Home » नोकरीसाठी इंटरव्यू देण्यासाठी चिंता सतावतेय? या ट्रिक वापरुन राहा टेंन्शन फ्री

नोकरीसाठी इंटरव्यू देण्यासाठी चिंता सतावतेय? या ट्रिक वापरुन राहा टेंन्शन फ्री

इंटरव्यूदरम्यान, डोक्यात वेगवेगळे विचार येतात. यामुळेच आपल्याला इंटरव्यूची भीती वाटते. पण हा ताण दूर करणे अत्यंत गरजेचे आहे.

by Team Gajawaja
0 comment
interview stress
Share

Interview Stress : जेव्हा कधी एखाद्या नोकरीसाठी इंटरव्यू देण्यासाठी जातो तेव्हा आपल्या डोक्यात वेगवेगळे प्रश्न येतात. अशातच इंटरव्यूमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितीत देता येत नाही. खरंतर हे इंटरव्यूआधी घेतलेल्या ताणामुळे होते. यामुळे तुमच्यामध्ये इंटरव्यूबद्दची भीती वाढली जाते.इंटरव्यूच्या भीतीपोटी तुमच्या शरिराची हालचाल, तुमचे हावभाव आणि बोलणे बददलले आहे हे पटकन समोरच्या व्यक्तीला कळते. यामुळे आत्मविश्वासही कमी होतो. अशातच इंटरव्यू देण्यासाठी चिंता वाटत असल्यास पुढील काही टिप्स नक्कीच लक्षात ठेवा.

पूर्ण तयारी करा
तुम्ही ज्या कंपनीत एखाद्या पोस्टसाठी अर्ज करताय त्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळवा. त्या कंपनीची देखील माहिती मिळवा जेथे तुम्ही इंटरव्यू देणार आहात. इंटरव्यूमध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याची माहिती तुम्हाला ऑनलाइनही मिळू शकते.

स्ट्रेस रिलॅक्शेसन टेक्निक
स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही स्ट्रेस रिलॅक्शेसन टेक्निकचा वापर करू शकता. यासाठी इंटव्यूआधी थोड मेटिडेशन करा अथवा पॉझिटिव्ह अफर्मेशन ऐका. याचा तुम्हाला इंटरव्यूआधी नक्कीच फायदा होईल. तुमच्या मनातील इंटरव्यूसंदर्भातील भीती दूर होईल.

आत्मविश्वास महत्त्वाचा
भीती वाटत असल्यास दीर्घ श्वास घ्या आणि तुम्ही या इंटरव्यूसाठी योग्य आहात म्हणून निवडल्याचे स्वत:ला सांगा. याशिवाय तुमच्या अनुभवातून तुम्ही आजवर काय शिकलात याबद्दलची विचार करा. जेणेकरुन इंटव्यूवेळी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तुम्ही कॉन्फिटन्डपणे उत्तरे देऊ शकता.

सकारात्मक विचार करा
कोणतेही नकारात्मक विचार इंटरव्यूवेळी मनात आणू नका. यावेळी सकारात्मक विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. स्वत:वरील आत्मविश्वास वाढवण्यासाठी इंटरव्यूवेळीच नव्हे तर नेहमीच सकारात्मक विचार केला पाहिजे. (Interview Stress)

समोरच्या व्यक्तीचे व्यवस्थितीत ऐका
इंटरव्यूवेळी समोरचा व्यक्ती काय बोलतोय हे व्यवस्थितीत ऐका. जेणेकरुन तुम्ही विचारल्या गेलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊ शकता.

ड्रेस कोड
इंटरव्यूवेळी जाताना असे आउटफिट परिधान करा ज्यामध्ये तुम्ही कंम्फर्टेबल असाल. खरंतर इंटरव्यूवेळी फॉर्मेल ड्रेस कोड असणे फार महत्त्वाचा असतो. यामुळे समोरच्या व्यक्तीवर तुमच्याबद्दलचे अधिक इंप्रेशन पडते.


आणखी वाचा :
रिलेशनशिपमध्ये प्रेमच नव्हे तर ‘या’ गोष्टींनाही द्या महत्त्व
पर्यटकांची पसंती : हिल स्टेशनची राणी
कपाटात ठेवा या वस्तू, आर्थिक तंगीपासून रहाल दूर

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.