Home » भारत नव्हे जगातील ‘या’ ठिकाणी आहे प्रसिद्ध शंकराची मंदिरे

भारत नव्हे जगातील ‘या’ ठिकाणी आहे प्रसिद्ध शंकराची मंदिरे

शंकराचे भक्त केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत. अशातच महाशिवारात्रीनिमित्त जगभरातील शिवभक्त शंकराची या दिवशी विशेष पूजा-प्रार्थना करतात. पण भारतासह जगभरात शंकराची काही प्रसिद्ध मंदिरे आहेत. याबद्दल जाणून घेऊया अधिक...

by Team Gajawaja
0 comment
Mahashivratri 2024
Share

Mahashivratri 2024  : यंदा 8 मार्चला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जाणार आहे. या निमित्त संपूर्ण शिवभक्त मोठ्या आनंदात महाशिवरात्रीचा सण साजरा करतात. याशिवाय शंकराची महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष पूजा-प्रार्थना केली जाते. भारतात 12 ज्योतिर्लिंगांसह काही शंकराची मंदिरे आहेत जेथे सर्वसामान्य दिवशीही भाविकांची फार मोठी गर्दी पाहायला मिळते. भारतातील ज्योतिर्लिंगांचा महिला संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. अशातच जाणून घेऊया भारताबाहेरील शंकराच्या प्रसिद्ध मंदिरांबद्दल सविस्तर….

प्रंबानन मंदिर, इंडोनेशिया
इंडोनेशियातील बालीला भारतीय आवर्जुन भेट देतात. इंडोनेशियातील जावामध्ये प्राचीन शंकराचे मंदिर आहे, ज्याला प्रंबानन मंदिराने ओखळले जाते. असे म्हटले जाते की, हे मंदिर 10 व्या शतकातील आहे. जावा सिटीपासून प्रंबानन मंदिर 17 किलोमीटर दूर आहे. या परिसरात तीन मुख्य मंदिर आहेत. जी ब्रम्हा, विष्णू आणि शंकर यांची आहेत. या तीन देवतांच्या मूर्तीचे मुख पूर्व दिशेला आहे. या मंदिरांमध्ये भाविकांची फार मोठी गर्दी होते.

मुन्नेस्वरम मंदिर
श्रीलंकेतील भगवान शंकराचे मंदिर आहे. असे म्हटले जाते की, या मंदिराचा इतिहास रामायणाच्या काळाशी जोडलेला आहे. काही धार्मिक मान्यतांनुसार रावणाचा वध केल्यानंतर भगवान राम या ठिकाणी शंकराची पूजा करायचे. या मंदिरात पाच मंदिरे देखील आहेत. ज्यामध्ये सर्वाधिक मोठे मंदिर शंकराचे आहे. दरम्यान, पोर्तुगिजांच्या काळात या मंदिवार हल्ले करण्यात आले होते. (Mahashivratri 2024)

कटासराज मंदिर
भारताच्या बाजूला असणाऱ्या पाकिस्तानातही भगवान शंकराचे मंदिर आहे. कटासराज मंदिर पाकिस्तानात असून ते कटस नावाच्या एका डोंगवार आहे. कटासराज मंदिर पाकिस्तानातील सर्वाधिक प्राचीन मंदिर आहे. अशी मान्यता आहे की, पौराणिक काळआत भगवान शंकर मा सतीच्या अग्नि समाधीमुळे अत्यंत दु:खी होते. येथे शंकरांचे अश्रू पडल्याने कटासराज सरोवर निर्माण झाले होते.


आणखी वाचा :
‘या’ मंदिरात होतो महाशिवरात्रीला चमत्कार!
स्वप्नात मोर दिसण्याचा काय आहे अर्थ?
या देवाची स्थापना प्रत्यक्ष ‘श्री कृष्णांनी’ केली आहे

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.