Home » श्रद्धा कपूरने वयाच्या 16 व्या वर्षी सलमानच्या सिनेमाला दिला होता नकार, आज आहे बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री

श्रद्धा कपूरने वयाच्या 16 व्या वर्षी सलमानच्या सिनेमाला दिला होता नकार, आज आहे बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री

बॉलिवूडमधील सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आपल्या भुमिकेसह उत्तम व्यक्तिमत्त्वाबद्दल ओखळली जाते.

by Team Gajawaja
0 comment
Shraddha Kapoor
Share

बॉलिवूडमधील सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आपल्या भुमिकेसह उत्तम व्यक्तिमत्त्वाबद्दल ओखळली जाते. श्रद्धाचा जन्म 3 मार्च 1989 मध्ये मुंबईत झाला होता. अभिनेत्री अभिनेते आणि विलेनची भुमिका साकारणाऱ्या शक्ती कपूर यांची लेक आहे.

श्रद्धाने आपल्या करियरची सुरूवात वर्ष 2010 मध्ये आलेल्या ‘तीन पत्ती’ सिनेमातून केली होती. सिनेमाने काही खास कमाल केली नाही. त्यानंतर वर्ष 2011 मध्ये आलेल्या ‘लव्ह का दी एंड’ सिनेमात काम केले. या सिनेमासाठी श्रद्धाला स्टारडस्ट अवॉर्ड फॉर बेस्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले होते. यानंतर आदित्य रॉय कपूरसोबत आलेला सिनेमा ‘आशिकी 2’ मध्ये दिसून आली होती.

Shraddha Kapoor shares the secret hair pack recipe she swears by | VOGUE India

श्रद्धाने सलमानचा नाकारला सिनेमा
श्रद्धाने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी एका कॉफी शॉपमध्ये काम करत होती. यादरम्यान, श्रद्धा केवळ 16 वर्षांची होती. यावेळीच श्रद्धाला सलमान खानच्या सिनेमाची ऑफर आली होती. पण श्रद्धाने त्याला नाकारले होतो. या दरम्यान,ती एका ब्रँडची मालकीण होती. (Shraddha Kapoor)

श्रद्धा कपूरचे नेटवर्थ
अभिनेत्रीच्या नेटवर्थबद्दल बोलायचे झाल्यास श्रद्धा कपूर सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीचे नेटवर्थ 57 कोटी रुपये आहे. अभिनेत्री एका सिनेमासाठी पाच ते सहा कोटी रुपये फी घेते. याशिवाय श्रद्धाकडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

श्रद्धा कपूरचे सिनेमे
श्रद्धा कपूरने ‘विलेन’, ‘एबीसीडी 2’, ‘बागी’, ‘स्री’, ‘साहो’, ‘छिछोरे’ सारख्या सिनेमात काम केले आहे. श्रद्धाने अखेरचा सिनेमा तू झूठी मै मक्कारमध्ये रणबीर कपूरसोबत दिसून आली होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.


आणखी वाचा :
Netflix वर इंटरनेटशिवाय ‘या’ ट्रिकने पाहता येतील सिनेमे, वेब सीरिज
107 वर्षांपूर्वी भगवान श्रीरामांवर आला होता पहिला सिनेमा, जाणून घ्या खास गोष्टी
शोले सिनेमाआधी अमिताभ बच्चन यांच्या या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर घातला होता धुमाकूळ

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.