Home » ट्रॅव्हल पॅकेजच्या माध्यमातून फिरण्याचा प्लॅन करताय? आधी हे वाचा

ट्रॅव्हल पॅकेजच्या माध्यमातून फिरण्याचा प्लॅन करताय? आधी हे वाचा

बहुतांश कंपन्या तुमची फिरण्याची आवड पूर्ण करते. या कंपन्या तुम्हाला ज्या ठिकाणी फिरायचे आहे तेथील एक बजेट देते. पण बहुतांशजणांना यामधील काही गोष्टी असतात त्या कळत नाही. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

by Team Gajawaja
0 comment
Travel Tips
Share

Travel Tips : बहुतांशवेळा पाहिले गेलेय की, ट्रॅव्हल पॅकेजच्या माध्यमातून काहींना आवडते. हनीमून ट्रिप असो किंवा परिवारासोबत एखाद्या ठिकाणी फिरायला जायचे असल्यास ट्रॅव्हल पॅकेजची निवड केली जाते. खरंतर, ट्रॅव्हल पॅकेजमध्ये तुमच्या फिरण्याची सर्व जबाबदारी ट्रॅव्हल कंपनीकडून घेतली जाते.

यामध्ये ट्रेन अथवा विमानाचे तिकिट, फिरणे, राहणे-खाणे याची सर्व सुविधा तुम्हाला दिली जाते. ट्रॅव्हल पॅकेजमध्ये तुम्हाला शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी तुमच्यासोबत एक एजंटही ठेवला जातो. पण काहीवेळेस बहुतांशजण ट्रॅव्हल पॅकेड बुकिंग करताना चूक करतात. पॅकेजमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे फिरण्याचा अधिक खर्च वाढला जातो. अशातच पुढील काही गोष्टी तुम्ही ट्रॅव्हल पॅकेजच्या माध्यमातून फिरायला जाताना लक्षात ठेवल्या पाहिजेत.

पुढील काही गोष्टींची काळजी घ्या
-सर्वप्रथम एखाद्या ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर ट्रॅव्हल पॅकेजमध्ये तुम्हाला काय सुविधा दिल्या जातायत याची काळजी घ्या. याशिवाय कोणत्या गोष्टींसाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावा लागणार आहे हे देखील पाहा.
-ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहेत तेथील प्रसिद्ध ठिकाणी तुम्हाला ट्रॅव्हल कंपनी घेऊन जाणार आहे का ते देखील पाहा.
-पॅकेजमध्ये पर्यटन स्थळांच्या ठिकाणी तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत का हे पाहा. काही ठिकाणे अशी असतात जेथे तुम्हाला एण्ट्री फी द्यावी लागते.
-फ्लाइट तिकिट तुम्हाला ई-स्वरुपात दिले जाते. काही ट्रॅव्हल एजेंट तिकिटासंदर्भात तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशातच विमान किंवा रेल्वेच्या तिकिटावरील सर्व माहिती व्यवस्थितीत तपासून पाहा. (Travel Tips)
-ट्रॅव्हल पॅकेज बुकिंग करताना एखाद्या मान्यताप्राप्त कंपनीच्या माध्यमातूनच करावे. ऑनलाइन किंवा एखाद्या स्वस्त कंपनीच्या माध्यमातून ट्रॅव्हल करण्याचा विचार केल्यास तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते.
-एखादी ट्रॅव्हल कंपनी तुम्ही प्रवास रद्द केल्यानंतर त्याचे पेमेंट परत देण्यास नकार देत असल्यास तुम्ही कंज्युमर फोरममध्ये तक्रार करू शकता.


आणखी वाचा :
WhatsApp घेऊन येणार नवे प्रायव्हसी फिचर, आता प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट काढता येणार नाही
देवनार वृक्षांनी वेढलेलं हाट कालिका मंदिर
‘या’ शहरांमध्ये अशी खेळली जाते होळी..

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.