सुंदर दिसणे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेतल्यास तुम्ही नेहमीच सुंदर दिसू शकता. (Night Cream)
तसे, प्रत्येक महिला बाजारात येणारी अनेक स्कीन उत्पादने वापरत असते, ज्यामुळे तिची त्वचा चमकदार आणि डागमुक्त होते. पण, तुम्हाला माहित आहे का की, जर त्वचेची योग्य काळजी घेतली नाही, तर उत्तम ब्युटी प्रोडक्टसुद्धा तुमच्या त्वचेवर प्रभाव दाखवू शकणार नाही.
सुंदर त्वचा आपल्या व्यक्तिमत्त्वात भर घालते, तसेच आपला आत्मविश्वास वाढवते. अशा वेळी महिला आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक उपाय करतात. (Night Cream)
रात्री चेहऱ्यावर काहीही लावले नाही, तर सकाळी उठल्यावर त्वचा निर्जीव आणि कोरडी दिसू शकते. सकाळी त्वचेची काळजी घेणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच रात्रीही त्वचेची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. या कारणास्तव, तुम्ही चेहरा स्वच्छ केल्यानंतर किंवा फेसवॉशने धुतल्यानंतर रात्रीच्या वेळी नाईट क्रीम लावू शकता. पण, जर तुम्हाला रात्रीच्या वेळी त्वचेसाठी वेगळे पैसे खर्च करायचे नसतील, तर काही घरगुती उपाय आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही घरी नाईट क्रीम सहज बनवू शकता. (Night Cream)
बदाम नाईट क्रीम
कोरड्या त्वचेसाठी हा एक चांगला पर्याय आहे. ही क्रीम बनवण्यासाठी एक चमचा बदाम तेल, एक चमचा मध, २ चमचे गुलाबजल आणि २ चमचे कोको बटर घ्या. सर्वकाही एकत्र मिक्स करा आणि ते एका बॉक्समध्ये ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि ही क्रीम लावा.
ॲपल नाईट क्रीम
हे नाईट क्रीम बनवण्यासाठी ५ चमचे गुलाबजल, २ छोटी सफरचंद आणि एक चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या. सफरचंद सोलून बारीक करा आणि ऑलिव्ह ऑईल गरम होईपर्यंत मंद गॅसवर ठेवा. आता त्यात गुलाबजल मिसळा. हे क्रीम तुम्ही रोज रात्री वापरू शकता. (Night Cream)
ऑरेंज नाईट क्रीम
हे नाईट क्रीम बनवण्यासाठी ४ चमचे संत्र्याचे तेल, २ संत्र्याची साले, २ चमचे पेट्रोलियम जेली आणि २ चमचे ग्लिसरीन घ्या. हे सर्व मिक्सरमध्ये चांगले बारीक करून एका छोट्या डब्यात ठेवा. हे मिश्रण रोज रात्री चेहऱ्यावर झोपण्यापूर्वी लावू शकता. (Night Cream)