawaja
0 comment
Apple cider vinegar disadvantages
Share

Apple Cider Vinegar Disadvantages : फिटनेसच्या नादात आणि स्लिम दिसण्यासाठी आजकाल बहुतांशजण वेगवेगळे ट्रेण्ड फॉलो करत आहेत. काहीजण सकाळी उपाशी पोटी अॅप्पल सायडर व्हिनेगरचे सेवन करतात. यामुळे वजन आणि शरिरातील फॅट्स कमी होतात असे म्हटले जाते. पण याचा उलट परिणाम आरोग्यावर काय होतो याकडे फार कमी लोक लक्ष देतात. यामुळेच आरोग्य बिघडले जाते. जाणून घेऊया अॅप्पल सायडर व्हिनेगर पिण्याचे तोटे काय आहेत याबद्दल सविस्तर….

पचनक्रिया बिघडू शकते
अॅप्पल सायडर व्हिनेगरचा अत्याधिक वापर करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. सातत्याने 15 दिवस उपाशी पोटी अॅप्पल सायडर व्हिनेगरचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडू शकते. खरंतर, अॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये उच्च प्रमाणात अॅसिड असते. जे पोटाला नुकसान पोहोचवू शकते. याचे अत्याधिक प्रमाणात सेवन केल्यास पोटाला सूज येणे, गॅस आणि अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात.

रक्तातील साखर वाढण्याची शक्यता
अॅप्पल सायडर व्हिनेगरच्या सेवनाने अनेक फायदे होतात. पण मधुमेहाच्या रुग्णांनी अॅप्पल सायडर व्हिनेगरच्या सेवनापासून दूर राहिले पाहिजे. एक्सपर्ट्सनुसार, अॅप्पल सायडर व्हिनेगर रक्तातील साखर कंट्रोल करते. मात्र उपाशी पोटी अॅप्पल सायडर व्हिनेगरचे सेवन केल्यास त्याचा प्रभाव उलट होऊ शकतो. अशातच रक्तातील साखर कमी होत तब्येत बिघडू शकते. (Apple Cider Vinegar Disadvantages)

दातांचे नुकसान होते
अॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये पाणी मिक्स न करता पित असाल तर सावध व्हा. कारण यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते. हे एक अॅसिटिक कंटेट आहे. जे दातांना पूर्णपणे बिघडवू शकते. यामुळे दातांचा रंग पिवळसर होऊ शकतो.

औषधांसोबत रिअॅक्शन
काही औषधांसोबत अॅप्पल सायडर व्हिनेगर रिअॅक्शनही करू शकता. यामुळे जर इंन्सुलिन, ड्युरेटिक, डिगोक्सिन सारखी औषधे घेत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच अॅप्पल सायडर व्हिनेगरचे सेवन करा.

(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा._


आणखी वाचा :
तुम्हाला कंबरेखाली सातत्याने दुखते? असू शकतात ही कारणे
बिघडलेली पचनसंस्था आणि कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय आहे हिंगाचे पाणी
एक लीटर कोल्ड ड्रिंकसाठी लागते ऐवढी साखर, प्रमाण ऐकून व्हाल हैराण

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.