Home » निराळी रेल्वे ट्रॅक! जिथे रुळाच्या वरून नाही, तर खालून धावते ट्रेन

निराळी रेल्वे ट्रॅक! जिथे रुळाच्या वरून नाही, तर खालून धावते ट्रेन

0 comment
Hanging Train
Share

तुम्ही आयुष्यात अनेक प्रकारच्या रेल्वे पाहिल्या असतील. तुम्ही अनेक विचित्र आणि लक्झरी रेल्वेबद्दल वाचले, ऐकले आणि पाहिले असेल. रेल्वेची खास गोष्ट म्हणजे, बहुतेक लोकांसाठी हा एक सोयीचा प्रवास आहे. रेल्वेची स्वतःची खास वैशिष्ट्ये आहेत. काही रेल्वे डोंगरावर धावतात, ज्याचा वेग खूपच कमी असतो. तर काही सुपरफास्ट ट्रेन आहेत, ज्या काही मिनिटांतच वेग पकडतात आणि काही पॅसेंजर ट्रेन आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, एक रेल्वे अशीही आहे, जी रुळावरून धावण्याऐवजी रुळाखालून धावते? तुम्हाला या सर्वात विचित्र रेल्वेबद्दल क्वचितच माहिती नसेल. ही रेल्वे रुळाच्या वर धावत नाही, तर खाली लटकून चालते. (Hanging Train in Germeny)

हँगिंग रेल्वेचे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पण त्यात प्रवास करण्याचीही एक वेगळीच मजा आहे. हे थोडं भितीदायक वाटत असलं, तरी जगभरातून लोक या रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी येतात. ही रेल्वे आणि या प्रकारचा रेल्वे ट्रॅक जर्मनीमध्ये आहे. 

ही रेल्वे केवळ जर्मनीच्या वुपरटलचे सुंदर दृश्यच संस्मरणीय बनवत नाही, तर हँगिंग ट्रेनमधील प्रवास देखील संस्मरणीय बनवते. ही ट्रेन आपल्या सभोवतालची सुंदर दृश्ये दाखवत वेगाने पुढे जाते. ही हँगिंग ट्रेन पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात आणि या शानदार ट्रेनमधून प्रवासही करतात. (Hanging Train in Germeny)

१२० वर्षे जुनी रेल्वे

या हँगिंग ट्रेनचा इतिहासही खूप जुना आहे. हा ट्रॅक आणि ही ट्रेन तयार होऊन १२० वर्षे झाली आहेत. ही अनोखी हँगिंग ट्रेन १९०१ मध्ये सुरू झाली होती. रेल्वेचा मार्ग तयार होण्यापूर्वीच शहराचा इतका विकास झाला होता की, रुळ टाकण्यासाठी जागाच नव्हती. (Hanging Train in Germeny)

तेव्हा ट्रॅक उंच करून हवेत लटकणारी रेल्वे चालवण्याची कल्पना आली. या अनोख्या रेल्वेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत असतात.

हे देखील वाचा: जगातील एकमेव शहर, जिथे चालवू शकत नाही मोबाईल आणि टीव्ही; खेळण्यांच्या वापरावरही बंदी

तेरा किमीचे अंतर कापते रेल्वे

१३.३ किमीचे अंतर कापणाऱ्या या रेल्वेला मोनरेल असेही म्हणतात. ही रेल्वे एका निश्चित ट्रॅकवर रस्त्यांच्या वरून जाते. (Hanging Train in Germeny)

नद्या, रस्ते, धबधबे आणि इतर गोष्टी पार करून ही रेल्वे लटकत प्रवास पूर्ण करते. जर्मनीशिवाय जपान हा जगातील एकमेव देश आहे, जिथे सस्पेंशन रेल्वे आहे. विशेष म्हणजे, हा ट्रॅक १२१ वर्षांपासून कार्यरत आहे. दररोज ८२ हजार लोक रेल्वेने प्रवास करतात. (Hanging Train in Germeny)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.