Home » खरमास म्हणजे नेमकं काय ?

खरमास म्हणजे नेमकं काय ?

by Team Gajawaja
0 comment
Kharmas
Share

हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळं असतं.  घरात एखादे शुभकार्य करायचे असले तरी मुहूर्त काढून त्या दिवसाची सर्वोत्तम वेळ काय आहे ?  हे पाहिले जाते.  मात्र मंडळी पुढचे काही दिवस असे कुठलेही शुभकार्य करण्यास बंदी असणार आहे. त्याला कारण म्हणजे, आता खरमास (Kharmas) सुरु होत आहे.  या खरमासाच्या कुठलेही शुभकार्य करण्यास नकार दिला जातो. मुळात हा खरमास म्हणजे काय ?  हे जाणून घेतले पाहिजे. खर म्हणजे गाढव. गाढव आणि खरमास यांचा काय संबंध आहे, याचीही ही कथा सांगितली आहे.  या काळात शुभकार्य का होत नाहीत आणि या दिवसात कोणाची आराधना केली जाते, हेही जाणून घेणार आहोत.  

हिंदू धर्मात खरमाला खूप महत्त्वाचे मानले जाते.  हा महिना शुभ कार्यासाठी योग्य मानला जात नाही. यावर्षी हा खरमास 16 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. ग्रहांचा राजा म्हणून सूर्यदेवाचा उल्लेख करण्यात येतो. हा सूर्य देव, गुरूच्या राशीत धनु किंवा मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरु होतो. त्यानंतरचा पुढचा महिना खरमास पाळला जातो. खरमास सुरु झाल्यानंतर, महिन्यानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.  त्यावेळी खरमास संपतो.

 

हिंदू धर्मात या खरमासाला (Kharmas) फार महत्वाचे मानले जाते. हा एक महिना शुभ कार्यासाठी शुभ नाही.  शिवाय या महिन्यात आरोग्यासाठीही विशेष पथ्य पाळण्याचा आग्रह धरण्यात येतो. या काळात आरोग्याची काळजी घेतली तर पुढचे वर्ष कुठल्याही आजाराचा सामना करावा लागत नाही, अशी धारणा आहे.  या वर्षी, सूर्य देव 16 डिसेंबर 2023 रोजी धनु राशीत प्रवेश करत करणार आहे. 

15 जानेवारी 2024 पर्यंत सूर्यदेव धनु राशीत राहतील.  15 जानेवारी 2024 रोजी जेव्हा सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतील.  त्याच दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाईल.  मकर संक्रांती म्हणजे, विजयाचा दिवस.  यानंतर पुन्हा शुभ कार्ये सुरू होतील. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की, जेव्हा सूर्य बृहस्पतिच्या राशीत धनु किंवा मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा तो आपल्या गुरूच्या सेवेत व्यस्त होतो. या काळात सूर्यदेवांचा प्रभाव कमी होतो.  त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य व्यर्ज असतात.  

यावेळी कुठली शुभकार्य करु नये, याची माहितीही देण्यात आली आहे.  या काळात लग्न करु नये.  आपल्या घरातील मुलीला निरोप देऊ नये.  तसेच सुनेचाही गृहप्रवेश करु नये.  याशिवाय खरमासमध्ये मुंडन, नव्या घरात प्रवेश, नवीन वाहन खरेदी, दागिन्यांची खरेदी करुन नये, असे धार्मिक ग्रंथात सांगितले आहे. या बरोबरच खरमासाचे महत्त्व आयुर्वेदातही आहे. 

खरमासामध्ये (Kharmas) आरोग्याची योग्य पथ्ये पाळली तर वर्षभर कुठलाही आजार स्पर्श करीत नाही अशी मान्यता आहे.  या खरमासाच्या काळात गाजर, मुळा, तेल, तांदूळ, तीळ, मूग, सुंठ आणि आवळा यांचे सेवन करू नये, असे सांगण्यात आले आहे.  याशिवाय खरमास काळात तामसिक अन्न खाऊ नयेत,  असेही सांगितले जाते.  खरमासात शक्यतो सात्विक आहार करावा.  कारण हा काळ हवामान बदलाचा असतो.  त्यामुळे आहार पचण्याच्या समस्या या काळात होऊ शकतात.  त्यामुळे अती तिखट, तेलकट पदार्थांसोबत मांस सेवन टाळावे असेही सांगण्यात आले आहे.  

खरमास (Kharmas) म्हणजे काय, त्याचे शास्त्रीय महत्त्व काय आहे, याबाबत मार्कंडेय पुराणात कथा सांगण्यात आली आहे. सूर्य सात घोड्यांसह रथात बसून अवघ्या विश्वाची परिक्रमाकरीत असतो.  या परिक्रमेदरम्यान सूर्या क्षणभरही थांबत नाही, किंवा आपला वेगही कमी करुन विश्रांती घेत नाही. परंतु सततच्या प्रवासामुळे सूर्याचे सात घोडे थकून जातात. 

सूर्य जेव्हा परिक्रमेदरम्यान हेमंत हंगामात तलावाजवळ थांबतात तेव्हा ते त्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी सोडून देतात. पण घोडे मोकळे झाल्यामुळे सूर्याला थांबावे लागते.  मात्र सूर्य कधीही थांबू शकत नाही. अशावेळी प्रवास सुरू ठेवण्यासाठी आणि सृष्टीवर कोणतेही संकट येऊ नये म्हणून सूर्यदेव तलावाजवळ उभ्या असलेल्या दोन गाढवांना आपल्या रथाला जोडतात आणि पुढच्या प्रवासाला लागतात.  

============

हे देखील वाचा : साऊथ स्टार नागा चैतन्य याच्या ‘या’ घड्याळ्याचा किंमतीत येईल आलिशान फ्लॅट

============

घोडे आणि गाढवांच्या वेगात फरक आहे.  या गाढवांवर सूर्यदेवाच्या रथाचा भार दिल्यामुळे महिनाभर ती संथ गतीनं प्रवास करतात. त्यामुळे या महिन्यात सूर्याचे तेज कमी होते. या महिन्यात सूर्यप्रकाशही कमी दिसतो.  मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव पुन्हा आपले सात घोडे रथाला जोडतात आणि आपली परिक्रमा सुरु करतात.  तेव्हापासून शुभकाळ सुरु होतो.(Kharmas)

हा महिना आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.  हा महिना संयम, अहिंसा आणि भक्तीसाठी ओळखला जातोम्हणून या महिन्याला नारायण महिना असेही म्हटले जाते. तीर्थयात्रा, कथा श्रवण, कीर्तन, भजन, नामजप यांना खरमासात खूप महत्त्व आहे.  या खरमासात रविवारी सूर्य चालीसा पाठ करण्याचेही महत्त्व धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.  

सई बने  

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.