Home » जगातील श्रीमंत लोक इंटरनेटचा असा करतात वापर

जगातील श्रीमंत लोक इंटरनेटचा असा करतात वापर

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती युनिक आणि लग्जरी वेबसाइट्ससह प्लॅटफॉर्मचा वापर करतात. शॉपिंग ते सोशल मीडिया, डेटिंस अशा काही गोष्टींचे त्यांना एक वेगळेच शौक असतात.

by Team Gajawaja
0 comment
Ultra rich people
Share

आजच्या काळात इंटरनेटचा बहुतांश लोक वापर करतात. जगभरातील लोक इंटरनेटवर काही ना काही सर्च करत असतात अथवा काहीतरी ऑनलाईन ऑर्डर करत असतात. इंटरनेटच्या जगात आणि सातत्याने टेक्नॉलॉजीत होणाऱ्या बदलामुळे सर्वकाही सोप्पे झाले आहे. एखाद्याशी बोलायचे जरी झाल्यास इंटरनेटच्या माध्यमातून थेट संपर्क साधता येतो.  तर इंटरनेटचा वापर करताना सर्वसामान्य लोक अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि युट्युब सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. मात्र जगातील श्रीमंत लोक इंटरनेटचा वापर कसा करत असतील याचा विचार कधी केलायं का? याच बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. (Ultra rich people)

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती युनिक आणि लग्जरी वेबसाइट्ससह प्लॅटफॉर्मचा वापर करतात. शॉपिंग ते सोशल मीडिया, डेटिंस अशा काही गोष्टींचे त्यांना एक वेगळेच शौक असतात. त्यासाठी कितीही खर्च झाला तरीही त्यांना काही फरक पडत नाही.

James Edition
ज्या प्रकारे सामान्य लोक ऑनलाईन शॉपिंगसाठी अॅमेझॉन, फ्लिपकार्टचा वापर करतात. त्यानुसार अल्ट्रा रिच लोक शॉपिंगसाठी James Edition चा वापर करतात. या वेबसाइटवर लग्जरी रियल इस्टेट, महागड्या गाड्या, अल्ट्रा लग्जरी घड्याळं, विमानं, याच, हेलिकॉप्टर, ज्वेलरी अशा काही वस्तूंची खरेदी येथून करतात.

Rich Kids
बहुतांश लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वापर करतात. मात्र जगातील टॉप श्रीमंतांबद्दल बोलायचे झाल्यास तर त्यांची मुलं Rich Kids नावाचे सोशल मीडिया अॅप वापरतात. याच्या एका महिन्याचे सब्सक्रिप्शन १००० युरो म्हणजेच ९० हजार रुपये आहे. या वेबसाइटची खासियत अशी की पैसे देऊन तुम्ही केवळ दुसऱ्यांचे फोटो पाहू शकता.

Luxy
तुम्ही कितीही पैसे कमवा, पण प्रेमाशिवाय आयुष्य हे अपुरेच आहे. आजकाल इंटरनेटचा वापर अधिक वाढल्याने ऑनलाईन डेटिंग अॅप खुप प्रसिद्ध आहेत. टिंडर सारख्या अॅपवरून लोक आपला पार्टनर शोधतात. पण अल्ट्रा रिच लोक डेटिंगसाठी Luxy अॅपचा वापर करतात. याचे तीन महिन्याचे सब्सक्रिप्शन ९९९ डॉलर म्हणजेच ८३ हजार रुपये आहे. (Ultra rich people)

हेही वाचा- मुकेश अंबानींचे हे आहेत 5 अरबपति शेजारी

Book My Charters
जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करता तेव्हा आयआरसीटीसी, व्हेअर इज माय ट्रेन, बुक माय ट्रिप सारख्या अॅपचा वापर करतात. मात्र जगातील टॉप श्रीमंत लोक Book My Charters चा वापर करतात. याच्या माध्यमातून जेट, हेलिकॉप्टरचे बुकिंग केले जाऊ शकते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.