Home » 107 वर्षांपूर्वी भगवान श्रीरामांवर आला होता पहिला सिनेमा, जाणून घ्या खास गोष्टी

107 वर्षांपूर्वी भगवान श्रीरामांवर आला होता पहिला सिनेमा, जाणून घ्या खास गोष्टी

टेक्नॉलॉजीच्या वाढत्या काळात नव्या व्हिज्युअल इफेक्ट्सह बड्या कलाकारांसोबत भगवान श्रीराम यांच्यावर सुपरहिट सिनेमे तयार केले. पण प्रेक्षकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला नाही.

by Team Gajawaja
0 comment
Entertainment News
Share

Entertainment News : टेक्नॉलॉजीच्या वाढत्या काळात नव्या व्हिज्युअल इफेक्ट्सह बड्या कलाकारांसोबत भगवान श्रीराम यांच्यावर सुपरहिट सिनेमे तयार केले. पण प्रेक्षकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला नाही. पण तुम्हाला माहितेय का, 107 वर्षांपर्यंत भगवान श्रीरामांवर तयार केलेला सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित करण्यात आला होता तेव्हा प्रेक्षकांनी तो पाहण्यासाठी फार मोठी गर्दी झाली होती. खरंतर, या सिनेमातील रामायणात ना कोणता आवाज होता ना कोणता मोठा कलाकार होता. या रामायणाची खास गोष्ट अशी की, या सिनेमात श्रीराम आणि माता सीताची भुमिका साकारणारा एकच व्यक्ती होता. सिनेमागृहात या सिनेमामुळे मंदिरासारखे वातावरण असायचे.

दादासाहेब फाळके यांनी तयार केला होता लंका-दहन
लंका दहन सिनेमा दादासाहेब फाळके यांनी तयार केला होता. या सिनेमाची खास गोष्ट अशी की, सिनेमासाठी कोणतीही महिला कलाकार त्यांना मिळाली नाही. वर्ष 1993 मध्ये आलेल्या सिनेमातील हरिचंद्र मध्ये अभिनेत्रीची भुमिका साकारणाऱ्या दादा साहेब यांनी अन्ना साळुंखे यांना संधी दिली होती. खरंतर अन्ना साळुंखे हे सिनेमातील अभिनेत्रीसाठी परफेक्ट होते. यानंतर दादा साहेब यांनी लंका दहन सिनेमासाठी कलाकार शोधण्यासाठी सुरूवात केली. तेव्हा त्यांनी अन्ना साळुंखे यांना सीतेची भुमिका दिली. लंका दहन सिनेमा वर्ष 1917 मध्ये तयार करण्यात आला होता. या सिनेमात माता सीता आणि भगवान राम यांची भुमिका साकारण्यासाठी एकाच व्यक्तीची निवड करण्यात आली होती.

सायलेंट फॉर्ममध्ये तयार करण्यात आला होता लंका दहन
भगवान रामावर तयार करण्यात आलेला लंका दहन सिनेमा सायलेंट फॉर्ममध्ये तयार करण्यात आला होता. यामध्ये केवळ चलचित्र दिसत होते. हा सिनेमा मुंबईतील सिनेमाघरांमध्ये सातत्याने 23 आठवड्यांपर्यंत दाखवण्यात आला होता. (Entertainment News)

सिनेमागृहांबाहेर लोक चप्पल काढायचे
भगवान राम यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहांबाहेर खूप गर्दी व्हायची. ऐवढेच नव्हे तर सिनेमागृहांमध्ये जाण्याआधी चप्पल बाहेर काढायचे.


आणखी वाचा :
शोले सिनेमाआधी अमिताभ बच्चन यांच्या या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर घातला होता धुमाकूळ
अनुष्का- विराट कोहलीच्या मुलाच्या नावाचा अर्थ माहितेय का?
साउथ अभिनेता थलापति विजय राजकरणात करणार एण्ट्री?

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.