Home » KYC च्या नावाखाली केली जातेय फसवणूक, फोनवर आलेल्या या मेसेजपासून राहा सतर्क

KYC च्या नावाखाली केली जातेय फसवणूक, फोनवर आलेल्या या मेसेजपासून राहा सतर्क

बँकेमध्ये काही वेळेस खात्यासंबंधित केवायसी अपडेट नसल्यास खाते बंद केले जाते. याचा फायदा सायबर हल्लेखोर घेऊ शकतात.

by Team Gajawaja
0 comment
KYC Fraud Alert
Share

KYC Update Fraud : बँकेमध्ये काही वेळेस खात्यासंबंधित केवायसी अपडेट नसल्यास खाते बंद केले जाते. याचा फायदा सायबर हल्लेखोर घेऊ शकतात. यासाठी सायबर हल्लेखोर तुम्हाला फोन किंवा एसएमएस करून केवायसी डिटेल्स अपडेट करण्यासाठी तुमच्यावर दबाव टाकून खाते रिकामे करू शकतात. खरंतर बँकेचे कर्मचारी तुम्हाला कधीच फोन करून तुमच्या बँक खात्यासंबंधित माहिती मागत नाही. अशातच बँक कर्मचाऱ्याच्या नावे फोन आल्यास तुम्ही सतर्क व्हा.

अशाप्रकारे करतात तुमचा फसवणूक
सायबर हल्लेखोर सर्वप्रथम तुमचे खाते बँकेच्या कोणत्या शाखेत आहेत हे शोधून काढतात. यानंतर तुमचे केवायसी अपडेट नसल्यास तुम्हाला ते करण्यास सांगतात. अन्यथा तुमचे खाते तत्काळ बंद होईल असेही सांगितले जाते. अशातच काहीजण खाते बंद होण्याच्या भीतीने आपले केवायसी डिटेल्स देतात. याचाच फायदा सायबर हल्लेखोर घेतात आणि तुमचे बँक खाते रिकामे करतात. (KYC Update Fraud)

बँकेच्या खात्याची माहिती दिल्यास खाते होईल रिकामे
सायबर हल्लेखोर बँक खात्याची अधिक माहिती मिळवत ते रिकामे करू शकतात. खरंतर कोणतीही बँक तुमच्याकडे केवायसी अपडेटसाठी फोन किंवा एसएमएस करत नाही. अशातच केवायसी अपडेट संदर्भात काही शंका असल्यास तुम्ही बँकेच्या शाखेला भेट द्या.

बँकेकडून अॅलर्ट जारी
केवायसी स्कॅमच्या कारणास्तव बँकेकडून आपल्या ग्राहकांना वेळोवेळी अॅलर्ट जारी केला जातो. ज्यामध्ये बँकेकडून सांगितले जाते की, त्यांच्याकडून कधीच तुमचे केवायसी कागदपत्र किंवा त्याची माहिती मागितली जात नाही. अशातच तुम्हाला केवायसी अपेडटच्या नावाखाली फोन आल्यास तातडीने बँकेला संपर्क करावा.


आणखी वाचा :
भारतातील या राज्यांमध्ये राहतात फक्त श्रीमंत नागरिक, एकही गरीब व्यक्ती आढळणार नाही
नोकरीसाठी इंटरव्यू देण्यासाठी चिंता सतावतेय? या ट्रिक वापरुन राहा टेंन्शन फ्री
कपाटात ठेवा या वस्तू, आर्थिक तंगीपासून रहाल दूर

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.