Home » Netflix वर इंटरनेटशिवाय ‘या’ ट्रिकने पाहता येतील सिनेमे, वेब सीरिज

Netflix वर इंटरनेटशिवाय ‘या’ ट्रिकने पाहता येतील सिनेमे, वेब सीरिज

नेटफ्लिक्सवर डाउनलोड कंटेट एकदा पाहिल्यानंतर डिवाइसमधून तो रिमूव करू शकता. जेणेकरुन मोबाइलमधील स्पेस भरला जाणार नाही. अशातच तुम्ही नेटफ्लिक्सवर इंटरनेटशिवाय सिनेमे किंवा वेब सीरिज पाहू शकता. याबद्दलची ट्रिक जाणून घेऊया....

by Team Gajawaja
0 comment
Share

Netflix  Tips : बहुतांजण रिकाम्या वेळेत मनोरंजनासाठी इंटरनेटच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिनेमे, वेब सीरिज, मालिका आणि डॉक्युमेंट्री पाहू शकता. पण जेव्हा युजर्सला इंटरनेट सुविधेचा फायदा घेत येत नाही किंवा अशा ठिकाणी असता जेथे इंटरनेट काम करत नाही तेव्हा तुम्ही कोणतेही सिनेमे अथवा वेब सीरिज पाहू शकत नाही. अशातच नेटफ्लिक्सने युजर्ससाठी इंटरनेटशिवाय अॅप वापरण्यासाठी एक खास सुविधा उपलब्ध केली आहे. खरंतर तुम्ही नेटफ्लिक्सवर इंटरनेटशिवाय सिनेमे आणि वेब सीरिज पाहू शकता. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर…

नेटफ्लिक्सवर इंटनेटशिवाय असे पाहा सिनेमे आणि वेब सीरिज
नेटफ्लिक्सवरील सिनेमे, वेब सीरिज, मालिका किंवा डॉक्युमेंट्री ऑफलाइन मोडवर पाहण्याची सुविधा मिळते. यासाठी तुम्हाला नेटफ्लिक्सवरील कंटेट इंटरनेट सुरू असताना डाउनलोड करावे लागतील. यानंतरच तुम्ही इंटरनेटशिवाय नेटफ्लिक्सवरील कंटेट पाहू शकता.

नेटफ्लिक्सवर असे कंटेट करा डाउनलोड
सर्वप्रथम नेटफ्लिक्स अॅप सुरू करा. यानंतर जो कंटेट डाउनलोड करायचा आहे तो निवडा. त्याखाली तुम्हाला एक बाणाचे निशाण दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर कंटेट डाउनलोड होईल. कंटेट डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही स्टॅण्डर्ड किंवा हाय क्वालिटी कंटेट निवडू शकता.

यानंतर नेटफ्लिक्सच्या अॅपमध्ये डाउनलोड सेक्शनमध्ये तुम्ही डाउनलोड केलेले कंटेट पाहू शकता. या गोष्टीची काळजी घ्या, कंटेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इंटनेटची सुविधा व्यवस्थितीत असावी. कंटेट डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही नेटफ्लिक्सच्या अॅपमध्ये
डाउनलोड कंटेट पाहू शकता. (Netflix  Tips) 

डाउनलोड केलेला कंटेट कधीकधी रिमूवही केला जातो
नेटफ्लिक्सवर डाउनलोड केलेला कंटेट नेहमीच सेव्ह राहत नाही. काही काळानंतर नेटफ्लिक्सकडून हटवला जातो. हा कालावधी वेगवेगळ्या सिनेमा आणि वेब सीरिजसाठई वेगवेगळा असू शकतो. सर्वसामान्यपणे दोन ते तीन दिवसांदरम्यान असतो. तुम्ही नेटफ्लिक्सची मेंबरशिप रद्द केल्यास डाउनलोड केलेले सिनेमे आणि बेव सीरिज देखील डिवाइसवरुन हटवले जातात. यानंतर पुन्हा मेंबरशिप घेता त्यावेळी कंटेट डाउनलोड करावा लागतो.


आणखी वाचा :
107 वर्षांपूर्वी भगवान श्रीरामांवर आला होता पहिला सिनेमा, जाणून घ्या खास गोष्टी
शोले सिनेमाआधी अमिताभ बच्चन यांच्या या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर घातला होता धुमाकूळ
अमृता राव ते तनुश्री दत्तांसह या कलाकारांनी घेतलाय बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.