Home » Bottle Gourd Juice Benefits: मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी गुणकारी आहे दूधी भोपळ्याचा रस !

Bottle Gourd Juice Benefits: मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी गुणकारी आहे दूधी भोपळ्याचा रस !

दूधी भोपळा ही एक भाजी आहे जी उन्हाळ्यात सर्वाधिक बाजारात मिळते कारण ती शरीराला थंड ठेवण्यास मदत करते.

0 comment
Bottle Gourd Juice Benefits
Share

दूधी भोपळा ही एक भाजी आहे जी उन्हाळ्यात सर्वाधिक बाजारात मिळते कारण ती शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणं खूप गरजेचं आहे जेणेकरून व्यक्ती आजारांपासून दूर राहू शकेल. याशिवाय दूधी भोपळाखाल्ल्याने पोटाच्या समस्यांपासून ही आराम मिळतो. दूधी भोपळामध्ये असलेले फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम आणि प्रोटीन शरीराला निरोगी ठेवतात.ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासोबतच मधुमेह आणि किडनीच्या आजारांचा धोका कमी करण्यासाठी देखील दूधी भोपळा फायदेशीर आहे. असे म्हटले जाते की दूधी भोपळाचा रस प्यायल्याने फॅटी लिव्हरची समस्याही कमी होते. कोणत्याही गोष्टीचा अतिवापर करणे हानिकारक ठरू शकते. अनेक वेळा लोक काही गोष्टी शरीरासाठी चांगल्या मानतात आणि त्यांचं जास्त प्रमाणात सेवन करायला लागतात, जे अजिबात योग्य नाही. आजच्या लेखात आपण दूधी भोपळ्याच्या रसाचे  फायदे आणि त्याच्या अतिसेवनाने होणारे नुकसान जाणून घेणार आहोत. (Bottle Gourd Juice Benefits)
 
Bottle Gourd Juice Benefits

Bottle Gourd Juice Benefits

 
दूधी भोपळ्याचे फायदे
 

– किडनीशी संबंधित समस्या असलेल्या लोकांसाठी दूधी भोपळ्याचा रस उपयुक्त ठरू शकतो. दूधी भोपळ्याच्या ज्यूसमध्‍ये अनेक आवश्‍यक पोषक घटक आढळतात जे किडनी निरोगी ठेवण्‍यासाठी उपयोगी असतात. 

–  दूधी भोपळ्याचा रस नियमित सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जाऊ शकतात. दूधी भोपळ्याचा रस शरीराला डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
– आयुर्वेदानुसार, ज्या लोकांना वात व्यतिरिक्त पित्त आणि कफ च्या समस्या आहेत त्यांनी दररोज एक ग्लास दूधी भोपळ्याचा रस प्यावा. यामुळे त्याच्या शरीराला भरपूर विश्रांती मिळेल.
Bottle Gourd Juice Benefits

Bottle Gourd Juice Benefits

– दूधी भोपळ्याच्या रसाचे सेवन केल्याने पचनक्रियाही मजबूत होऊ शकते. बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटी इत्यादी समस्यांपासून व्यक्तीला दूर ठेवण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते.
– मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी दूधी भोपळ्याचा रस मर्यादित प्रमाणात सेवन करावा. जर तुम्ही हा रस जास्त प्रमाणात प्यायला तर त्यामुळे साखर आणि बीपीची पातळी असामान्यपणे कमी होऊ शकते. या घसरणीमुळे चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधार येणे अशा समस्याही उद्भवू शकतात.(Bottle Gourd Juice Benefits)
=========================
हे देखील वाचा: Clove Water Benefits: वजन कमी करण्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढेपर्यंत अनेक गोष्टींवर उपयुक्त आहे लवंगचे पाणी !  
=========================
– दूधी भोपळ्याचा रस खूप कडू असतो, अशा परिस्थितीत अनेकांना त्याची ऍलर्जी ही  होते. हे प्यायल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर सूज येते किंवा हात-पाय आणि चेहऱ्यावर पिंपल्स येतात. याशिवाय पुरळ येणे, खाज येणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.
– दूधी भोपळ्याच्या रसाचे जास्त सेवन केल्याने पचनसंस्था बिघडू शकते. यामुळे लूज मोशन आणि उलट्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. एवढेच नाही तर ज्यूस बनवताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले तर काही वेळा बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो.

(डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे यातील उपाय  करण्याआधी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा.) 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.