Home » Lyme Disease ची जगभरात चर्चा, जाणून घ्या आजाराच्या लक्षणांबद्दल अधिक

Lyme Disease ची जगभरात चर्चा, जाणून घ्या आजाराच्या लक्षणांबद्दल अधिक

by Team Gajawaja
0 comment
Lyme Disease
Share

सोशल मीडियात सध्या अमेरिकेतील एका व्यक्तीची लिंक्डइन वरील पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या मुलीच्या आत्महत्येमागील कारण सांगितले आहे. या भावुक पोस्टमध्ये त्याने असे म्हटले की, लाइम डिजीजच्या(Lyme Disease) कारणामुळे त्याच्या मुलीने आत्महत्या केली. या आजाराचे संक्रमण त्या मुलीच्या डोक्यापर्यंत पसरले गेले. आता सोशल मीडियात लाइम डिजीज संदर्भात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की, नक्की हा आजार कोणता आणि किती धोकादायत आहे. तर लाइम डिजीजी असोसिएशनच्यामते, हा आजार जगातील ८० हून अधिक देशांमध्ये पसरला गेला आहे. या लिस्टमध्ये भारताचा सुद्धा समावेश आहे. जाणून घेऊयात या गंभीर आजाराबद्दल अधिक.

लाइम डिजीज काय आहे?
सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिवेंशनच्यानुसार लाइम डिजीज एक बॅक्टेरियल इंफ्केशन आहे. जे संक्रमित किड्यांच्या चावण्यामुळे पसरतो. तो अत्यंत वेगाने पसरणारा आजार आहे. येथे लक्ष देण्याची बाब अशी की, याच्या सुरुवातीची लक्षणे ही अत्यंत साधारण असतात. त्यामुळे बहुतांश लोक लक्ष देत नाहीत. हळूहळू हा आजार जॉइंट्स, हृदय आणि रक्तवाहिन्यांमध्ये पसरतो. जर योग्य वेळी यावर उपचार केले नाहीत तर व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. या आजाराची सर्वाधिक प्रकरणे ही अमेरिकेत आढळून येत आहेत. परंतु अन्य देशांना सुद्धा यापासून धोका आहे. या आजाराची लक्षण किडे चावल्यानंतरच्या ३-३० दिवसांमध्ये दिसून येतात.

Lyme Disease
Lyme Disease

लाइम आजाराची लक्षणं
-डोक दुखणे
-ताप येणे
-थकवा जाणवणे
-माइग्रेन
-त्वचेवर रॅशेज येणे
-जॉइंट्स दुखणे
-हाडांमध्ये दुखणे
-सूज येणे
-हृदयाचे सुरळीत ठोके न पडणे

हे देखील वाचा- शास्त्रज्ञांनी लावला शोध, पसरणाऱ्या रोगांवर डासच करणार उपचार!

लाइम आजारावर उपचार करता येतो का?
लाइम आजार (Lyme Disease) झालेल्या व्यक्तीची प्रथम लक्षणे कोणती आहेत ती पाहिली जातात. बहुतांश प्रकरणांमध्ये अँन्टीबायोटिक औषधांच्या माध्यमातून रुग्ण काही आठवड्यात बरे होतात. जर हे संक्रमण डोके आणि हृदयापर्यंत पसरले असेल तर त्याला नियंत्रणात ठेवणे मुश्किल होचे. अशा स्थितीत व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता वाढते. दरम्यान, अद्याप या आजारावर कोणतीही लस तयार करण्यात आलेली नाही. काही अभ्यासात याच्या उपचारावर ही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले गेले आहेत.

लाइम आजारापासून कसा कराल बचाव
-इसकसेक्ट रेपेलेंटचा वापर करा
-किड्यांपासून दूर रहा
-घराच्या आसपास पेस्टिसाइड स्प्रे करा
-पाळीव प्राण्यांना सुद्धा किड्यांपासून दूर ठेवा
-लक्षण दिसून आल्यानंतर तातडीने चाचणी करा


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.